Monday, April 6, 2020

नारायणगाव मधील युवकांनी १०० गरीब आणि निराधार गरजवंत नागरिकांना मास्क व किराणा साहित्याचे केले वाटप

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री .अमर भागवत

नारायणगाव दि. ०६
कोरोना विषाणू चा मुकाबला होत असताना सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मधील युवकांनी माणुसकीच्या नात्याने १०० गरीब आणि निराधार गरजवंत नागरिकांना मास्क व किराणा साहित्याचे वाटप केले.
नारायणगाव येथील विक्रांत क्रीडा मंडळ, वाजगे आळी यांच्या वतीने माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, अजिंक्यतारा पतसंस्थेचे चेअरमन गणेश वाजगे,  सुनिल वाव्हळ, निलेश गोरडे, मुकेश वाजगे, हर्षल वाजगे, तेजस वाजगे, मोहक वाजगे, संजय नेवकर, शाम जोशी, कमलाकर वाजगे, वसंत वाजगे, तसेच मंडळाच्या युवक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.  
निराधार व ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरजवंत कुटुंबांना मंडळाच्या वतीने किराणा साहित्य व मास्क मोफत वाटल्याने मंडळाच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment