Tuesday, September 24, 2019

श्री विघ्नहर कारखान्यास सर्वोत्कृष्ठ ऊस विकास हा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत 



    कोल्हापूर :
                    भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर धंद्यासाठी काम करणार्‍या प्रथितयश अशा संस्थेकडून श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण देशातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार  नॅशलन शुगर इन्स्टिट्युट कानपूरचे संचालक नरेंद्ग मोहन यांच्या शुभहस्ते व भारतीय शुगरचे मुख्य संपादक आणि संस्थापक चेअरमन विक्रमसिंह शिंदे तसेच साखर उद्योगातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या  उपस्थितीत कोल्हापूर येथे शनिवारी  दि.२१ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप व संचालक मंडळातील सदस्यांनी आणि अधिकारी वर्गाने तो स्विकारला.
                  या पुरस्काराबद्दल बोलताना विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, श्रीविघ्नहर कारखान्याने गत वर्षीच्या हंगामात उत्कृष्ठ अशा ऊस विकास यंत्रणेचा वापर करुन ऊसाचे एकरी उत्पादनामध्ये आघाडी  घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यात उच्चांकी असे प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या ऊसाचे गाळप केले असून त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर ११.६५% साखर उतारा राखण्यात यश मिळविले. विघ्नहर कारखान्याकडून ऊस विकास व संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना तसेच ऊसाचे एकरी उत्पादनात वाढ होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पुरवित असलेल्या सोईसुविधा, सवलती व उत्पादन वाढीसाठी देत असलेल्या प्रोत्साहन आदि बाबींचा विचार होवून विघ्नहर कारखान्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चेअरमन सत्यशिल शेरकर पुढे म्हणाले की, भारतीय शुगर या संस्थेकडून संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे श्री विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे सांगून जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानाची  बाब असल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर व माजी चेअरमन स्व.सोपानशेठ शेरकर यांच्या आर्दशाप्रमाणे विघ्नहर कारखान्याची यशोपताका  उंचावली  जात असून व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या साथीने व सर्व सभासद बंधू-भगिनी, जेष्ठांचा आशिर्वाद, ऊस उत्पादक, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने विघ्नहर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे सत्यशिल शेरकर यांनी नमूद केले. आगामी सन २०१९-२० गाळप हंगामात सुमारे ८ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने गाळप हंगामाची जोरदार तयारी  सुरु असल्याचे त्यांनी याप्रसंगी संगितले.

Friday, September 20, 2019

विरोबा पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न... पतसंस्थेकडून सांगलीच्या पूरग्रस्तांना १.५० लाखाची मदत

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत






नारायणगाव : 
                 श्री. विरोबा नागरी सह.पतसंस्था मर्या.,नारायणगाव ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१५ सप्टेंबर १९ रोजी श्री. बाळासाहेब उर्फ नामदेव दत्तात्रय पाटे यांच्या अध्यक्षतेखाली जयहिंद पॅलेस नारायणगाव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .
               संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री दिनकर शिंदे गुरुजी,श्री शांताराम बनकर ,श्री अशोक वाजगे ,श्री नंदाराम नायकोडी,श्री शांताराम नाईक यांनी दिपप्रज्वलन केले.
              संस्थेच्या अहवाल वर्षात २२.९४ कोटीच्या ठेवी,कर्जवाटप १८.४४ कोटी.ढोबळ नफा ९०.७६ लाख आहे तर थकबाकीचे प्रमाण ३.७२% व एन.पी .ए चे प्रमाण २.४०% आहे. संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीवर सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले.सभासदांच्या गुणवंत विध्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई बुचके तसेच लेखापरीक्षक श्री ज्ञानेश्वर औटी  यांनी सभेस मार्गदर्शन केले. 


              सांगली येथील पूरग्रस्तांना रु.१,००,०००/-ची रोख व रु.२५०००/- च्या जीवनावश्यक वस्तू पतसंस्थेतर्फे देण्यात आल्या. तसेच बस्तवाड,ता.शिरोळ,जि .कोल्हापूर येथे ४ दिवस जाऊन प्रत्यक्ष जाऊन तेथील पुरग्रस्थांचे पुनर्वसन करणारे नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच व संस्थेचे संचालक श्री योगेश उर्फ बाबु पाटे व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे युवक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व डॉक्टरांची टीम अशा ६० जणांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
          सर्व सभासदांना सालाबाद प्रमाणे याही वर्षी संचालक मंडळाने १५% लाभांश व दीपावली भेटवस्तू देण्याचे जाहीर केले.      
               अध्यक्षीय मनोगतात श्री बाळासाहेब उर्फ नामदेव दत्तात्रय पाटे यांनी संस्था चालू वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असल्यामुळे सभासदांच्या सूचना मागविण्यात आल्या व सभासदांना रौप्य महोत्सवा निम्मित खास भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शाळकरी मुलांना मोबाइल व टी.व्ही. पासून दुष्परिणाम होत असल्यामुळे त्यापासून दूर ठेवण्याचे आव्हान करण्यात आले. नारायणगाव परिसरातील बेवारस प्रेतांचा अंत्यविधीचा खर्च यापुढे  पतसंस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.


             संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कांतीलाल बोरा,संचालक श्री धर्मेंद्र गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले व प्रगतीचा आढावा घेतला तर सभेपुढील विषयांचे वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री. ललित वाणी यांनी केले.आभार प्रदर्शन संस्थेचे मा.सचिव श्री राजेंद्र पाटे  यांनी केले.

तात्यासाहेब भुजबळ यांची ४५ वी पुण्यतिथी’’ कृषि शिक्षण संकुल नारायणगाव येथे उत्साहात साजरी... कृषि शिक्षणामध्ये नेदरलँड कृषि तज्ज्ञाची मदत घेणार - कृषिरत्न श्री.अनिल मेहेर

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत






नारायणगांव :
               स्वर्गीय तात्यासाहेब भुजबळ यांनी मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या जमिनीच्या 
देणगीमुळेच ग्रामोन्नती मंडळ आज ते कृषि शिक्षण संकुल उभारु शकले. व त्यामुळेच कृषि विध्यार्थ्यांना अभ्यासक्रमास पूरक असे वातावरण निर्माण होत आहे. परदेशातील कृषि विषयक तंत्रज्ञान विध्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे. नेदरलँडमधील कृषि तज्ज्ञ गटांशी यासाठी चर्चा सुरु आहे.  या स्पर्धेच्या युगामध्ये विद्याथ्यारना शेतकऱ्यांना आवश्यक असणारे तंत्रज्ञान ग्रामोन्नती मंडळ उपलब्ध करुन देत आहे. असे प्रतिपादन कृषिरत्न श्री.अनिलतात्या मेहेर यांनी केले. 
                कै.तात्यासाहेब भुजबळ यांचे समाधीचे पूजन ग्रामोन्नती मंडळाचे संचालक श्री. शशिकांत भिमाजी वाजगे यांचे हस्ते झाले. याप्रसंगी कुणाल रत्नदीप भरवीरकर यांनी दिलेल्या देणगीचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाशमामा पाटे यांनी स्विकारला. यावेळी मंडळाचे कार्यवाह श्री. रविंद्र पारगांवकर यांनीही आदरांजली वाहिली.
                  याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त डॉ.श्रीकांत विद्वांस, अध्यक्ष श्री.प्रकाशशेठ पाटे, कार्याध्यक्ष श्री.अनिलतात्या मेहेर, कार्यवाह श्री. कार्यवाह श्री.रविंद्र पारगांवकर, शेती समिती प्रमुख श्री.रत्नदिप भरविरकर, उप कार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह श्री.अरविंदभाऊ मेहेर, ग्रामोन्नती मंडळ संचालक श्री.शशिकांत वाजगे, श्री.आल्हाद खैरे, श्री.तानाजी वारुळे, डॉ.संदिप डोळे, श्री.एकनाथ शेटे, श्री.ऋषिकेश मेहेर, तसेच श्री.पी.जी.शेटे, डॉ.एम.बी.भुजबळ,
श्री.आर.एन.गायकवाड, श्री.नवले सर, श्री.गुळवे सर, श्री.रोकडे सर, श्री.अरविंद ब्रम्हे, सौ.स्मिता भरवीरकर, पत्रकार श्री.रविंद्र पाटे, श्री.भोर सर कृषि शिक्षण संकुलातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद इ.उपस्थित होते.



               या प्रसंगी कृषि विभागांच्या कार्याचा सविस्तर आढावा  कृषि शिक्षण संकुलाचे 
व्यवस्थापक मा.श्री.बी.आर. भुजबळ यांनी घेतला. तसेच पुण्यतिथीनिमित्त कृषि शिक्षण संकुलातील सर्व विभागातील विद्याथ्यारनी व सबनीस विद्यामंदिराच्या लेझीम पथकाने ढोल ताशांच्या गजरात  तात्यासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली.  
               आभार प्रदर्शन प्रा.नेहा गोडसे यांनी केले व सुत्रसंचालन डॉ.सत्यवान थोरात यांनी केले.

Wednesday, September 18, 2019

आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल चे यश

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत




नारायणगाव :
                    जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा परिषद पुणे यांच्यावतीने आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सुरू असून बारामती येथे बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराच्या जिल्हास्तरीय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या स्पर्धांमध्ये श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या 17 वर्षे वयोगटातील खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळविला या खेळाडूंच्या संघाची निवड विभागीय पातळीवर झाली आहे. अशी माहिती मुख्याध्यापिका सौ अनघा जोशी यांनी दिली स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे.
१) कु. अंकित बाजीराव टिकेकर  २) कु. ऋग्वेद दिनेश वैष्णव  ३) कु. वेदांत विकास गाडेकर  
४) कु.साहिल सचिन ढेरे पारस ५) कु.आकाश  शर्मा या खेळाडूंना श्री भरत भोसले यांचे मार्गदर्शन लाभत आहे .
        जुन्नर तालुक्यात बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात यावर्षी प्रथमच खेळाडूंची ची निवड विभागीय स्तरावर झाली असुन यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक यांचे अभिनंदन व कौतुक ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी, कार्यवाह रवींद्र पारगावकर व इतर संचालकांनी केले.

श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने राबविले ग्राम स्वछता अभियान

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत



 निमगाव सावा :  
                      श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयाने  निमगाव सावा गावामध्ये ग्राम स्वछता अभियान राबविल्याची माहिती विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी प्रा. दर्शन शेलार यांनी दिली.  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि कमवा व  शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी स्वछता अभियानात उस्फुर्तपणे सहभाग घेतला.  


                     विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत परिसर स्वच्छ केला. तसेच गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनी साफसफाई केली. बाजारतळ, संत मनाजी बाबा चौक,प्राथमिक आरोग्य केंद्र,  गावचे प्रवेशद्वार या परिसरातील कागद, पालापाचोळा, दगड गोळा केले तसेच उंच वाढलेले गवत काढून साफसफाई केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य पांडुरंग पवार यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून असे स्वच्छता उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगितले आणि यामध्ये महाविद्यालयांनी पुढाकार घेउन त्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 


                               या स्वच्छता अभियानात निमगाव सावाचे सरपंच सौ. सुनीता घोडे, उपसरपंच नजीर चौगुले, सचिन बेहेडे यांच्यासह ग्रामस्थ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोशी व्ही. एस. आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या  स्वछता अभियानाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रकाश कांबळे यांनी केले.

श्री विघ्नहर कारखान्याची ३७ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.... विषय पत्रिकेवरील सर्व १२ विषयांना सभासदांची एकमुखी मंजूरी

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत



शिरोली बु. : 
                 श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज बुधवारी (दि.१८) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील सर्व १२ विषयांना सभासदांनी एकमुखी मंजूरी दिली.
अध्यक्षस्थानावरुन सभासदांना मार्गदर्शन करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची एफ.आर.पी. प्रतिटन रुपये २६८५ इतकी होती. या सिझनमध्ये गळीतास आलेल्या ऊसास संपूर्णपणे एफ.आर.पी पेमेंट कारखान्याने अदा केले असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. आगामी २०१९-२० गाळप हंगामात आपण ८ लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून हंगामाच्या तयारीसाठी कारखान्याने ऊस तोडणी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये ६०० टायर बैलगाडी, २५० ट्रॅक्टर टायरगाडी, ३०० ट्रक / टोळी तसेच ५ ऊस तोडणी यंत्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर को-जनरेशन प्रकल्प व डिस्टीलरी विभागातील देखभाल, दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यामध्ये असून येत्या ऑक्टोबर २०१९ अखेरपर्यन्त कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज होत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस पिकावर हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने विघ्नहरने सुमारे १३ टन भुंगेरे गोळा करुन त्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. हुमणी आटोक्यात आणणेसाठी शेतकी विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.

 कारखान्याच्या ३७ व्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी  कारखान्यास हंगाम २०१८-१९ साठीचा नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज, नवि दिल्ली या संस्थेकडून तांत्रिक कार्यक्षमतेचा उच्च साखर उतारा विभागातील संपूर्ण भारत देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सलग तिसर्‍यांदा मिळाला असून नुकताच भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर उद्योगासाठी काम करणार्‍या अशा प्रथितयश संस्थेकडून कारखान्यास राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ऊस विकासाचे पारितोषिक मिळाले आहे. सदरहू बक्षिस वितरण समारंभ येत्या २१ सप्टेंबर-२०१९ रोजी कोल्हापूर येथे होणार असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी सांगितले. विघ्नहर कारखान्याला मिळालेल्या या दोन्ही पुरस्कारांबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्यावतीने चेअरमन सत्यशिल शेरकर व सर्व संचालक मंडळाचा याप्रसंगी सत्कार  करण्यात आला. 

  सत्यशिल शेरकर म्हणाले की, केंद्ग सरकारने बफर स्टॉक अनुदान व साखरेवरील निर्यात अनुदान जाहिर केले. परंतू अनुदानाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. निर्यात साखरेचे अनुदान लवकर देणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.सतत मागिल दोन वर्षे साखर उत्पादन जास्त झालेने बाजारभाव कमी होवून शेतकर्‍यांना  देणे अवघड  झाले. यावर केंद्ग शासनाने मागिल दोन वर्षे कारखान्यांना सॉफ्टलोनद्वारे पैसे उपलब्ध करुन दिल्यामुळे   पूर्ण करता आली. तथापि, याद्वारे मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा कारखान्यांवर निर्माण           झाला. सदर कर्जाची परतफेड एक वर्षे मुदतीची असल्याने याचा परिणाम कारखान्यांच्या खेळते भांडवलावर होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. केंद्ग सरकारने साखरेचे किमान विक्री मुल्य () ३१००/- रु. केले. याचा फायदा होणे अपेक्षित होते. परंतू देशामध्ये एकच दर ठेवल्याने उत्तर प्रदेश सारख्या राज्याला त्याचा चांगला फायदा झाला. संपूर्ण देशभर उत्तर प्रदेशची साखर जाऊ लागली. व महाराष्ट्रातील साखरेचे साठे आजही पडून आहेत. याचा परिणाम साखरेवरील व्याजाचा बोजा वाढला असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशिल सभासद राहणेसाठी ५ वर्षामधून एकदा गाळपास ऊस घालणे व ५ वर्षामधून एकदा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहाणे अनिवार्य आहे, याबाबत सभासदांस वेळोवेळी नोटीशीद्वारे, अहवालाद्वारे कळविणेत आलेले आहे. सभासद क्रियाशिल नसल्यास त्यांना  मिळणार्‍या अनेक सवलती, सोई-सुविधा व हक्कापासून वंचीत रहावे लागणार आहे. सर्व सभासदांनी याबाबत जागरुक रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मागिल दोन वर्षांमध्ये सलग साखरेचे बंपर उत्पादन झालेने साखरेचे बाजारभाव देशांर्तगत व आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळले. आपल्या को-जन. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा करार मागीलवर्षी संपला. त्याचा विज खरेदी दर ६.४५ पैसे युनिट होता. तो आज ३.५६ पैस युनिट झाला आहे. त्यामुळे को-जन. युनिटमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले. संचालक मंडळाने नेहमीच ऊस उत्पादक, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. व यापुढील काळामध्येही घेणार आहे. तथापि, सदरील सर्व बाबींचा विचार करता  पेक्षा अधिकचा भाव देणे अवघड आहे. परंतू यामधूनही आपण मार्ग काढून पैशांची उपलब्धता झालेवर आपली दिवाळी नक्कीच गोड करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.               

प्रारंभी विघ्नहरचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन सभेच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे   ५ शेतकरी, हंगामात एकरी १११ मे.टन व त्यापुढील ऊस उत्पादन घेतलेले १४ शेतकरी, हंगामात एकरी १०० मे.टनाचे पुढे उत्पादन घेतलेले २७ शेतकरी, हंगामात जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे ४ कंत्राटदार, हंगामात जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे २ कंत्राटदार, हंगामात हार्वेस्टरने जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे १ कंत्राटदार यांचा ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, पुरस्कार व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पारगांव तर्फे आळे येथील ऊस उत्पादक शेतकरी विकास चव्हाण यांना पुणे जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                         
          यावेळी अनेक सभासद शेतकर्‍यांनी चर्चेत भाग घेवून प्रश्न मांडले. तसेच सुचना केल्या. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी समाधानकारक खुलासा केला. कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी दुःखवट्याचा ठराव मांडला. उपस्थित सभासदांचे आभार व्हाईस चेअरमन अशोकशेठ घोलप यांनी मानले.
   

Tuesday, September 17, 2019

नारायणगाव येथे २ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन जि.प.सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते संपन्न



ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत


मंगळवार दि.१७ रोजी नारायणगावातील ४१ ठिकाणी २ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन नारायणगाव चे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा परिषद सदस्या सौ.आशाताई बुचके यांच्या हस्ते पार पडले.



             सौ.आशाताई बुचके यांच्या जि.प.पुणे निधीतून,ग्रामपंचायत नारायणगाव ग्रामनिधी व १४ व्या वित्त आयोगातून ,वार्ड नं.१ मध्ये ४१ लाख रु.वार्ड नं.४० लाख ७० हजार रु.वार्ड नं ३ मध्ये ६० लाख रु,वार्ड नं.४ मध्ये ६० लाख ५० हजार रु,वार्ड नं.५ मध्ये १८ लाख रु,वार्ड नं.६ मध्ये ३९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन  जि.प.सदस्या सौ.आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आले.



           आशाताईंच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे नारायणगावातील समस्त ग्रामस्थ विधानसभा निवडणुकीत नक्कीच आशाताई यांच्या सोबत असतील अशी अपेक्षा लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी यावेळी व्यक्त केली.




              या कार्यक्रमाच्या प्रसंगी  लोकनियुक्त सरपंच बाबुभाऊ पाटे,वि.स.सा.का.संचालक संतोषनाना खैरे,ग्रामविकास अधिकारी नाईकडे भाऊसाहेब,होडगे भाऊसाहेब,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,तंटामुक्ती अध्यक्ष औटी साहेब,उपसरपंच मानिशाताई मेहेत्रे,ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार,संतोष दांगट,रुपाली जाधव,सारिका डेरे,अनिता कसाबे,अश्विनी ताजने,राजेश भैय्या बाप्ते,बाळा वाव्हळ,सुप्रिया खैरे,कुसुम शीरसाठ,पुष्पा आहेर,रामदास अभंग,संगीता खैरे,गणेश पाटे,प्रवीण दिवटे,निलेश जाधव, संतोष गांधी,श्री विरोबा परिवाराचे बाळासाहेब पाटे,वासुदेव कानसकर,रोहिदास भुजबळ,मुक्ताई समाज मंदिराचे डी.के.भुजबळ,एकनाथ शेटे,अशोक पाटे,शंकरराव कोल्हे,राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अनिल खैरे,आशिष माळवदकर,हेमंत कोल्हे,सुदीप कसाबे,संदीप नाईक,अजित वाजगे,शेखर शेटे,गौरव खैरे,जालिंदर खैरे,रोहित भूमकर,संकेत क्षीरसागर,ईश्वर पाटे,अभि शेटे,समीर इनामदार,नंदू अडसरे,सर्वच प्रतिष्ठानचे सभासद,त्या त्या भागातील स्थानिक ग्रामस्थ,महिला वर्ग,मुस्लिम समाजाचे बांधव  तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Friday, September 13, 2019

वारुळवाडी ग्रामपंचायत विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूज आशाताई बुचके यांच्या हस्ते संपन्न

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत

 नाराय़णगाव: 
वारूळवाडी ग्रामपंचायत विभागातील विविध मंजूर विकास कामांचे भूमिपूजन सौ. आशाताई बुचके सदस्या जिल्हा परिषद पुणे,  श्री.संतोषनाना खैरे संचालक विघ्नहर सह. साखर कारखाना यांच्या हस्ते  झाले. अशी माहिती ग्रा. पं. सदस्य राजेंद्र मेहेर यांनी दिली.

         जि. प. सदस्या आशाताई बुचके यांच्या माध्यमातून विकास कामांचा मंजूर निधी १) चिमणवाडी सभामंडप रक्कम रुपये १० लक्ष, २) जगदंबा हुंडेकरी ते चिमणवाडी रस्ता करणे रक्कम रुपये २० लक्ष, ३) साई नगर रस्ता कॉंक्रीट करणे रक्कम रुपये ७ लक्ष, ४) वेताळबाबा मंदिर रस्ता करणे रक्कम रुपये १० लक्ष, ५) प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत बांधकाम करणे. ६) ठाकरवाडी रोड ते लंबोदर सोसायटी रस्ता करणे रक्कम रुपये ५ लक्ष, ७) ठाकरवाडी रोड ते मेहेर वस्ती रस्ता कॉंक्रीटकरणे रक्कम रुपये ३ लक्ष, ८) डिंभा कॅनॉल ते मेहेर वस्ती रस्ता करणे रक्कम रुपये २.५ लक्ष, ९) कडाळेवस्ती रस्ता कॉंक्रीटकरणे रक्कम रुपये ५ लक्ष, १०) ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती रक्कम रुपये ६ लक्ष, ११) ठाकरवाडी जि.प.शाळा इमारत संरक्षक भिंत बांधणे रक्कम रुपये ७ लक्ष, १२) गणपती मंदिर ते ठाकरवाडी (ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत) शाळा रस्ता डांबरीकरण करणे १२.५० लक्ष, १३) राजमहल हॉटेल ते कुबेर पार्क रस्ता करणे रक्कम रुपये १० लक्ष, १४) अभंगवस्ती रस्ता कॉंक्रीट करणे (रा.प.सबनीस हायस्कूल मागील) रक्कम रु.१० लक्ष, १५) इंदिरानगर अंतर्गत गटर योजना रक्कम रू. ५ लक्ष, १६) नंबरवाडी पाणी पुरवठा नवीन विहीर बांधणे. रक्कम रु. १५ लक्ष, १७) कॉलेज रस्ता ते संस्कृती सोसायटी रस्ता कॉंक्रीट करणे रक्कम रुपये ६ लक्ष, 



            यावेळी संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, आशिष फुलसुंदर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवदत्त संते, उपाध्यक्ष शिवनाथ मेहेर, सरपंच, जयश्री बनकर, उपसरपंच सचिन वारुळे, ग्रामपंचायत सदस्य विपुल फुलसुंदर, राजेंद्र मेहेर, जंगलभाऊ कोल्हे, परशुराम वारुळे, भाग्यश्री पाटे, जोत्स्ना फुलसुंदर, खुशाल काळे, वर्षा वऱ्हाडी, माया डोंगरे, सविता पारधी, मनाबाई भालेराव, सुनिता बटाव, अंजली संते, ईश्वर अडसरे, दशरथ जाधव, तसेच कर्मचारी वृंद ग्रामपंचायत वारूळवाडी, जीवन बुचके, अनिल गावडे, संदीपशेठ वारुळे, भाऊसाहेब बनकर, दिलीप मा. बनकर, बबननाना कानडे, मारुती गे. बनकर, डॉ.राजेंद्र कानडे, नारायण फुलसुंदर, बाळशिराम डोके, नबाजी फुलसुंदर, बाबुराव बनकर, शाम कानडे, अतुल कानडे, संजय बनकर, रविंद्र कानडे, संदेश डोके, संजय तु. कानडे,  झुंजार मित्र मंडळ चिमणवाडी महिला व सर्व सभासद आणि देवेंद्रशेठ बनकर (मा.सरपंच), जुबेर शेख, संदेश फुलसुंदर, योगेश लोखंडे, नवशक्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते, गणेश नायकोडी, अजय शिंदे, दिनेश मेहेर, वसंत मेहेत्र, गडगे सर, सुरेश मेहेर, बबन शिंदे, दशरथ फुलसुंदर, गुळवे सर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Wednesday, September 11, 2019

सम्राट अशोक नगर येथे घरदुरुस्ती शुभारंभ..

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ] कार्यकारी संपादक : अमर भागवत


नारायणगाव : 
                 येथील सम्राट अशोक नगर मधील १५ घरकुलांची घरदुरुस्ती शुभारंभ जि.प.सदस्या आशाताई बुचके व लोकनियुक्त सरपंच योगेश बाबुभाऊ पाटे यांच्या शुभहस्ते करणेत आले.



याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि,सम्राट अशोक नगरमध्ये इंदिरा आवास योजनेतून सन १९९२ मध्ये १५ घरकुले मागासवर्गीयांसाठी बांधणेत आली होती, तेव्हापासून आजतागायत त्यामध्ये सदर घरकुलधारक राहत होते परंतु सद्यस्थितीत सदर घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाले असलेबाबत स्थानिकांनी ग्रामपंचायत सदस्य राजेशभैय्या बाप्ते, सुप्रिया खैरे, विजय वाव्हळ यांचे निदर्शनास आणून दिले. सदस्यांनी स्थळ करून वस्तुस्तिथी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांना सांगितले त्यावर सरपंच यांनी तात्काळ घरकुल दुरुस्तीचा प्रस्ताव जि.प.सदस्या आशाताई बुचके यांचेकडे पाठविला. 
आशाताई बुचके यांच्या विशेष प्रयत्नातून जि.प.मार्फत सदर घरकुल दुरुस्तीसाठी ७.५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला.या घरकुल दुरुस्तीचा शुभारंभ व भूमिपूजन जि.प.सदस्या आशाताई बुचके व सरपंच योगेश पाटे यांच्या शुभास्ते नुकताच संपन्न करणेत आला.


यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे,विरोबा परिवाराचे अध्यक्ष बाळासाहेब पाटे,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,उपसरपंच मानिशा मेहेत्रे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे,तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी,ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार,संतोष दांगट,गणेश पाटे,सुप्रिया खैरे,पुष्पा आहेर,संगीता खैरे,आशिष माळवदकर अनिल खैरे,हेमंत कोल्हे,रोहिदास भुजबळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्ञानेश्वर औटी,संकेत क्षीरसागर यांनी तर आभार राजेश भैय्या बाप्ते यांनी मानले..

Sunday, September 1, 2019

नगर-कल्याण महामार्गावरील अपघातात २ ठार तर ५ जखमी


फोटो - नगर कल्याण महामार्गावर पेमदरा गावच्या हद्दीत अपघात झालेल्या मोटार कारची दुरावस्था ( छाया - विजय चाळक)
                                                                       आळेफाटा ( वार्ताहर )  

                            नगर कल्याण महामार्गावर पेमदरा गावच्या हद्दीत स्विफ्ट डिझायर मोटारकारच्या अपघातामध्ये दोन जण ठार तर पाचजण जखमी झाले असून म्रुतांमध्ये एका महिलेचा व मुलाचा समावेश आहे ही घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली 
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार शंकर भवारी यांनी दिलेली माहिती अशी की पारनेर तालुक्यातील कर्जुले येथील आंधळे कुटुंबीय स्विफ्ट मोटार कार ( क्र.एम एच १६ बी सी १३९९) मुंबईहून गावाकडे जात असताना नगर कल्याण महामार्गावर पेमदरा गावच्या हद्दीत वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटून मोटारकार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जोरात आदळून अपघात झाला या अपघातामध्ये शुभांगी आषिश आंधळे ( वय ३०) व यश सचिन आंधळे ( वय ११ वर्ष दोघेही रा कर्जुले ता पारनेर जि.अहमदनगर हे दोघेजण ठार झाले तर आषिश भास्कर आंधळे ( वय ३५ वर्ष) सचिन भिमा आंधळे( वय ३६वर्ष) प्राप्ती संजय आंधळे ( वय ११वर्ष) शिल्पा सचिन आंधळे ( वय ३०वर्ष) व आराध्या आषिश आंधळे (.वय ११वर्ष सर्वजण रा कर्जुले ता पारनेर जि.अहमदनगर)  हे जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत या अपघाताची फिर्याद मुरलीधर किसन औटी रा. राजुरी ता. जुन्नर जि.पुणे यांनी दिली असून पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक एस ए डौले करत आहेत