Tuesday, August 27, 2019

नारायणगाव येथे पत्रकारिता कार्यशाळा उत्साहात संपन्न


ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत

          नारायणगाव - दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, ग्रामोन्नती मंडळाचे कृषी शिक्षण संकुलाचे डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर जर्नालिजम, अखिल मराठी युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य य‍ांच्या विद्यमाने कै.जमादार बापु लक्ष्मण लामखडे यांच्या स्मरणार्थ 'एक दिवसीय प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया पत्रकारिता कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे' आयोजन नारायणगाव कृषी विद्यालय येथे करण्यात आले होते.
                 या कार्यशाळेला मुंबई सकाळचे निवासी संपादक रवि आमले, साम टीव्हीच्या सोनाली शिंदे, दत्तोपंत ठेंगडी बोर्डचे प्रदीप मुन, भारतीय सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन शिरकर, मुंबई पोर्ट युनियनचे मारुती विश्वासराव, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.बाळासाहेब लामखडे, बाळकृष्ण लोहोटे, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, पत्रकार रविंद्र पाटे, अखिल मराठी युवा पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष प्रा.अशफाक पटेल, सचिव अॅड.कुलदिप नलावडे, सहसचिव राहुल घाडगे, यांसह कार्यशाळेला जुन्नर, आंबेगाव, खेड, पारनेर यांसह पुण्यातील पत्रकार व पत्रकारितेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         या कार्यशाळेचे उद्घाटन दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजनाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
         यावेळी उपस्थित मान्यवरांचा पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने उपस्थितांना कै.जमादार बापु लक्ष्मण लामखडे यांचा जीवनपट दाखवण्यात आला. तसेच बाळकृष्ण लोहोटे यांनी कै.लामखडे यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.

              या कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना अखिल मराठी युवा पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष प्रा.अशफाक पटेल यांनी सोशल मिडियामुळे प्रत्येकजण पत्रकार झाला. परंतु पत्रकारितेत बातमी संकलन ते संपादनातील छोट्या मोठ्या गोष्टी, पत्रकारीतेतील समस्या ग्रामीण भागात कार्यरत असणार्‍या पत्रकारांना शिकायला मिळाव्यात व त्यातुन अधिक चांगल्या आणि सकारात्मक पद्धतीने काम करता यावे यासाठी पत्रकार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती देत प्रास्ताविक केले.

            पहिल्या सत्रात दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फाॅर एज्युकेशन अॅड डेव्हलपमेंटचे प्रादेशिक संचालक प्रदीप मुन यांनी त्यांच्या विभागामार्फेत राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांची माहिती देत पत्रकार हे देशाचं भविष्य आहे. पत्रकारांच्या लेखनीत प्रचंड ताकद आहे पण त्याने त्याचा वापर चांगल्या पद्घतीने करायला हवा. पत्रकारांच्या हातुन चांगलं काम व्हावं यासाठी ही कार्यशाळा महत्वाची आहे. फक्त ज्ञान असुन उपयोग नाही तर ज्ञानाचा योग्य वापर करता येणं महत्वाचं आहे. त्यासाठी वेळोवेळी अशा कार्यशाळा व्हायला हव्यात असे सांगत कार्यशाळेचे कौतुक केले.

          दुसर्‍या सत्रात बोलताना मुंबई सकाळचे निवासी संपादक रवि आमले यांनी पत्रकारितेचं स्वरुप बदलत असुन सोशल मिडीयाने पत्रकारांचं काम कमी केलं अाहे. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेच्या समोरील आव्हानांना कसे सामोरे जावे हे समजुन घेणं महत्वाचं असुन पत्रकारितेची कमी होत असलेली विश्वासार्हता सांभाळणे सद्यस्थितीत महत्वाचे आहे. पत्रकाराने मुल्य पाळुन पत्रकारिता करायला हवी. तसेच पत्रकारितेत टिकण्यासाठी वाचन वाढवायला हवं असे सांगत उपस्थित पत्रकारांना पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि सद्यस्थिती आणि प्रिंट मिडियाची कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.

            तसेच या कार्यशाळेच्या तिसर्‍या सत्रात साम टीव्ही मुंबईच्या पत्रकार सोनाली शिंदे यांनी पत्रकारितेविषयी नकारात्मक भावना असताना या पत्रकार कार्यशाळेला एवढी मोठी उपस्थिती हे या कार्यशाळेचं यश आहे. असं सांगत कार्यशाळेचं कौतुक करत टीव्ही आणि इलेक्ट्राॅनिक मिडीयातीचं काम कसं चालतं कोणकोणते विभाग कशापद्धतीने कार्यरत असतात याविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर आणि महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.

           या कार्यशाळेच्या समारोप उपस्थितांना प्रमाणपत्र वितरण व पत्रकार संघ व शिवनेर प्राईमच्या नियुक्त्या जाहीर करण्यात अाल्या. यावेळी अखिल मराठी युवा पत्रकार संघाच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी अभय वारुळे, आंबेगाव तालुका अध्यक्षपदी संतोष पाचपुते यांची तर शिवनेर प्राईमच्या सांस्कृतिक संपादकपदी मंगेश फाकटकर, कार्यकारी संपादकपदी गणेश मोढवे यांची नियुक्ती शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक व अखिल मराठी युवा पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष प्रा.अशफाक पटेल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. यानिमित्तानं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

             याकार्यशाळेचे आभार प्रदर्शन डाॅ.सत्यवान थोरात व अभय वारुळे यांनी मानले, तर सुत्रसंचालन गणेश मोढवे यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीचे आयोजन

कार्यकारी संपादक : अमर भागवत 
ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल 
नारायणगाव -
पोलीस स्टेशन हद्दीतील गणपती मंडळांचे अध्यक्ष सभासद पोलीस पाटील तसेच शांतता कमिटी सदस्य व पत्रकार यांची आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक आज दि.२७ रोजी ५ वाजता नारायणगाव पोलीस स्टेशन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

                  या बैठकीमध्ये गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या. डॉल्बी न वाजविणे, ऑनलाइन परवानगी फॉर्म भरणे, गणपती उत्सव मंडळांनी त्यांच्या निधीमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसविने, गणेश विसर्जन         
मिरवणुकीमध्ये गुलाल, डाॅल्बी यांचा वापर करु नये, सूर्यास्तापूर्वी गणपती विसर्जन करणे, मिरवणुकीत प्रत्येक मंडळ दोन पेक्षा जास्त वाहने ठेवता येणार नाहीत मंडप, वाद्य वाजविणे, स्पिकर इत्यादी परवाणे घेणे अशा सूचना देण्यात आल्या. 

                 तसेच पूरग्रस्तांना शालेय साहित्य गणपती मंडळाकडून जमा करुन  मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. 
दरम्यान नारायणगाव मधील पोलीस अधिकारी , कर्मचारी, पोलीस पाटील , ग्रामसुरक्षा दल यांच्या वतीने एक हात मदतीचा या हेतूने कोल्हापुर येथे जिवनावश्यक वस्तु चे दोन ट्रॅक साहित्य रवाना केले. 

                 सदर बैठकीमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी १०० ते १२५ गणपती मंडळाचे अध्यक्ष ,सदस्य, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, राहुल गावडे, मुकेश वाजगे, संभाजी चव्हाण,माजी उपसरपंच संतोष दांगट आदी मान्यवर तसेच सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

Friday, August 23, 2019

बावीस हजार रुपये किमतीचा सापडलेला मोबाईल परत करणाऱ्या अथर्वचे पोलिसांकडून कौतुक


नारायणगाव,
नारायणगाव पोलीस स्टेशन आज रोजी दिनांक २०/०८/२०१९ रोजी सायं ०७:३० वा कु. अथर्व सुजित फुलसुंदर वय १४ वर्ष, गुरुवर्य रा.प. सबनिस विदयालयातील विध्यार्थी यास टोमॅटो मार्केट या ठिकाणी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन त्याची किंमत २२,०००/- रू असलेला सापडला, त्याने तो मोबाईल फोन प्रामाणीकपणे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आणून जमा केला त्या बदल त्याचा पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला असुन मोबाईलचे मालक श्री निरज गुप्ता ( टोमॅटो व्यापारी ) यांस बोलावुन सदर मोबाईल  मालकाचे ताब्यात देण्यात आला आहे.

बावीस हजार रुपये किमतीचा सापडलेला मोबाईल परत करणाऱ्या अथर्वचे पोलिसांकडून कौतुक


नारायणगाव,
नारायणगाव पोलीस स्टेशन आज रोजी दिनांक २०/०८/२०१९ रोजी सायं ०७:३० वा कु. अथर्व सुजित फुलसुंदर वय १४ वर्ष, गुरुवर्य रा.प. सबनिस विदयालयातील विध्यार्थी यास टोमॅटो मार्केट या ठिकाणी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन त्याची किंमत २२,०००/- रू असलेला सापडला, त्याने तो मोबाईल फोन प्रामाणीकपणे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आणून जमा केला त्या बदल त्याचा पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला असुन मोबाईलचे मालक श्री निरज गुप्ता ( टोमॅटो व्यापारी ) यांस बोलावुन सदर मोबाईल  मालकाचे ताब्यात देण्यात आला आहे.