Wednesday, January 29, 2020

जयहिंद नॅशनल क्लब चा वर्धापनदिन उत्साहात संपन्न.

ग्राहक समाचार News / Web Chanal(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)

कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत

ग्रुप डान्स स्पर्धेत कलाविष्कार डान्स अकॅडमी आळेफाटा चा प्रथम क्रमांक

नारायणगाव / दि.३० /०१/२०२०

         सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा वसा व वारसा जोपासत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जयहिंद नॅशनल क्लबचा २५ वा वर्धापन दिन सोहळा  दि.२६ जानेवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाला असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष अरविंद लंबे यांनी दिली.

         जयहिंद नॅशनल क्लब च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन जुन्नर तालुका चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री.अमित बेनके यांच्या हस्ते पार पडले.   

      याप्रसंगी आयोजित केलेल्या भव्य ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये निवडक वीस संघांना सहभागी करून घेतले होते. यावेळी विविध पारंपरिक नृत्य तसेच कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग नोंदविला होता. प्रतिवर्षीप्रमाणे स्पर्धेला याहीवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

          स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
       याप्रसंगी शिवनेर भूषण तात्यासाहेब गुंजाळ, माजी सभापती शिवाजीराव खैरे, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास दरेकर, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश (बाबू)पाटे, माजी उपसरपंच संतोष दांगट, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर, लाला बँकेचे संचालक अशोक गांधी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मा. उपाध्यक्षा राजश्रीताई बोरकर,शरद बँकेच्या संचालिका पुष्पलता जाधव, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी,अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, अरिहंत ग्रुपचे रमेश गुगळे, ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग, श्रीराम पत संस्थेच्या संचालिका राजश्रीताई बेनके, लक्ष्मीनारायण देवस्थानचे उपाध्यक्ष सुदीप कसाबे, मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे सदस्य जयेश कोकणे, नारायणगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन शेंडे, डॉक्टर योगेश पाटील, ग्रामपंचायत येडगावचे सरपंच देविदास भोर, अतुल आहेर, रोहिदास केदारी,राजेंद्र कोल्हे,हेमंत कोल्हे तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

     याप्रसंगी पत्रकार श्री.अमर भागवत यांची नुकतीच अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने व पत्रकार अतुल कांकरिया यांना ग्रामोन्नती मंडळाचा  पुरस्कार मिळाळा त्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी आमदार अतुल बेनके,सरपंच योगेश (बाबू) पाटे, ज्ञानेश्वर औटी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
       मान्यवरांनी गेल्या पंचवीस वर्षातील क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करून कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
          या प्रसंगी प्रेक्षकांसाठी आयोजित केलेल्या विविध सोडतीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
         यावर्षीच्या भाग्यवान महिला सोडत पैठणीच्या मानकरी अनिता ढवळे मॅडम ठरल्या तर मोबाईल गिफ्ट श्री वायकर यांना मिळाले.
       

          ◆  भव्य ग्रुप डान्स स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक - कलाविष्कार डान्स अकॅडमी आळेफाटा
द्वितीय क्रमांक - डीजे वळसे पाटील कॉलेज शिंगवे पारगाव
तृतीय क्रमांक - साई कला मंच रायगड-अलिबाग
चतुर्थ क्रमांक - एस.आर.केदारी बालक मंदिर नारायणगाव
पाचवा क्रमांक - डी.सी.सी डान्स नारायणगाव
सहा क्रमांक - तेज ट्रेडिंग जुन्नर.
उत्कृष्ट हावभाव -  कर्तव्य डान्स अकॅडमी उत्कृष्ट वेशभूषा - अनंतराव कुलकर्णी 

शिस्तबद्ध ग्रुप - येडगाव प्राथमिक शाळा सर्वात दूरचा संघ - साई कला मंच अलिबाग.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अध्यक्ष अरविंद लंबे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील मेहेर व राजेश यांनी केले.
         सदर कार्यक्रमाचे नियोजन विजय गुंजाळ देवेंद्र कोराळे अशोक चाळक राहुल केवळे छगन पटेल धर्मेंद्र गुंजाळ नितीन आवटी श्रीकृष्ण कामाने कुरे मॅडम नरवडे सर एस आर घोलप सर केतन पोखरकर सचिन शंकर जाधव रोहित बनकर योगेश गुगळे अभिजित कुलकर्णी राहुल शिंगवी यांनी केले.
उपस्थितांचे आभार सत्यवान थोरात यांनी मानले.

नारायणगावमध्ये लहानग्यांनी भरविला भाजी बाजार,

ग्राहक समाचार News / web chanal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ)

शिवाई ज्ञानमंदिर संस्था व माऊली बालकमंदिर यांचा अनोखा उपक्रम

 नारायणगाव : दैनंदिन पुस्तकीज्ञाना व्यतिरिक्त. भविष्यातील जगण्याचे साधन असलेल्या व्यवहारी ज्ञानाची व कौशल्याची मुलांना ओळख व्हावी म्हणून शिवाई ज्ञानमंदिर शिक्षणसंस्था व माउली बालकमंदिर नारायणगाव यांचे संयुक्त विद्यमाने आठवडे बाजार व आनंद मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा हेमलता थोरात व पालकांचे  उपस्थित करण्यात आले.                                     इथले बाजारपण भाजीपाल्यापुरते मर्यादित न राहता. खाद्यपधार्थांची सुद्धा रेलचेल होती . शालेय मुलांनी तयार केलेल्या खास पदार्थांची चव चाखताना अनेकांनी कौतुक केले. याबरोबरच मेथी पालकासह वेगवेगळ्या फळे व शेंगभाज्या  विक्रीसाठी ठेवल्या होत्या . उत्पनापेक्षा आनंदाने गल्ला भरला होता .                      शहरी भागातील मुलांना घरातून नेहमीच मोलाची साथ मिळत असते मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते. तिथे आपणच आपले मार्गदर्शक  असतो म्हणून या आठवडे बाजारास विशेष महत्व आहे. व्यापाराची आवड व नफ्या तोट्याचे गणित मुलांना कळावे हाच मुख्य हेतू ठेऊन हा उपक्रम  राबविला जात आहे .                      मुख्याध्यापिका विभता कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली रेखा औटी, वृषाली लोखंडे, स्वाती सदामते, कल्याणी भालेराव, छाया वाजगे, संगीता कोल्हे, पूर्व प्राथमिक विभागाच्या स्वाती वाव्हळ, ज्योती गुळवे सेवक रेश्मा फकीर यांनी योग्य नियोजन व मार्गदर्शन केले पालक ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात हभाग घेतला .

श्री.विशाल दिलीप भुजबळ हे राष्ट्रीय युथ आयकॉन २०२० पुरस्कार ने सन्मानित



.
ग्राहक समाचार : News / web chanal
मा.विशाल भुजबळ यांना केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांच्या हस्ते राष्ट्रीय युथ आयकॉन हा मानाचा पुरस्कार प्रदान
 
नवीदिल्ली :    नारायणगांंव जिल्हा पुणे येथील येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रनिर्माण युवक संघाचे सर्वेसर्वा मा.विशाल दिलीप भुजबळ यांना राष्ट्रीय युथ फेडरेशनचा नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय युथ आयकॉन हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला 25 जानेवारी 2020 रोजी वाय.एम.सी.ए. ऑडिटेरियम नवी दिल्ली येथे केंद्रीय मानव संसाधन व सूचना,प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
   श्री.विशाल भुजबळ हे गेली 10 वर्षे  सामजिक क्षेत्रात पुर्णवेळ कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात दैनंदीन हे अग्रेसर असतात.सामाजिक क्षेत्रात आयोजित विविध सामाजिक उपक्रम राबविणे या सोबतच दिन दुबळ्या जनतेची सेवा करणे , प्रत्येक मासिक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग हा उत्साहवर्धक राहिलेला आहे.सर्वजण त्यांना ‘समाज दूत’ या नावाने ओळखतात. 
त्यांनी शैक्षणिक,सहकार, कृषि व सामाजिक क्षेत्रात  उल्लेखनिय कार्य केले आहे. एकत्र सामजिक कुटुंब पद्धतीचा आदर्श मा.विशाल भुजबळ यांनी समाजासमोर ठेवला आहे.काही दिवसांपुर्वी त्यांनी समाजदिनबंधु कार्याची सुरुवात केलेली आहे.त्यांच्या या सर्वांगिण बाबींचा,कार्याचा विचार करून राष्ट्रीय युथ फेडरेशन,नवी दिल्ली यांनी त्यांना यावर्षीचा ‘राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार 2020' पुरस्कराने सन्मानित केले आले.श्री.विशाल भुजबळ यांचे वरील सन्मानार्थ समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Sunday, January 26, 2020

सबनीस विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

ग्राहक समाचार News / Web Chanal
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत

नारायणगाव  |  ( दि.२६ ) गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरामध्ये ग्रामोन्नती  मंडळाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी समूहगीत,सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध प्रात्यक्षिके करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
           ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह अरविंद मेहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.
         एन.सी.सी.,स्काऊट व गाईड मधील छात्र सैनिकांनी ध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, विश्वस्त डॉ. श्रीकांत विदवंस,नंदाताई डांगे,कार्यवाह रवींद्र पारगावकर सर्व संचालक,  विविध विभागाचे प्रमुख शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी याप्रसंगी भारतीय संविधानाची  प्रास्ताविका वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.      
          यावेळी गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर, 
 श्री.अनंतराव इंग्लिश मीडियम स्कूल,श्रीमती एस. आर.केदारी बालक मंदिर,  श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन,कला, वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी विविध समूहगीत नृत्य व प्रात्यक्षिक सादर केली.यावेळी विदयार्थ्यांनी केलेल्या  मल्लखांबाच्या  प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.     
           उपमुख्याध्यापक व एन.सी.सी. कमांडिंग ऑफिसर रमेश घोलप यांचे सेवानिवृत्त होत असल्याबद्दल याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडू व कलाकार विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख भीमराव पालवे आणि राहुल नवले यांनी केले.

निमगाव सावामध्ये ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.


  ग्राहक समाचार News / Web Chanal
     कार्यकारी संपादक :श्री. अमर भागवत

              निमगावसावा :  श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. ज्ञानदेव गाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आज  26 जानेवारी हा 71 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला संविधान सरनामा (उद्देशिका ) सामूहिक वाचन करण्यात आले नंतर ध्वजरोहण करण्यात आले.               महाविद्यालयीन विद्यार्थी कु. स्वप्नील थिटे आणि रेश्मा येवले यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्राचार्य डॉ. विलास जोशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन या दिनाचे महत्व, इतिहास आणि आपले कर्तव्य याविषयीं मार्गदर्शन केले तसेच श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेचे 11जानेवारी रोजी 25 व्या वर्षात पदार्पण झाल्याने 2020 हे संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले.  
         या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य मा. पांडुरंग पवार, संस्थेचे सचिव गणपत घोडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष भालेराव, माजी सरपंच भालचंद्र उनवणे, माजी उपसरपंच गोविंद गाडगे, प्राचार्य डॉ. विलास जोशी, डॉ. वसंत गाडगे,माजी विद्यार्थी,  गावातील ग्रामस्थ,तसेच कनिष्ठ व वरिष्ठ  महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

नारायणगावात प्रजासत्ताक दिन व ग्रामसभा मोठ्या उत्साहात संपन्न

ग्राहक समाचार : news / web chanal
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत

       नारायणगाव : नारायणगावात ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई,तिरंगी झेंड्याची रोषणाई व गावतील बाजार पेठेत तिरंग्या रंगाच्या फुग्यांची सजावट करून देशाचा ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
              नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांचे अध्यक्षतेखाली नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करणे बाबतची बैठक झाली त्यानंतर नारायणगाव परिसरातील सर्व शाळा,अंगणवाड्या यांना खाऊ वाटप करण्यात आला,तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येलाच नारायणगाव मध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई व तिरंगी झेंड्याची फुग्यांची सजावट करण्यात आली.
                     ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या शुभहस्ते करणेत आले तसेच पूर्व वेस उपसरपंच मनीषा मेहेत्रे,ग्रामवैभव इमारत येथील संतोषनाना खैरे,ग्रामसचिवालय इमारत येथील योगेश पाडळे (सर्कल),ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य अधिकारी,दूध उत्पादक सोसायटी येथील चेअरमन,पश्चिम वेस संभाजी महाराज पुतळा येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश बाप्ते,प्राथमिक शाळा नंबर १ येथील रुपाली जाधव,प्राथमिक शाळा नंबर २ येथील अश्विनी ताजने,प्राथमिक शाळा नारायणवाडी येथील गणेश पाटे,प्राथमिक शाळा पाटे खैरे मळा येथील संगीता खैरे,प्राथमिक शाळा बागलोहरे गावठाण येथील श्रीमती पुष्पा आहेर,प्राथमिक शाळा कोल्हेमळा येथील कुसुम शिरसाठ,प्राथमिक शाळा दरांदाळे मळा येथील सारिका डेरे,प्राथमिक शाळा आर्वी केंद्र येथील अनिता कसाबे,जि.प.प्राथमिक उर्दू शाळा येथील ज्योती दिवटे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहनानंतर मुक्ताई समाज मंदिर येथे ग्रामसभा पार पडली,
ग्रामसभेत विविध ठराव मांडण्यात आले,
गावात ग्रामरक्षक दल समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक नितीन नाईकडे यांनी समस्त ग्रामस्थांना दिली.
यावेळी शालेय विद्यार्थी,शिक्षक,अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कै. हरिभाऊ (बाबू मामा) शेटे यांच्या स्मरणातील अनामिकाचा क्रांतीचा पाळणा

ग्राहक समाचार news & web chanal
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत

नारायणगाव :दि.२६ जानेवारी २०२०
            ब्रिटिश राजवटीत  स्वातंत्र्यासाठी भारतात अनेक आंदोलने झाली.लाखो लोकांनी यात भाग घेतला.लाठी, गोळ्या झेलल्या.वंदे मातरम चा घोष करत निर्भयपणे फाशीचा दोर स्वीकारला.ऑगस्ट महिन्यातस्वातंत्र्य मिळाले.  भारत छोडो चळवळही चळवळ ही याच महिन्यातली.संपूर्ण ऑगस्ट महिन्यावर स्वातंत्र्य चळवळीची छाप आहे.चळवळीत अनेक कवींनी देशभक्तीपर गीते गाऊन समाज जागृती करण्याचे काम केले. अगदी अल्पशिक्षित शेतकरी काम करणाऱ्या पासून कुसुमाग्रजांसारख्या प्रतिभावान दिगग्ज कवीं पर्यंत सर्वांनीच क्रांतीचा जयजयकार केला. यातील अनेक गीते कालौघात नष्ट झाली कारण कोणी ती लिहून ठेवली नव्हती की छापली नव्हती.परंतु लोकांच्या कंठात आणि अंतकरणात मात्र ती घट्ट स्थान मिळवून बसली होती.
      नारायणगाव येथील कै. हरिभाऊ (बाबू मामा) मल्हारी शेटे ब्रिटिश राजवटीत जाचक महसूल कराच्या वरवंट्याखाली कुटुंब भरडले गेले होते.भूमिहीन झालेल्या बाबू मामांनी अखेर मुंबईची वाट धरली मुंबई सेंट्रल स्थानकांवर वर्षानुवर्ष हमाली केली व झाल्यावर गावी परतले बाबू मामांनी किशोरावस्थेत ४२ सालचे आंदोलन पाहिले होते.  त्यांच्या लहानशा खेड्यात क्रांतीची गीते इतर मुलांबरोबर गायली होती असेच एक गीत क्रांती देवीचा पाळणा कुणी अनामिक कवीने रचलेला कुठेही न लिहून ठेवलेला ना छापलेला पण वयाच्या ९३ वर्षे वयाच्या बाबूूमामांच्या स्मरणात घट्ट कोरलेला होता. 
          दि १८ जानेवारी २०२० रोजी बाबू मामांना देवाज्ञा झाली त्यांच्या आठवणीतील एक पाळणा गीत त्यांना श्रद्धांजली रूपाने ग्राहक समाचार मध्ये प्रसिद्ध करत आहोत.
 
असा आहे क्रांती देवीचा पाळणा - 

  ८ऑगस्ट १९४२ सालात
 चले जावचा ठराव मुंबई शहरात 
पुढारी सारे टाकले तुरुंगात 
आम्हाला नाही कळले खेड्यात
 जो बाळा जो जो रे जो ||

   ब्रिटिश सरकारने कावा दाविला 
अटक केली गांधीबाबाला 
तेव्हाच क्रांती आली जन्माला 
जो बाळा जो जो रे जो ||

    पहिल्या दिवशी चा पहिला प्रकार
 ट्रामागाड्यांचा केला चक्काचूर 
बंदोबस्ताला गोरे लष्कर 
जो बाळा जो जो रे जो ||
 
     दुसऱ्या दिवशी दुसरा निर्धार
 ऑगस्ट क्रांतीचे नेते शूर
 जयप्रकाश नारायण धावले म्होरं
 क्रांती करण्याला व्हावं तैयार
 जो बाळा जो जो रे जो ||
 
     तिसऱ्या दिवशी तिसरा डाव
 क्रांतिवीर बोलती अच्युतराव 
लहान थोरांनी खेड्यात जावं
क्रांती देवीला संग न्यावं
 जो बाळा जो जो रे जो ||

      चवथ्या दिवशी चौथा प्रकार
 क्रांतिवीरांनी केला विचार 
राम मनोहर लोहिया डॉक्टर
 रेडिओवरून बोलती सारं
जो बाळा जो जो रे जो ||

  पाचव्या दिवशी पाचवी होई
अरुणा असफअली धावुनी येई
साऱ्या देशाला संदेश देई
 क्रांती देवीची पूजा करावी
जो बाळा जो जो रे जो ||

   सहाव्या दिवशी सहावा करा
 खांब पाडून तोडा विजेचा तारा
 आगगाड्या तुम्ही बंदची करा 
गोरा साहेब तेथेची धरा
 जो बाळा जो जो रे जो ||

    सातव्या दिवशी सातवा धडा 
कोर्टकचेऱ्यावर मोर्चाची काढा
 पोस्ट ऑफिसे बंदची पाडा
 नोकरशाहीनो नोकऱ्या सोडा
 जो बाळा जो जो रे जो ||

     आठव्या दिवशी अवतार आठवा 
नाना पाटीलांना लवकर भेटवा
 गोरगरिबांचा अन्याय मिटवा 
गुंड लोकांना  माघारी हटवा
 जो बाळा जो जो रे जो ||

    नवव्या दिवशी नवरत्न हार 
नाना पाटील क्रांतीचे विर
भूमिगत होऊनी सांगती सारं 
स्थापन केले पत्री सरकार 
जो बाळा जो जो रे जो ||

      दहाव्या दिवशी दहावा गण
 सानेगुरुजी माते प्रमाण
 तिरंगी झेंडा फडकवी निशाण
 जो बाळा जो जो रे जो ||

     अकराव्या दिवशी अकरावा झाला सुभाषबाबूंनी मंत्र ही दिला 
आझाद सैनिकांनो जय हिंद बोला
 एकजुटीने दिल्लीला चला
 जो बाळा जो जो रे जो ||

      बाराव्या दिवशी बारावा रंग 
लहानथोर झाले क्रांतीत दंग
 स्वातंत्र्यलढ्याचे वाजले शिंग
इंग्रजांचे राज्य झाले दुभंग 
जो बाळा जो जो रे जो ||
  
        क्रांती जन्मली मुंबई शहरात 
आनंद झाला हिंदुस्थानात 
पाचवी पुजली बिहार देशात 
पाळणा बांधीला सातारा जिल्ह्यात
 जो बाळा जो जो रे जो ||

    माय बहिणींनो विनंती ऐका 
राष्ट्रीय पाळणा येथून घोका
 इंग्रजी सत्तेचा ओळखा धोका
कवीची विनंती आव नका
जो बाळा जो जो रे जो ||
              (संग्राहक - मंगला नायडू)

Wednesday, January 22, 2020

जयहिंद नॅशनल क्लब च्या रौप्यमहोत्सवा निमीत्त सांस्कृतिक व विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्राहक समाचार ( अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : अमर भागवत
            नारायणगाव:येथील सामजिक कार्यात  अग्रेसर असणार्या जयहिंद नॅशनल क्लब च्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त्त विविध सांस्कृतिक व भव्य ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन जयहिंद पलेस कार्यालयात करण्यात आल्याची माहिती क्लब चे अध्यक्ष अरविंद लंबे यांनी दिली.
     जयहिंद नॅशनल क्लब च्या वतिने प्रतिवर्षी वर्धापनदिन साजरा केला जातो.डान्स स्पर्धेचे हे सलग पंधरावे वर्ष आहे. प्रतिवर्षी या स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद मिळतो. स्पर्धेतील विजेत्या संघांना तसेच सहभागी सर्व संघांना अनेक भव्य बक्षिसे व गिफ्ट व्हाउचर्स  तसेच उपस्थित महिला व पुरुष प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू  सोडतचेही आयोजन केले आहे.कार्यक्रमास नवनिर्वाचित युवा आमदार अतुल बेनके,लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे ,जयहिंद उद्योग समुहाचे अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ,माजी सभापती शिवाजीराव खैरे,जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जयहिंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष विजय गुंजाळ यांनी दिली.
 स्पर्धेची बक्षिसे पुढील प्रमाणे:- 
प्रथम क्रमांक:१०००१/-रुपये ,द्वितीय क्रमांक: ८००१/- रुपये ,तृतीय क्रमांक:६००१/- रुपये,चतुर्थ क्रमांक ४००१/-रुपये तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी,गिफ्ट व्हाऊचर,व अनेक वैयक्तिक व सांघिक बक्षिसे. नाव नोंदणी संपर्क:जयहिंद पतसंस्था मो.नं.९९६०५३४९२७

Thursday, January 16, 2020

नारायणगाव येथील छाप्यात ७ लाख २४ हजार २१५ रुपये किमतीचा गुटखा जप्त

ग्राहक समाचार न्यूज
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
 
           दि.१५ जानेवारी २०२० रोजी तंबाखूजन्य पानमसाला व स्वादिष्ट सुपारीची बेकायदेशीर पणे विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्या प्रकरणी जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना  व त्यांच्या  पथकाने नारायणगावच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनगरवाडी येथे छापा टाकून  ७ लाख २४ हजार २१५ रुपये किमतीचा गुटखा जप्त केल्याची माहीती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
                  याबाबतची फिर्याद वंदना विठ्ठलराव रुपनवर  अन्न सुरक्षा अधिकारी, सह आयुक्त पुणे विभाग ,अन्न व औषध प्रशासन म.राज्य, पुणे,यांनी दिली असून
यातील आरोपी १) गणेश मारुती शेळके वय ३५ वर्ष रा . धनगरवाडी ता . जुन्नर जि. पुणे २) बलराव सर्वेश्वर बेहरा वय २२ रा . धनगरवाडी ता . जुन्नर जि. पुणे यांनी 
रु.७ लाख २४हजार २१५/ रु.किमतीचा   राजविलास पानमसाला हिरवा , विमल पानमसाला जांभळा ,विमल पानमसाला ब्राऊन , विमल पानमसाला , विमल पानमसाला पिंक  , आर एम डी पानमसाला निळा , आर एम डी पान मसाला लाल ,एक सुगंधीत तंबाखू. , गोवा 1OOO, सागर पान मसाला , एस आर तंबाखू ,व्ही 1 तंबाखू ब्राऊन ,व्ही 1 तंबाखू पर्पल ,व्ही 1 तंबाखू पिंक , रजनीगंधा पान मसाला ,हिरा पान मसाला , रंग बाझ पान मसाला , आंटी नंबर 1,  राजू विलायची सुपारी ,सावर या गोल्ड , आर बी झेड च्युविंग टोबॅको , रॉयल टॉबको , प्रिमियम एम पी या सर्व प्रकारचा  एकूण ४९४.७६ किलो वजनाचा गुटखा महाराष्ट्र राज्य अन्नसुरक्षा आयुक्त यांच्या आदेश क्रमांक असुमाका आधी सुचना -९०१७ अन्वये दिनांक १९/ ७ /२०१९ पासून एक वर्षात महाराष्ट्र राज्यात पान गुटखा मसाला किंवा अंतरीम गुटखा पान मसाला गठीत होऊ शकेल इ. उत्पादन साठा वितरण वाहतूक तसेच विक्री यावर बंदी घातलेल्या नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर भा.द.वि.कलम - २७२,२७३ अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६(२), २६(४),३०(२)(ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अर्जुन घोडे पाटील हे करीत आहेत.

             दि. २१ डिसेंबर २०१९ रोजी  स.पो.नि.अर्जुन घोडे पाटील यांनी नारायणगाव येथे सापळा रचून बेकायदा साठा असलेला ५१ लाख ६० हजार ८०० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा ट्रक जप्त केला होता.

नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतूक सुरक्षा सप्ताह कार्यक्रम संपन्न

ग्राहक समाचार न्यूज
कार्यकारी संपादक : अमर भागवत
15/01/2020  रोजी
नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतूक सुरक्षा सप्ताह  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
          यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशन व डोळे फाउंडेशन नारायणगाव, अद्वैत होंडा नारायणगाव यांचे संयुक्त विद्यमाने ट्रक, कंटेनर, टँपो चालकांचे डोळे तपासणी करण्यात आली. 
           दरम्यान टु व्हीलर ट्रिपल सिट , विना हेल्मेट ,सिट बेल्ट न लावणे यांबाबत मार्गदर्शन करून नियमांचे पालन न करणाऱ्यांना गुलाबाचे फुल  देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना माहिती पत्रक वाटण्यात आले. 
      यावेळी RTO पोपट पाटील, नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी , डाॅ. संदीप डोळे, अद्वैत होंडाचे यज्ञेश औटी उपस्थित होते.