नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथील ग्रामपंयत निवडणुकीचे पडघम जोरदारपणे उमटु लागल्याचे दिसुन येत आहे.या निमित्ताने सन 2021 ते 025 करिता होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ येथील सामाजीक कार्यकर्ते श्री. संजयशेठ वारुळे व त्यांच्या सहका-या सोबत विविध ठिकाणातील ( वार्ड क्रमांक 1 ते 6 ) मधुन फोडण्यात आला. यावेळी गणपीर बाबा पॅनेलच्या विविध उमेदवारांनी प्रत्येक प्रभागातुन शक्ती प्रदर्शनार्थ मतदारांच्या घरोघर भेटी घेण्यासाठी संपर्क साधला.गणपीर बाबा पॅनेलने गेल्या पंचवार्षीक ग्रामपंचायत कारकिर्दीच्या माध्यमातुन अनेक विकास कामे केली हे आजही येथील मतदार सांगताना विसरत नाही.या मध्ये मुख्यत: नुतन ग्राम संसद भवन ,नळपाणी पुरवठा योजना,रस्ते,बंदिस्त गटार योजना,विज प्रश्न,वयोवृध्द ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना - नाणी पार्क, बालोद्यान व व्यायाम शाळा उपकरणे उपक्रम, शाळा कॉलेज व खेडो पाड्याकडे जाणारे आणि गल्ली बोलातुन जाणा-या सिमेंट काॅंक्रेटीकरणाचे रस्ते, नारायणगाव व वारुळवाडीस जोडणारा पुल परिसराचे सुशोभीकरणाचा समावेश असणे हि त्यांच्या जमेची बाजु असल्याचे मतदार व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.एकंदरीत या निवडणुकीत गणपीर बाबा पॅनेलचे सर्व उमेदवार भरगोस मोठ्या मतांनी विजयी होतील असे ग्राहक समाचार विशेष प्रतिनिधीनी घेतलेल्या आढाव्यातुन समजते.
No comments:
Post a Comment