Tuesday, February 11, 2020

किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्रीगणाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने साजरा होणार - अतुल बेनके

           
ग्राहक समाचार News/Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक अमर भागवत
               जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी येथे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने साजरा होणार आहे.शिवजयंतीनिमित्त जुन्नर मध्ये दिनांक १४ ते १९ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर येथे आयोजित बैठकीत 
केले आहे. 

              किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्यावतीने या वर्षापासून शिवजयंतीला राज्यातील एका प्रतिभावंत छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
            राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष कारभारी डुंबरे या पुरस्काराचे प्रथम मानकरी असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली 
               यावेळी दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मारुती ताजणे यांना शिवनेरी भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
                छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गडावरील व्यवस्थेची व कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.
             या सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी,जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,प्राजक्ता तनपुरे,खासदार 
डॉ. अमोल कोल्हे ,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे,
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आदींसह 
जिल्ह्यातील मान्यवर महा विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
                                शिवजयंती उत्सवानिमित्त जुन्नरमध्ये वकृत्वस्पर्धा, मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा, पोवाडा गायन, महिलांकरिता हळदीकुंक,  राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, गड चढणे स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती आखाडा, नंदेश उमप यांचा शिव सोहळा कार्यक्रम, लखलख चंदेरी हा मनोरंजनाचा कार्यक्रम, आयोजित करण्यात आला आहे.
          

                      शिवजयंती दिनी शिवनेरीच्या पायथ्याशी दत्त मंदिर परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र मैदाने तयार करण्यात आली आहेत गडावरील शिवजन्मस्थान व शिवकुंज या ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार असून सकाळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा शिवाई माता मंदिर ते शिवजन्मस्थळ पालखी सोहळा व जन्मस्थानी शिवजन्म सोहळा कार्यक्रम मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके,परिसरातील विकासकामांची पाहणी, जुन्नर मधील बाजार समिती प्रांगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अन्य मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे,
   
                            जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, जिल्हा दूध संघ हा उत्सव संयुक्तरित्या साजरा करणार असून त्यासाठी निधीची तरतूद केली असल्याचे बेनके यांनी सांगितले.
            सुरक्षा बाबींकडे पोलीस खात्याची करडी नजर राहणार आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था केल्याची माहिती पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांनी दिली 
                           यावेळी तहसीलदार हनमंत कोळेकर, नायब तहसीलदार सचिन मुंडे, मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाटील, पूरातन विभागाचे बाबासाहेब जंगले, बाजार समितीचे सभापती संजय काळे, सभापती विशाल तांबे, उपसभापती रमेश खुडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊ देवडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
                                     (छायाचित्रे - संग्रहीत)

No comments:

Post a Comment