Thursday, February 27, 2020
GMRT खोडद येथे दि.२८ व २९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
Tuesday, February 11, 2020
किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्रीगणाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने साजरा होणार - अतुल बेनके
शिवजयंती दिनी शिवनेरीच्या पायथ्याशी दत्त मंदिर परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र मैदाने तयार करण्यात आली आहेत गडावरील शिवजन्मस्थान व शिवकुंज या ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार असून सकाळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा शिवाई माता मंदिर ते शिवजन्मस्थळ पालखी सोहळा व जन्मस्थानी शिवजन्म सोहळा कार्यक्रम मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके,परिसरातील विकासकामांची पाहणी, जुन्नर मधील बाजार समिती प्रांगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अन्य मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे,
निमगाव सावात रंगला युवा महोत्सव
जुन्नर उपविभाग जुन्नर यांच्या वतीने नारायणगाव पोलीस ठाण्यात भरोसा सेल ची स्थापना व उद्घाटन संपन्न
Monday, February 10, 2020
खासदार डॉ.अमोल कोल्हे आयोजित मोफत कर्णबधिर तपासणी शिबिरास नारायणगाव मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्राहक समाचार News / Web chanal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री.अमर भागवत
नारायणगाव- दि.१० शिरूर लोकसभा
मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कर्णबधिर तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर मालिकेतील सहावे शिबिर आज नारायणगाव येथे उत्साहात संपन्न झाले.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पार पडले.शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या वर्षात एक अभिनव उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवणदोष तपासणी करण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे १००० ज्येष्ठ नागरिकांची कानांची तपासणी करण्यात आली.
अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींना डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अमित बेनके, डॉ. सदानंद राऊत, दिलीप कोल्हे, अरविंद लंबे, गणेश वाजगे, रामदास अभंग, रोहिदास केदारी, शेखर शेटे, राजेंद्र कोल्हे, राजेश कोल्हे, आशिष हांडे, अतुल आहेर , ज्ञानेश्वर औटी, राजेश बेनके, राजेश पाटे, भाऊ देवाडे, सुजित खैरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सुजाता डोंगरे ,जुन्नर तालुका आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर , शरदचंद्र पवार फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्टार्की फाऊंडेशन अमेरिका या संस्थेच्या वतीने डॉ.सुरेश जे पिल्लई, डॉ.रवी गुप्ता, डॉ.सागर कानेकर, डॉ.पी.व्ही सरथ, डॉ.निहार प्रधान, डॉ.यशवंत सिंह, डॉ.सुरजित पेन, डॉ.स्टेजीन बेनी आदींनी कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली.
Thursday, February 6, 2020
तमाशा कलावंतांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नारायणगावातील ग्रामस्थ व कलावंतांनी काढला मोर्चा
Monday, February 3, 2020
हाऊसफुल्ल प्रतिसादात रंगला रंगकर्मी प्रतिष्ठानचा "एक होता बांबूकाका" चा प्रयोग
उप संपादक : श्रीनिवास शिंदे, अहमदनगर.
नगर -
येथील नाटयक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीन नगर शहरातील माऊली सभागृहात राजेंद्र पोळ लिखित आणि शैलेश देशमुख दिग्दर्शित दोन अंकी धम्माल विनोदी "एक होता बांबुकाका" या नाटकाचा प्रयोग नगरकर नाटयरसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवार दिनांक २ फेब्रु रोजी रात्रौ ८:०० वाजता संपन्न झाला. ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. प्रायोजित या विनामुल्य दाखविण्यात आलेल्या नाटय प्रयोगाला नगरकराने खळखळुन हसवत मनमुराद दाद दिली. ज्योती क्रांतीच्या वतीने नगर व नवनागापुर शाखेत कोणत्याही ठेवीवर एक टक्का अधिक व्याज दर देण्याची घोषणा चेअरमन आजिनाथ हजारे यांनी केली. दोन्ही शाखांपैकी कोणत्याही एका शाखेत नाटकाची सन्मानिका घेउन जाऊन ठेवीवर एक टक्का व्याजदर देण्यात येणार आहेया आकर्षक योजनेच्या माध्यमातून नगरकर नाटय रसिकाना ही एक वेगळी पर्वणीच मिळणार आहे.
आमदार संग्राम जगताप, नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे, ज्योती क्रांती को-ऑप सो.लि. चे चेअरमन आजिनाथ हजारे, सहप्रायोजक आणि उद्योजक अविनाश कुलकर्णी,सचिन फोटोजचे सचिन खटावकर,माऊली पेवर्सचे राहुल उजागरे, रामकृष्ण कस्ट्रकशनचे सुहास क्षीरसागर, विभागीय पोलीस अधिक्षक संदीप मिटके,श्रीरामपूर विभाग पोलीस अधिक्षक दिपाली काळे,शेतकरी उद्योजकचे अभिजित हजारे,सुवर्णयोग सहकारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र गुंजाळ, सेक्रेटरी बबन नागरे, जेष्ठ नाटय लेखक सदानंद भणगे,नाटयकर्मी मकरंद खेर, अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे नगर विभागप्रमुख शशिकांत नजान, अ.भा. मराठी नाटय परिषद मुंबईचे सहकार्यवाह सतीश लोटके, नियमाक मंडळ सदस्य सतीश शिंगटे, नगर शाखा अध्यक्ष अमोल खोले,माधव देशमुख आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा उर्मिला लोटके हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रितेश साळुंके, प्रमुख कार्यवाह नानाभाऊ मोरे,शैलेश देशमुख,श्रीया देशमुख,रविंद्र व्यवहारे, तुषार चोरडिया,अविनाश कराळे,वैभव कुऱ्हाडे,वसी खान यांनी मान्यवरांचा याप्रसंगी स्वागत सत्कार केला.
नगरची रंगभुमी ही स्पर्धात्मक रंगभुमी म्हणुन ओळखली जाते,राज्यासह देशपातळीवर नगरचे कलावंत आपल्या नगरचे नाव मोठे करत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन आपल्या शुभेच्छापर भाषणात आमदार जगताप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विराज मुनोत आणि अविनाश कराळे यांनी केले तर आभारप्रदर्शन रितेश साळुंके यांनी केले. अशी माहिती संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख अविनाश कराळे यांनी दिली.
Sunday, February 2, 2020
ज्योती क्रांतीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या विद्यालयांना "जोती सावित्री पुरस्कार" जाहीर
उप संपादक : श्रीनिवास शिंदे, अहमदनगर.

