टाकळी हाजी ता. शिरूर येथील गोळीबार खुन प्रकरणातील दोघे आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी
दिनांक १८/०१/२०२१ रोजी १२.०० वा. चे सुमारास मौजे टाकळी हाजी मळगंगा हॉटेलचे पाठीमागे वाळु व्यवसायाचे तसेच उसने पैशाचे कारणावरून स्वप्नील छगन रणसिंग वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर जि.पुणे याचा आरोपी नामे १)विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे २)आकाश उर्फ बबलु खंडु माशेरे दोघे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे व इतर यांनी संगनमत करून होंडा शाईन मोटार सायकलवर येवुन पिस्तुलमधन गोळया झाडुन खुन केला व स्वप्नील सुभाष गावडे यास गोळी मारून जखमी केले. याबाबत मयत स्वप्नील छगन रणसिंग वय २४* याचे पत्नीने दिलेले फिर्यादीवरून शिरुर पो.स्टे. गु.र.नं. ४२/२०२१ भादंवि क .३०२, ३०७, १२०(ब), ३४ आर्म ॲक्ट क.३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास मा.पोलीस अधीक्षक सो. यांचे आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली LCB पथकाने करून गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे -
१) विजय उर्फ पप्पू उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे वय २५ वर्षे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे
२) आकाश उर्फ बबलू खंडु माशेरे वय २४ वर्षे रा.आमदाबाद, ता.शिरूर, जि.पुणे यांना मौजे शिक्रापूर पुणे-नगर हायवे रोड वरील शिक्रापूर-चाकण चौक येथून ताब्यात घेतलेले आहे .
सदर दोन्ही आरोपींची वैदयकिय तपासणी करुन त्यांना शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. पृथ्वीराज ताटे,
सपोनि. नेताजी गंधारे,पोसई. अमोल गोरे,
सफौ. दत्तात्रय गिरमकर,सफौ. राजेंद्र थोरात,
सफौ. दत्तात्रय जगताप,सफौ. शब्बीर पठाण,
पोहवा. विद्याधर निचित,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. विक्रम तापकीर,पोहवा. जनार्दन शेळके,पोहवा. काशिनाथ राजापुरे,
पोहवा. प्रमोद नवले,पोना. राजू मोमीन,पोना. मंगेश थिगळे,पोना. दिपक साबळे,पोशि. संदीप वारे,पोशि.अक्षय नवले,पोशि.अक्षय जावळे,
पोशि. प्रसन्न घाडगे यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment