आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फॉरेस्ट च्या जंगलात अवैधरित्या पैसे लावून पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या १२ जणांवर आळेफाटा पोलिसांनी छापा टाकून कारवाई करून त्यांच्याकडून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एम.ए.पवार यांनी दिली.
आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक
एम.ए.पवार यांना खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की , मौजे आळे खापरवाडी साकुरची खानावळ मागे कळमजाई माता मंदिराकडे जाणारे रोडवर फॉरेस्टच्या जंगलात डोंगराच्या कडेला काही इसम स्वता:च्या फायदयाकरीता पत्यावर पैसे लावुन जुगाराचा खेळ खेळत असल्याची खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. .
सदर छाप्याच्या कामी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच आळेफाटा पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावुन पत्याचे पानावर जुगार खेळताना छापा घातला त्यामध्ये १ ) मारुती बबन गुंजाळ , वय ४० वर्षे , रा . आळे , ता . जुन्नर , जि . पुणे . २ ) उमेश मुक्ता गोफणे ,वय ४५ वर्षे , रा .आळे , ता . जुन्नर , जि . पुणे , ३ ) दिनेश दगडु शिरतर , वय ३० वर्षे , रा.आळे , ता . जुन्नर , जि . पुणे , ४ ) नसिर अहमद पठाण , वय ३८ वर्षे , रा . धारगाव ता . संगमनेर , जि . अ . नगर , ५ ) गजानन बाबुराव इंगोले , वय ३६ वर्षे , रा . आळे , ता . जुन्नर , जि . पुणे , ६ ) सुभाष ज्ञानदेव मुसळे , वय ४० वर्षे , रा . शुभम तारांगण , आळेफाटा , ता . जुन्नर , जि . पुणे , ७ ) विश्वनाथ बबन फावडे , वय ४३ वर्षे , रा . बेल्हे , ता . जुन्नर , जि . पुणे , ८ ) रंगनाथ चिंतामण काळे , वय ५० वर्षे , रा . खोडद , ता . जुन्नर , जि . पुणे , ९ ) दत्तात्रय सदाशिव फापाळे , वय ५० वर्षे , रा . जाचकवाडी , ता . संगमनेर , जि . अ.नगर १० ) सुनिल बन्सी कु-हाडे , वय ३४ वर्षे , रा . आगरमळा , आळे , ता . जुन्नर , जि . पुणे , ११ ) दिनेश पोपट गुंजाळ , वय ३० वर्षे , रा . आळेफाटा , ता . जुन्नर , जि . पुणे , १२ ) महेश नानासाहेब शेळके , वय ३० वर्षे , रा . शेळकेमळा , बोटा , ता . संगमनेर , जि . अहमदनगर हे पत्त्यांच्या पानावर पैसे लावून जुगार खेळताना मिळुन आले असुन त्यांच्या ताब्यात जुगार खेळाची रोख रक्कम ४१८६० / -रु तसेच पत्त्यांची पाने व मोबाईल अशी एकुण ६५,०६० / -रु रक्कम जुगार छाप्याचे कामी मिळुन आली आहे .
सदर आरोपीत यांच्या विरुध्द आळेफाटा पोलीस ठाणे गु.र.नं. ४४४/२०२० मु.जु.का.कलम १२( अ ) प्रमाणे गुन्हां रजि नोंद करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढिल तपास एन.आर.कारखेले हे करीत आहेत .
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक श्री.विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एम.ए.पवार ,पो.कॉ.फलके , पो.कॉ. इष्टे,पो.कॉ.ढोबळे,
पो.कॉ कुलकर्णी यांनी केली.
No comments:
Post a Comment