Saturday, May 2, 2020

कोरोना पार्श्वभूमीवर यु.एन.महेता फाऊंडेशन, टोरे॑ट ग्रुप, महेश गॅसच्यावतीने किराणा साहित्य वाटप

                     ग्राहक समाचार
     [ अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ] 
            कार्यकारी संपादक: श्री. अमर भागवत
नारायणगाव - यु.एन.महेता फाऊंडेशन, टोरे॑ट ग्रुप, महेश गॅसच्यावतीने मॅनेजिंग डायरेक्टर श्रीधर ताम्रपर्णी, मॅनेजर सतिश पटेल यांच्या माध्यमातुन व उद्योजक बाळासाहेब ढोकले, पत्रकार प्रा.अशफाक पटेल यांच्या सहकार्याने गरजु कुटुंबांसाठी ग्रामपंचायत नारायणगावला ५० किराणा किटची मदत करण्यात आली.
कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामीण भागात अनेक गरिब कुटुंबं आर्थिक अडचणीत सापडलेली आहेत. अशा अडचणीत सापडलेल्या गरजु कुटुंबासाठी मदत नव्हॆ सहकार्य भावनेतून यु.एन.महेता फाऊंडेशन, टोरंट ग्रुप, महेश गॅसकडुन ग्रामपंचायत नारायणगाव येथे गरजु कुटुंबांसाठी संपुर्ण किराणा किट नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले. 

यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे, उपसरपंच सारिकाताई डेरे, माजी उपसरपंच संतोष दांगट, मनिषाताई मेहेत्रे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, राजेश बाप्ते, रुपाली जाधव, पुष्पा आहेर, ज्योती दिवटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, उद्योजक बाळासाहेब ढोकले, पत्रकार प्रा.अशफाक पटेल, अनिल खैरे, ईश्वर पाटे, जालिंदर खैरे, आदिनाथ खेडकर उपस्थित होते.

1 comment: