ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत [ अध्यक्ष - अ. भा. ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका ]
नारायणगाव (दि.२०) - अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फौंडेशन, कोल्हापुर या राष्ट्रीय स्तरावर काम करणार्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातुन कोरोना पार्श्वभूमी जीवाची बाजी लावुन काम करणार्या विविध क्षेत्रातील कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात येत आहे.
याचनिमित्ताने आज जिल्हास्तरीय कोविड १९ समाजरक्षक सन्मान २०२० ने पत्रकार क्षेत्रातील कार्याबद्दल सजग टाईम्स व शिवनेर प्राईम समुहाचे मुख्य संपादक पत्रकार प्रा.अशफाक पटेल यांचा व सामाजिक कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अनिल खैरे यांचा सन्मान करण्यात आला.
याआधी नारायणगाव चे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांसह कोरोना काळात कौतुकास्पद कार्य करणार्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.
आज सकाळी नारायणगाव येथे जि.प.सदस्य आशाताई बुचके, कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, प.स.सदस्य दिलिप गांजाळे, माजी उपसरपंच संतोष दांगट, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, अविष्कार संस्थेचे पदाधिकारी दिपक डेरे, आशा वर्कर यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थिती मान्यवरांनी कौतुक करत कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा.पटेल बोलताना म्हणाले की, सदर पुरस्कार जीवाची बाजी लावुन नागरिकांची काळजी घेणार्या व समाजाच्या सुरक्षेसाठी काम करणार्या डाॅक्टर, पोलिस, आरोग्यसेविका, प्रशासन, पत्रकार यांसह विविध सामाजिक संस्था व ज्ञात अज्ञात काेरोना योद्धांना समर्पित करत असुन सर्व नागरिकांनी स्वत:च्या, परिवाराच्या, गावाच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या व देशाच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील राहुन नियमांचे पालन लवकरात लवकर कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment