दि.४ डिसेंबर २०२० रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव येथील पूर्व वेशिजवळ एका स्थानिक इसमाकडून सापळा रचून गावठी रिव्हॉल्व्हर हस्तगत करून सदर आरोपीस ताब्यात घेतले आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिली.
दिनांक ४/१२/२०२० रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री डी के गुंड यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की नारायणगावमध्ये खेबडे वडापाव समोर चौकामध्ये एक इसम गावठी बनावटीचा रिव्हॉल्व्हर घेऊन येणार आहे असे सांगितले असता लागलीच पोलीस कॉस्टेबल दिनेश साबळे, पो.कॉ. सचिन कोबल, पो.हवा टाव्हरे, पो.कॉ. दुपारगुडे ,पो.कॉ. जायभाये, पो.ना. शेख यांना खाजगी वाहनाने जाण्यास सांगितले साधारण ०८:४५ वाजता एक इसम हा चौकामध्ये आला त्याच्या हालचाली या संशयास्पद वाटल्याने लागलीच पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साबळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांनी त्याला जागीच पकडले.
सदर पकडलेल्या इसमाकडे अधिक चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याचे नाव पत्ता विचारले त्याने त्याचे नाव नंदकुमार बाळासाहेब साळुंके रा.नारायणगाव टेलिफोन कार्यालय समोर तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले त्यावेळी तो कावराबावरा होऊन त्याने खिशात हात घालून काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करू लागला म्हणून त्याचा संशय आल्याने सोबतच्या पंचांसमक्ष त्यास त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकड़े खालील वर्णनाचा एक गावठी बनावटीचा रिवाल्वर मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे २०,०००/- रू किमतीचा गावठी बनावटीचा रिव्हॉल्व्हर त्यात सहा होलचे मॅक्झिन त्याची लांबी २० सेंटीमीटर ०९ मिली तसेच बॅरलची लांबी ०८ सेंटीमीटर २ मिली तसेच स्ट्रेगर तसेच लोखंडी व लाकडी बट असलेली मिळून आल्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी नंदकुमार बाळासाहेब साळुंके रा.नारायणगाव ता जुन्नर जि पुणे हा बेकायदा बिगर परवाना आपले कब्जात २०,०००/- रू .किं गावठी कट्टा रिव्हॉल्वर सह मिळून आल्याने पो.कॉ दिनेश दत्तात्रय साबळे यांनी फिर्याद दिली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जवळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस कॉ. दिनेश साबळे, पो.कॉ सचिन कोबल, पो.कॉ. संतोष दुपारगुडे, पो.कॉ. शाम जायभाये यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के डी ढमाले हे करीत आहे.
No comments:
Post a Comment