Wednesday, May 20, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

ग्राहक समाचार News Portal
【अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ】
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
(अध्यक्ष - अ. भा. ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका)

नारायणगाव प्रतिनिधी :
              कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर 
नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दि.२० रोजी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड, वॉर्डन व पोलिस मित्रांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
           याप्रसंगी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बोळीज, वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डाॅ.सदानंद राउत, डाॅ.अमेय डोके यांनी या तपासणी शिबिरात सहभाग घेतला .
             पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड, वाहतुक वार्डन,पोलीस मित्र यांची कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त तपासणी, ब्लड प्रेशर, ई.सी.जी, शुगर तपासणी, रिपीड प्रोफाईल टेस्ट करण्यात आली. तसेच दैनदिन कामकाज मध्ये कोरोना चा आजार होवु नये म्हणुन काय उपाय योजना कराव्यात, जेवण कसे करावे या व इतर महत्त्वाच्या सुचना डॉक्टरांनी दिल्या. जे पोलीस कर्मचारी हे वय वर्षे ५० वर्षा च्या पुढील वयाचे असतील त्यांनी विशेष काळजी घेण्याबाबत सुचना दिल्या.
        या वेळी पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड, वाहतुक वार्डन,पोलीस मित्र यांना सुप्राडिन, व्हिटामिन सी च्या गोळयांचे वाटप करण्यात आले.
             डॉ. वर्षा गुंजाळ,डाॅ सदानंद राउत,डाॅ.अमेय डोके यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन देखील केले.
            याप्रसंगी नारायणगाव पोलीस स्टेशनचे २ अधिकारी ३५ कर्मचारी, तसेच २० होमगार्ड, ४ वाहतूक वॉर्डन व ५ पोलीस मित्र उपस्थित होते. 
सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment