Thursday, February 6, 2020

तमाशा कलावंतांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नारायणगावातील ग्रामस्थ व कलावंतांनी काढला मोर्चा

ग्राहक समाचार News / Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ)
 संपादक : श्री. अमर भागवत
    
        नारायणगाव :  नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील साकूर गावी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशा फडावर स्थानिक गाव गुंडांनी मंगळवारी रात्री भ्याड हल्ला केला. या घटनेचा नारायणगाव (ता. जुन्नर) येथील गावकरी व तमाशा कलावंतांनी मोर्चा काढून दि.६ रोजी निषेध व्यक्त केला.
            दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिकच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग यांना फोन करून आरोपींना तात्काळ अटक करावे अशी मागणी केली.
           याबाबत माहिती अशी की, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा साकूर येथे मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रात्रीचा कार्यक्रम होता. तमाशाच्या नियोजनानुसार साकुरगावी रात्रीचा तमाशा वेळेवर सुरू झाला. व शासनाच्या निर्णयानुसार तमाशा वेळेत बंद करण्यात आला .तमाशा खेळ बंद झाल्यानंतर साकुर गावातील मद्यधुंद नशेतील 10 ते 12 दहशतवादी प्रवृत्तीच्या गुंडांनी तमाशातील महिला कलाकारांना गाणी सादर करून नाचण्यासाठी दमदाटी केली . तमाशा फडमालक आविष्कार मुळे व इतर कलाकारांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला .परंतु त्यांनी  ऐकले नाही. महिलांच्या राहुटी मध्ये हे गुंड शिरले . व महिलांचा विनयभंग केला .तसेच महिला व पुरुष कलाकारांना मारहाण केली.
           या घटनेची माहिती नारायणगाव तमाशा पंढरीत समजल्या बरोबर नारायणगाव येथील डॉ महाले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कलाकारांची विचारपूस सरपंच याेगेश पाटे, सदस्य आरिफ आतार, संताेष दांगट,गणेश पाटे,तमाशा अभ्यासक काशिनाथ आल्हाट आदी मान्यवरांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली.
          नारायणगाव येथे सर्व ग्रामस्थांनी व सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी एकत्रित येऊन नारायणगाव शहरातून निषेध मोर्चाचे आयोजन केले. लोकनियुक्त सरपंच याेगेश पाटे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, माजी उपसरपंच आशिष माळवदकर , लावणीसम्राज्ञी सीमा पोटे, निवेदक सुधाकर पोटे, तमाशा अभ्यासक काशिनाथ आल्हाट या मान्यवरांनी निषेध पर मनोगते व्यक्त केली.
              या मोर्चात सदस्य राजेश बाप्ते, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष अशाेक पाटे, उपाध्यक्ष डी. के भुजबळ ,विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बबनराव खैरे, पांडूरंग म्हेत्रे, रामभाऊ तोडकरी, राजेश रत्नपारखी ,भा.ज.प पक्षाचे संजय फल्ले, शिवसेना शहर प्रमुख अनिल खैरे , मेहबूब काझी व बहुसंख्य ग्रामस्थ व तमाशा रसिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment