Friday, April 10, 2020

स्व. किशोर वाजगे यांच्या स्मरणार्थ चुलतीने दिली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांची मदत

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक: श्री. अमर भागवत
नारायणगाव 
कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर सर्वत्र उपाय योजना सुरू आहेत. यासाठी शासनाला देखील मोठ्या आर्थिक निधीची गरज आहे. या अनुषंगाने आपल्या पुतण्याच्या अपघाती म्रुत्यू नंतर नारायणगाव येथील सौ. निलीमा राजेंद्र वाजगे यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी ५१ हजार रुपये मदत पाठवली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय वाजगे यांचे नातू व पत्रकार किरण वाजगे यांचे मोठे बंधू स्वर्गीय किशोर लक्ष्मण वाजगे यांच्या स्मरणार्थ, दिनांक 07/04/2020 रोजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नारायणगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मधून ५१ हजार रुपये आरटीजीएस करण्यात आले. 
 याप्रसंगी बँक व्यवस्थापक सुभाष डोके, जेष्ठ द्राक्ष बागायतदार राजेंद्र दत्तात्रय वाजगे, सह्याद्री भिसे, कृष्णा राजेंद्र वाजगे तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment