ग्राहक समाचार
[ अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक: श्री. अमर भागवत
( नारायणगाव ) कोरोनाव्हायरस संसर्गामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. यातच संपूर्ण मानव जात भयभीत झाली आहे. यामुळे जगातील अनेक लोक आत्मिक समाधान आरोग्य व स्थैर्य याच्या शोधात आहे. याच अनुषंगाने सहज योग परिवाराच्या वतीने मोफत ऑनलाईन ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जगातील सुमारे १२० पेक्षा जास्त देशांमध्ये सहज योग ध्यानधारणा पद्धतीचा अवलंब करून अनेक साधक आत्मिक समाधान प्राप्त करीत आहे. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या माध्यमातून सहज योग ध्यान धारणा पद्धती उदयास आली आहे. ५ मे १९७० रोजी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी काही निवडक साधकांच्या बरोबर कुंडलिनी जागृती व ध्यान धारणा याचे महत्त्व शोधून काढले. त्याद्वारे सर्व समाजामध्ये सहिष्णुता, बंधुभाव व आत्मिक उन्नती याचा एक मोठा परिवार म्हणून सहज योग परिवार उदयास आला. येत्या पाच मे रोजी सहज योग परिवाराला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने सहजयोग परिवार पुणे प्रतिष्ठान यांच्या वतीने नवीन साधकांसाठी मोफत ऑनलाईन ध्यानधारणा शिबिराचे आयोजन तीन मे रोजी करण्यात आले आहे.
लॉक डाउनच्या काळात घरी बसून "सहजयोग ध्यान" - विनामूल्य शिकता येणार आहे. यानिमित्ताने ऑनलाईन कार्यक्रम, ३ मे २०२० रोजी सकाळी १०. ३० वाजता शास्त्रीय ज्ञान आणि दैवीय ज्ञान यांचा अनोखा सोहळा सर्वांना विनामूल्य जाणून घेता येणार आहे.
याबाबत सहजयोग परिवार महाराष्ट्र राज्याचे समन्वयक स्वप्नील तायडे यांनी सांगितले की, संसारातील सर्व शास्त्र आणि सद्गुरु सांगून गेलेत की, "स्व" ला जाणा. पण मनुष्य आनंद आणि सुखाच्या शोधात भटकत राहतो. अमिबा पासून उत्क्रांती होत मानवाचा जन्म झाला. मानवात स्थित असलेल्या कुंडलिनीच्या जागृती द्वारे आत्मसाक्षत्कार प्राप्त करून मानव "स्व" ला
जाणू शकतो. संतुलित जीवन आणि आरोग्य हे विनासायास घटित होते. आज कुंडलिनी जागृतीचे हे कार्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या असीम करुणा आणि कृपाशीर्वादात गेल्या ५० वर्षांपासून घटीत होत आहे.
५ मे २०२० रोजी सहजयोग ध्यान पद्धतीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या सुवर्ण महोत्सववर्ष पूर्ती निमित्ताने भारतीय नागरिकांसाठी रविवारी ३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन सहजयोग ध्यान धारणा कार्यक्रम आयोजित केला आहे .
या कार्यक्रमात दैनंदिन ध्यान , चक्र-संतुलन, चैतन्यलहरींचा दैनंदिन उपयोग आणि चिंतामुक्त जीवन पद्धती ह्या विषयावर प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.
लॉक डाऊन च्या काळात महाराष्ट्रातील नागरिकांना मराठी भाषेतून "सहजयोग ध्यान" ऑनलाईन शिकविण्यासाठी सहजयोग ध्यानकेंद्र 23 मार्च 2020 पासून काम करीत आहे. त्याकरिता मेडिटेशन हेल्पलाईन म्हणून टोल फ्री नंबर 1800 30 700 800 कार्यरत आहे.
आपले शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आपण घरी बसून स्वतः साठी दररोज अर्धा तास काढून सहजयोग ध्यान शिकता येते. यूट्यूब आणि ऑनलाईन रेडिओ च्या मार्फत सहजयोग ध्यान आपल्या मोबाईल/स्मार्ट टीव्ही वर दररोज संध्याकाळी ५ वाजता शिकविण्यात येत आहे. सहजयोग ध्यान हे विनामूल्य आहे.
जगभरात प्रत्येक देशात गेल्या ५० वर्षांपासून साप्ताहिक सहजयोग ध्यानकेंद्र कार्यान्वित आहेत. भारतात ३ हजार हून अधिक ध्यानकेंद्र आहेत. लॉक डाऊन मुळे ही सर्व ध्यानकेंद्र १४ मार्च पासून स्थगित असून श्री माताजी निर्मलादेवी यांचे निवासस्थान - प्रतिष्ठान, पुणे येथून युट्युब आणि फेसबुक लाईव्ह मार्फत ऑनलाईन ध्यानाचे कार्यक्रम सकाळी ५.३० वा आणि सायं ७ वाजता प्रसारित केले जातात. या द्वारे ७० देश्यातून अडीच लाख सहजयोगी साधक दैनंदिन ध्यानाचा फायदा घेत आहेत.
त्याद्वारे विषाणूमुक्त पृथ्वीसाठी जागतिक स्तरावर सामूहिक प्रार्थना आणि कोरोना विषाणू च्या लढाईत मानवी जीवन संरक्षण करणाऱ्या प्रशासन, पोलीस , आरोग्य सेवा, मीडिया आणि संबंधीतांच्या उत्तम मनोबल व आरोग्यासाठी दररोज सामूहिक प्रार्थना केली जाते.
सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दररोज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून दररोज सायं ५ वाजता विनामूल्य ध्यानाचे सत्र ऑनलाईन घेतले जात आहे . लॉक डाउनच्या काळात "घरबसल्या ऑनलाईन सहजयोग ध्यानाच्या" आतापर्यंत १४ कार्यशाळा मराठीतून झाल्या आहेत. आणि हजारो नागरीकांना त्याचा लाभ झाला आहे . तणावमुक्ती , व्यसनमुक्ती , मन:शांती प्राप्ती , चिंता -भीती दूर होणे आणि शांत झोप येणे यासारखे अनेक अनुभव गेल्या एक महिन्यात ह्या सर्व साधकांना आले आहेत.
सहजयोग स्वयं सेवक मोबाईल/व्हाट्सएपच्या मार्फत मोफत मार्गदर्शन करत आहेत. सदर भव्य ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्निल धायडे यांनी केले आहे.