नारायणगाव : पुणे ग्रामीणचे
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी
जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार खेड जुन्नर भागात रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा तपास करत असताना बंद घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्ड वरील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
सागर मनोज विटकर वय 26 रा.नारायणगाव वाजगे आळी हा नारायणगाव बस स्टॅन्ड या ठिकाणी संशयित रित्या फिरताना आठळला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवा उडविची उत्तरे दिली म्हणून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट च्या खिश्या मध्ये 3 मोबाइलल मिळून आले त्या बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता ते मोबाइलल त्याने वाजगे आळी नारायणगाव येथून चोरल्याचे सांगितले.
त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने त्या घरातून एक सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.
सदर बाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.381/2020 भा.द.वि 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.तसेच यापूर्वी या आरोपीवर
1) जुन्नर पोस्टे गु.र.नं 91/2014 भा.द.वी. कलम 395
2) जुन्नर पोस्टे गु.र.नं 82/2014 भा.द.वी. कलम 392
3) घोडेगाव पोस्टे गु.र.नं.49/2014 भा.द. वि कलम 395 पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीची वैदकीय तपासणी करून नारायणगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांच्या सुचने नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारे,
पोहवा.विक्रम तापकीर,पोना.दीपक साबळे,
पोशी. संदीप वारे,पोशी. अक्षय नवले,पोशी. निलेश सुपेकर,पोहवा.हनुमंत पासलकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment