Saturday, October 31, 2020
खेड घाट बायपास रस्त्याचे व विद्युतीकरणाचे काम लवकर पूर्ण करा - खा.डॉ.अमोल कोल्हे
Tuesday, October 27, 2020
नारायणगाव येथे दारू वाहतुक करणारे दोघेजण LCB च्या जाळ्यात!5, 20, 504 रु.चा मुद्देमाल जप्त
पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ.श्री.अभिनव देशमुख यांनी दिलेल्या अवैद्य धंद्यांवर कडक कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आज दि. 27/10/2020 रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नारायणगाव-खोडद रस्त्याने एक स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम. एच. 12 एल. पी. 9996 ही भरधाव वेगाने व संशयास्पदरित्या खोडद गावच्या दिशेने जाताना दिसली
कुकडी कालव्यालगच्या तळ्यात मोटार कार कोसळली : जाधववाडीच्या तरूणांनी वाचविले मोटारकार मधील तिनजणांचे प्राण
Monday, October 26, 2020
अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या दोन 19 वर्षीय तरुणांना नारायणगाव पोलिसांकडून अटक व येरवडा कारागृहात रवानगी
वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सह्याद्री लॉजवर नारायणगांव पोलिसांचा छापा
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ओझर रस्त्यावर असलेल्या धनगरवाडी येथील सहयाद्री लॉज वर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच जुन्नरचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.मंदार जवळे व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डी.के गुंड यांनी नारायणगाव पोलीस स्टाफ सोबत घेऊन सदर लॉजवर छापा मारला असून लॉजच्या मॅनेजर ला ताब्यात घेतले आहे.
दिनांक 24/10/2020 रोजी माननीय स.पो.नि. डि.के गुंड यांना गुप्त माहिती दारा मार्फत बातमी मिळाली की सह्याद्री लॉज, कारखाना फाटा, धनगरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, येथे इसम नामे प्रवीण राम जाधव वय 32 वर्षे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवून स्वतःची उपजिविका करत आहे सदर बातमीची दखल घेत सपोनि डि.के गुंड यांनी सदर बातमीचा आशय माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जवळे सो यांना कळविला सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जवळे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून सदर छापा कारवाईसाठी पोलीस स्टाफ, पंच व बनावट गिऱ्हाईक यांना योग्य ते मार्गदर्शन करून छापा कारवाई साठी रवाना केले.
सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक यांनी यांनी जाऊन वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली त्याप्रमाणे सह्याद्री लॉज चे मॅनेजर मॅनेजर प्रवीण राम जाधव यांनी वेश्या गमनासाठी महिला पुरवून त्यांचेकडून एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली लागलीच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी सो मंदार जवळ यांनी व पोलीस स्टाफ व पंच यांनी सदर ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारी पीडित महिला हिला ताब्यात घेऊन लॉजचे मॅनेजर प्रवीण राम जाधव यांना ताब्यात घेतले आहे आहे तसेच सह्याद्री लॉजचे मॅनेजर प्रवीण जाधव यास मा. न्यायालय जुन्नर हजर केले असता असता त्यांची एक दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक श्री.विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जावळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड हे करीत आहेत.