Sunday, May 17, 2020

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप...!

ग्राहक समाचार News Portal
[ अ. भा. ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
(अध्यक्ष : अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती
जुन्नर तालुका ९१३०३४९२९० )
नारायणगाव: कोवीड 19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ  आयुष विभागाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर होमियोपॅथि मेडिसिन इम्युनिटी बूस्टर म्हणून सुचविले त्या अनुषंगाने नारायणगाव ग्रामपंचायतीने अर्सेनिक अलबम ३० पोटेन्सी ह्या गोळ्या विकत घेतल्या असून नारायणगावातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 
वार्डनिहाय ग्रामपंचायत सदस्यांमार्फत नागरिकांना घरपोच गोळ्या मोफत वाटण्यात येणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच योगेश (बाबू) पाटे यांनी सांगितले.
            दि.१६ मे रोजी प्रातिनिधिक स्वरूपात १० कुटुंबाना जि. प.सदस्या आशाताई बुचके, श्री. विघ्नहर सह.साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे,लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे तंटामुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी,वैद्यकीय अधिकारी वर्षाताई गुंजाळ,पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे,संजय वारुळे यांच्या हस्ते रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
                 यावेळी ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, राजेश बाप्ते, गणेश पाटे, भाग्येश्वर डेरे, निलेश जाधव, ईश्वर पाटे, अनिल खैरे, अजय पाटे,जालिंदर खैरे, अजित वाजगे,हेमंत कोल्हे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते..

No comments:

Post a Comment