ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक: श्री.अमर भागवत
[अध्यक्ष : अ. भा. ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव | (दि.१८) दूध वाहतूक करणाऱ्या वाहनामधून पैशांची पिशवी चोरून नेल्या प्रकरणी चालकावर नारायणगाव पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासात नारायणगाव पोलिसांनी पैशाची पिशवी चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की दिनांक १७ जून रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १८६/२०२० भा. द. वि. कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल झाला असून सदरचा गुन्हा हा पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या नारायणगाव येथील एलआयसी आॅफीस समोर झाला आहे.आरोपी शिवाजी कारभारी आहेर याने संगमनेर येथील एस आर थोरात मिल्क प्रोडक्टस कंपनी च्या वाहन क्रमांक एम.एच. १७ बी.डी. ६२७३ या वाहनामधून ८२,८७०/- रूपये असलेली पिशवी घेवुन तसेच ते वाहन तेथेच सोडून फरार झाला होता.
याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे एस आर थोरात मिल्क प्रॉडक्ट्स कंपनी, संगमनेर चे वाहतूक व्यवस्थापक संजय प्रभाकर हिंगणकर यांनी फिर्याद दिली होती. त्या अनुषंघाने तात्काळ नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांचे आदेशाने पोलीस नाईक रामचंद्र शिंदे, धनंजय पालवे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांचे पथक तपासकामी रवाना झाले. त्यावरुन या टिमने आरोपीचे फोटो व सीडीआर माहितीच्या आधारे दिनांक १७ जून रोजी आरोपीचा शोध सुरू केला असता चाकण, आळंदी, दिघी भोसरी परीसरात आरोपी वारंवार लोकेशन बदलत असताना रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नाशिक फाटा येथे आरोपी शिवाजी आहेर हा बसची वाट पहात बस स्टाॅपवर बसलेला दिसला. त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला. त्याचवेळी तपास पथकाने पाठलाग करून त्यास शिताफीने पकडले. तसेच त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांने ८२,८७०/- रूपये रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरी केलेल्या रकमेपैकी ७३ हजार रुपये रोख रक्कम मिळून आली.ती रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
सदर जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप पाटील, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक अर्जुन घोडे पाटील, सायबर सेलचे साहेब पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलिस नाईक रामचंद्र शिंदे, धनंजय पालवे, पोलिस काॅन्स्टेबल सचिन कोबल यांनी केली. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष कोकणे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment