ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव | धनगर वाडी येथे देशी दारूची विक्री करणाऱ्या एकाला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 हजार 796 रुपये किमतीच्या 73 बाटल्या हस्तगत केल्या.अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
दशरथ रघुनाथ शेळके वय 54 धनगरवाडी ता जुन्नर जि पुणे याच्यावर मुंबई प्रोहिबिशन कलम 65(ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल लोहार यांनी दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धनगरवाडी गावच्या हद्दीत विघ्नहर साखर कारखान्याच्या टॉवर जवळ एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला दशरथ शेळके हे बेकायदेशीररीत्या विनापरवाना देशी दारू चोरून विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस सहाय्यक फौजदार केंगले,पोलीस कॉन्स्टेबल,सचिन कोबल, नवीन अरगडे, स्वप्निल लोहार यांनी छापा टाकला असता दोन खाकी रंगाच्या बॉक्समध्ये देशी संत्रा जी एम कंपनीच्या 3 हजार 796 रुपये किमतीच्या प्लास्टिकच्या बाटल्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.पुढील तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत
No comments:
Post a Comment