ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव | दि.26/6/2020 रोजी मौजे शिरोली गावचे हद्दीत खडसर माळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे काही इसम बेकायदा व विनापरवाना रम्मी नावाचा जुगार पैशावर खेळत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांच्याकडून 1,44,450 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
1)सचीन पांडुरंग जावळे 2) बाळू भाऊ जाधव 3) बबन नाशिर बेपरी 4 ) गवस बंडू भाई इनामदार 5) सुरेश भाऊ खराडे 6) नंदकुमार वसंत डावखर 7) राजेंद्र शंकर जाधव अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत संतोष अंकुश दुपारगुडे पो.कॉ. 1344 नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.26 रोजी शिरोली गावचे हद्दीत खडसर माळा येथे पत्र्याच्या शेड मध्ये सदर आरोपी हे बेकायदा बिगर परवाना रम्मी नावाचा जुगार पैशावर खेळत असताना एकूण 11 हजार रोख रक्कमेसह 5 मोटार सायकल असा 1,44,450 रुपये चा माल व जुगाराचे साधने मिळून आले आहेत. त्यांच्यावर म.जु. प्र.कायदा कलम 12(अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जुन्नर उप विभागीय अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि घोडेपाटील , पोना शिंदे, पोशी दुपारगुडे , पोशी वाघमारे यांनी केली आहे.