पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सुचनेनुसार दिनांक २६/१२/२०२० रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह कामशेत पवना नगर हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे राजेंद्र मिरघे यांना बातमीदारा द्वारे मिळालेल्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतून आतिश बलदेव कोरी राहणार चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे वय २१ वर्ष यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याच्यावर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीवर यापूर्वी दरोडा चोरी मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत कावत, पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी कामशेत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्ष चे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, राजेश पवार, विश्वास खरात पोलीस हवालदार राजेंद्र मिरघे, अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे ,किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने केली.
No comments:
Post a Comment