Showing posts with label नारायणगाव. Show all posts
Showing posts with label नारायणगाव. Show all posts

Tuesday, November 12, 2019

नारायणगाव येथे नारायणगाव ग्रामपंचायत,नारायणगाव पोलीस स्टेशन आणि सर्व व्यापारी, जीप चालक संघटना, एसटी स्टँड शेजारील पत्रागाळेधारक व ग्रामस्थ बांधवांची बैठक संपन्न

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत  


नारायणगाव :
        नारायणगावमध्ये होणारी ट्रॅफिक लक्षात घेता दि.११ रोजी  नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे नारायणगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अर्जुन घोडे पाटील  व  नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच श्री.बाबुभाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव ग्रामपंचायत,नारायणगाव पोलीस स्टेशन आणि सर्व व्यापारी, जीप चालक संघटना, एसटी स्टँड शेजारील पत्रागाळेधारक व ग्रामस्थ बांधवांची बैठक लावण्यात आली होती. 


                 यावेळी सर्वांना नियमांबद्दल सूचना करण्यात आल्या व त्यामध्ये सर्वांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे की आपल्या कडे येणाऱ्या ग्राहकाने गाडी रस्त्यामध्ये तर लावली नाही ना?त्यामुळे दुसऱ्यांना त्रास तर होत नाही ना?व्यापारी वर्गाने स्वतः मोठी गाडी न आणता छोटी गाडी घेऊन येणे,प्रत्येक व्यापाऱ्याला सूचित करन्यात येते की ट्रान्सपोर्टच्या गाड्या सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत आणू नये जेणेकरून ट्रॅफिकची समस्या होणार नाही,पत्राशेड गाळे धारकांनी फूटपाथ वर कुणीही काही साहित्य लावले तर ते सामान उचलण्यात येणार आहे फुटपाथ हे चालण्यासाठीच ठेवावे त्यावर कुणीही काहीही लावू नये असे उद्यापासून निदर्शनास आल्यास नारायणगाव पोलीस स्टेशन आणि नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या कडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


                  जीप चालक संघटनेला देखील त्यांची एका जीपची जागा कायम करून दिलेली आहे , वरील नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे API श्री अर्जुन घोडे पा. यांनी नमूद केले आहे.
नारायणगावातील तमाम जनतेला देखील यावेळी आवाहन करण्यात आले आहे की प्रत्येकाने नियम पाळावे,आपल्या गाड्या योग्य ठिकाणी पार्क करावी जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही याची आपण एक जबाबदार नागरिक म्हणून काळजी घेतली पाहिजे असे आवाहन ग्रा प ना गाव चे वतीने सर्वांना करण्यात आले.




                यावेळी नारायणगावचे API अर्जुन घोडे पाटील ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी ,उद्योजक अशोक गांधी ,ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, आशिष माळवदकर,राजेश बाप्ते, नारायणगाव पोलीस स्टेशन स्टाफ,व्यापारी वर्ग , ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होता..
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामपंचायत सदस्य गणेशभाऊ पाटे तर आभार शेखरभाऊ शेटे यांनी मानले.


Saturday, November 9, 2019

विघ्नहर कारखान्याच्या ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न ...२०१८-१९ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास विघ्नहर देणार विनाकपात २९५०/-   ऊसदर - चेअरमन सत्यशिल शेरकर

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत 




 शिरोली :
                        जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज शनिवारी दि. ९ नोव्हेंबर-२०१९ सकाळी-१०.०० वाजता शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसेच माजी आमदार शरददादा सोनवणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे आणि जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून उत्साहावर्धक वातावरणात संपन्न करण्यात आला.

                        याप्रसंगी विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी आमदार दिलीपराव ढमढेरे, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, जयहिंद ग्रुपचे तात्यासाहेब गुंजाळ, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे, तान्हाजी बेनके,अनंतराव चौगुले, जिल्हा दूध संघाचे बाळासाहेब खिलारी, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, हभप रामदास कुटे, रमेश भुजबळ, गणेश कवडे, मकरंद पाटे, अजित काळे, पांडूरंग गाडगे, निवृत्ती काळे, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, नंदूकाका शेरकर, सुखदेव नेहरकर, नगरसेविका हाजरा इनामदार, अर्चना भुजबळ, उज्वला शेवाळे, विजय भोर, गणपत शेटे, गणपत कवडे, विघ्नहरचे सर्व माजी संचालक, पंचायत समिती पदाधिकारी, पंचक्रोशितील विविध गांवाचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायट्याचे चेअरमन आदि मान्यवरांसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विघ्नहरचे सर्व अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विधीवत गव्हाणपुजन करण्यात येवून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्यात आली.

