ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
दिनांक 23/6/2020 रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे नाशिक रोडने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ST स्टँड जवळ आले असता एक पांढऱ्या रंगाची तवेरा गाडी MH 12 DT 3370 पिवळी नंबर प्लेट असलेली भरधाव वेगात व रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून जोरात पुण्याच्या दिशेने जाताना दिसली त्या चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्या गाडीचा पाठलाग करून मांजरवाडी फाट्याजवळ पकडले व गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 22 किलो गांजा (11पुडे पॅकींग केलेले प्रत्येकी 2 किलो) मिळून आल्याने चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सिद्धेश दत्तात्रय शिंदे रा.चाकण ता.खेड जि. पुणे असे सांगितल्याने तिथून नारायणगाव पोलीस ठाण्यात आणून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून 03 लाख 30 रुपये किंमतीचा गांजा व अंदाजे 03 लाख 30 हजार रुपये किमतीची जुनी वापरती तवेरा गाडी असा एकूण 06 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
सदर कामगिरी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो यांच्या आदेशानुसार, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलिस हवालदार सुनील जावळे, पोलिस शिपाई अमोल शेडगे, मंगेश भगत यांनी केली.
पुढील तपास हा नारायणगाव पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सपोनि.अर्जुन घोडेपाटील हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment