Tuesday, February 11, 2020

निमगाव सावात रंगला युवा महोत्सव

ग्राहक समाचार News/ Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
  
             निमगाव सावा (ता. जुन्नर ) येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात युवा महोत्सव जल्लोषात पार पडला. युवा महोत्सवातील सहा दिवसांमध्ये क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन, निबंध, सुंदर हस्ताक्षर, पाककला, रांगोळी, मेहंदी, पुष्पगुच्छ या विविध स्पर्धा आणि कॅप डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, चॉकलेट डे, टाय डे, मिसमॅच डे, ट्रॅडिशनल डे साजरे करण्यात आले. 
           महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये नैपुण्य, उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि मागील वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र,रोख रक्कम देऊन प्रमुख पाहुण्यांचा हस्ते गौरविन्यात आले. 
             श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याने या संस्थेकडून सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ह.भ.प. रमेश महाराज कुलकर्णी (वासुंदे, ता. पारनेर), ह.भ.प.नाना महाराज गांडाळ(आणे ), ह.भ.प. बाळशीराम महाराज बांगर (बेल्हे ), ह.भ.प. बजरंग महाराज आंधळे(कर्जुले हर्या ता. पारनेर ) यांस पांडुरंग गौरव पुरस्कार; श्री ज्ञानेश्वर खराडे(मंगरूळ), श्री. पोपट दाते (आणे), श्री.कारभारी औटी (राजुरी), श्री. विष्णू उनवणे (निमगाव सावा) यांस शिक्षण क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कार्याबद्दल विश्वामित्र गौरव पुरस्कार; सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री.शिवाजी नानाजी चव्हाण  (पारगाव ), श्री.धोंडिभाऊ पिंगट (बेल्हे ), श्री.राजाराम चौधरी (शिरोली बु.), श्री.ज्ञानदेव मुळे(साकोरी) यांस दिलीप गौरव पुरस्कार आणि शिक्षणातील गुणवत्तेबाबत कु. श्रेया सचिन दाते (आणे), कु. स्नेहल वसंत पिंगट(बेल्हे), कु.प्राजक्ता तिकोने (रानमळा) यांना एकलव्य गौरव पुरस्काराने सहा.पो.निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, डॉ. पंजाबराव कथे आणि जि. प. पुणेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग पवार साहेब यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ, पुस्तक देऊन गौरविण्यात आले. 
                            तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी कु. कानिफनाथ डुकरे, कु. प्रांजल विश्वासराव, कु.थोरात मंगेश यांस आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
              सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य यासारख्या कलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दिंडी सोहळा, शेतकरी गीत, आदिवासी नृत्य, कोळी गीत, देशभक्तिपर गीते, मराठमोळी लावणी, सोलोडान्स, ऐतिहासिक अफजल खान वध, फनीडान्स असा कलाविष्कार सादर करण्यात आला. याप्रसंगी मा. पांडुरंग पवार, मुंबई येथील वरिष्ठ पो. निरीक्षक श्री किसन गायकवाड, उद्योजक उमेश कामठे, सरपंच सौ. सुनीता घोडे, उपसरपंच नजीरअहमद चौगुले,जाकीरभाई पटेल,गणपत घोडे, सोपान गाडगे, निवृत्ती गाडगे, भालचंद्र उनवणे, प्राचार्य डॉ. विलास जोशी, डॉ. वसंत गाडगे, प्रा. छाया गायकवाड, माजी विद्यार्थी, गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक वृंद आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment