ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत
नारायणगाव :
यावेळी सर्वांना नियमांबद्दल सूचना करण्यात आल्या व त्यामध्ये सर्वांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे की आपल्या कडे येणाऱ्या ग्राहकाने गाडी रस्त्यामध्ये तर लावली नाही ना?त्यामुळे दुसऱ्यांना त्रास तर होत नाही ना?व्यापारी वर्गाने स्वतः मोठी गाडी न आणता छोटी गाडी घेऊन येणे,प्रत्येक व्यापाऱ्याला सूचित करन्यात येते की ट्रान्सपोर्टच्या गाड्या सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत आणू नये जेणेकरून ट्रॅफिकची समस्या होणार नाही,पत्राशेड गाळे धारकांनी फूटपाथ वर कुणीही काही साहित्य लावले तर ते सामान उचलण्यात येणार आहे फुटपाथ हे चालण्यासाठीच ठेवावे त्यावर कुणीही काहीही लावू नये असे उद्यापासून निदर्शनास आल्यास नारायणगाव पोलीस स्टेशन आणि नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या कडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक : अमर भागवत
नारायणगाव :
नारायणगावमध्ये होणारी ट्रॅफिक लक्षात घेता दि.११ रोजी नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे नारायणगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अर्जुन घोडे पाटील व नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच श्री.बाबुभाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव ग्रामपंचायत,नारायणगाव पोलीस स्टेशन आणि सर्व व्यापारी, जीप चालक संघटना, एसटी स्टँड शेजारील पत्रागाळेधारक व ग्रामस्थ बांधवांची बैठक लावण्यात आली होती.
यावेळी सर्वांना नियमांबद्दल सूचना करण्यात आल्या व त्यामध्ये सर्वांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे की आपल्या कडे येणाऱ्या ग्राहकाने गाडी रस्त्यामध्ये तर लावली नाही ना?त्यामुळे दुसऱ्यांना त्रास तर होत नाही ना?व्यापारी वर्गाने स्वतः मोठी गाडी न आणता छोटी गाडी घेऊन येणे,प्रत्येक व्यापाऱ्याला सूचित करन्यात येते की ट्रान्सपोर्टच्या गाड्या सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत आणू नये जेणेकरून ट्रॅफिकची समस्या होणार नाही,पत्राशेड गाळे धारकांनी फूटपाथ वर कुणीही काही साहित्य लावले तर ते सामान उचलण्यात येणार आहे फुटपाथ हे चालण्यासाठीच ठेवावे त्यावर कुणीही काहीही लावू नये असे उद्यापासून निदर्शनास आल्यास नारायणगाव पोलीस स्टेशन आणि नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या कडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जीप चालक संघटनेला देखील त्यांची एका जीपची जागा कायम करून दिलेली आहे , वरील नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे API श्री अर्जुन घोडे पा. यांनी नमूद केले आहे.
नारायणगावातील तमाम जनतेला देखील यावेळी आवाहन करण्यात आले आहे की प्रत्येकाने नियम पाळावे,आपल्या गाड्या योग्य ठिकाणी पार्क करावी जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही याची आपण एक जबाबदार नागरिक म्हणून काळजी घेतली पाहिजे असे आवाहन ग्रा प ना गाव चे वतीने सर्वांना करण्यात आले.
यावेळी नारायणगावचे API अर्जुन घोडे पाटील ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी ,उद्योजक अशोक गांधी ,ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, आशिष माळवदकर,राजेश बाप्ते, नारायणगाव पोलीस स्टेशन स्टाफ,व्यापारी वर्ग , ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होता..
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामपंचायत सदस्य गणेशभाऊ पाटे तर आभार शेखरभाऊ शेटे यांनी मानले.