                       प्रास्ताविक करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, मागिल गळीत हंगामात विघ्नहरने १० लाख ७५ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले. त्यामधून १२ लाख ५३ हजार साखर पोत्यांचे उत्पादन   झाले. व ११.६५% साखर उतारा मिळवला. या गाळप हंगामात विघ्नहरने ८ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की यंदा मान्सूनचा पाऊस समाधानकारक झालेला असून धरणसाठ्यांची परिस्थीतीही चांगली आहे. परतीच्या पावसाने सध्या सगळीकडे धूमाकुळ घातलेला असून अद्यापिही परतीचा पाऊस सुरुच आहे. यापावसाने शेतकर्‍यांचे कांदा, सोयाबिन, द्गाक्ष, भाजीपाला पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून शेतकर्‍यांना शासकिय मदतीची आवश्यकता आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नाही. ऊस हे एकच पीक आहे, ज्यामधून शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकर्‍यांची अपेक्षा असते की ऊसास जास्तीत जास्त भाव मिळावा. परंतू शेतकर्‍यांना भाव देण्याबरोबरच संस्थाही टिकली पाहिजे याचा विचार होणे गरजेचे आहे. यासर्व बाबींचा विचार करुन विघ्नहरच्या संचालक मंडळाने २०१८-१९ साठी गळीतास आलेल्या ऊसास विनाकपात २९५०/- प्र. मे. टन दर देण्याचे ठरविले असून आत्तापर्यन्त सभासद, व ऊस उत्पादकांना २७८५/- रुपये अदा केलेले आहेत. उर्वरीत १६५/- रुपये पैशांची उपलब्धता झालेनंतर अदा करणेत येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्व.शेठबाबांचे विचाराने आणि स्व.आण्णांच्या मार्गदर्शनाच्या शिदोरीवर विघ्नहरची वाटचाल सुरु असून सर्व ऊस उत्पादकांनी नोंद केलेला ऊस विघ्नहर कारखान्यास गळीतासाठी घालावा, अशी विनंती त्यांनी याप्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक शेतकर्‍यांना केली. तसेच मोठ्या संख्येने गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार मानून धन्यवाद व्यक्त केले.


                      विघ्नहर कारखान्याने ऊस उत्पादकांना सतत चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला. सतत  पेक्षा जास्त भाव देण्याची परंपरा कायम ठेवली. परंतू आयकर विभागाने विघ्नहर कारखान्याला  पेक्षा जास्त भाव दिल्याने २०५ कोटी रुपये इन्कमटॅक्स भरणेची नोटीस पाठविलेली आहे. उत्पन्नातून खर्च वजाजाता शिल्लक राहिलेली  रक्कम जर विघ्नहर कारखाना ऊस उत्पादकांना देत असेल तर ती जास्तीची रक्कम कारखान्याचा नफा समजून जर त्यावर इन्कमटॅक्स लावत असेल तर कारखाने चालू ठेवणे अशक्य होणार असल्याचे विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यावेळी म्हणाले.

                     प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, सध्या साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट असून साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहिर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण साखर कारखानदारी प्रतिकुल परिस्थीतून वाटचाल करीत असतानाही विघ्नहर कारखान्याने मात्र ऊस उत्पादकांना उत्कृष्ठ असा ऊसदर देवून चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी संस्थापक चेअरमन माजी खासदार स्व. शेठबाबांनी कारखान्याला मिळालेल्या उत्पन्नातून खर्च वजाजाता जास्तीतजास्त रक्कम शेतकर्‍यांना देण्याचा रचलेल्या पायावर विघ्नहरची विश्वासरुपी इमारत उभी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाला असून पर्यटन हे तालुक्यातील जनतेच्या उपजिवीकेचे साधन बनेल अशा पध्दतीने तालुक्याचा विकास होण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून निस्वार्थ भावनेने काम केले पाहिजे, असे सांगून विघ्नहर कारखान्याच्या आगामी गाळप हंगामास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

                     आमदार अतुल बेनके म्हणाले की, विघ्नहर कारखान्याचा कारभार सत्यशिल शेरकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शकपणे सुरु आहे. यापुढील काळात कारखान्याच्या विकासाकरीता सत्यशिल शेरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या हितासाठी काम करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच यापुढील काळात शेतकर्‍यांसाठी जुन्नर व आंबेगांव तालुक्यातील धरणसाठ्यातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

                     अध्यक्षीय भाषणात माजी आमदार दिलीपराव ढमढेरे म्हणाले की, माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेवून धालेवाडीच्या या माळरानावर विघ्नहर कारखान्याची उभारणी करुन हा परिसर फुलवला. विद्यमान चेअरमन सत्यशिल शेरकर हे सुध्दा विघ्नहर कारखान्याचा कारभार अगदी उत्कृष्ठ पध्दतीने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विघ्नहर कारखान्यामुळे या परिसरातील शेतकरी खर्‍याअर्थाने समृध्द झाला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

                      याप्रसंगी माजी आमदार शरददादा सोनवणे, आशाताई बुचके, संजय काळे, तान्हाजी बेनके आदिंनी आपले विचार व्यक्त केले व विघ्नहरच्याम्आगामी गाळप हंगामास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी केले. तर आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.

Saturday, October 19, 2019

नारायणगाव पोलिस ठाणेच्या हद्दीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३१० जणावर प्रतिबंधात्मक कारवाई, ४० जण हद्दपार

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत 



नारायणगाव :
                  विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तडीपारीचे आदेश मा. जितेंद्र डुड्डी, (IAS) सहायक जिल्हाधिकारी, मंचर व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांनी तडीपारीचे आदेश काढले असून
 नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने ३०५ जणांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करण्यात आली, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
               सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन अंतर्गत कलम १०७ प्रमाणे ७५ इसमांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून बाँड लिहून घेण्यात आले आहेत. कलम कलम ११० प्रमाणे ०३ इसमांवर कलम १४९ प्रमाणे १८५ इसमांना नोटीस देण्यात आले आहे. कलम १४४ (२) प्रमाणे २७  इसमावर निवडणुकीच्या काळात जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कलम ५५ प्रमाणे १ प्रस्ताव ४ इसमावर हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. कलम ५६(ब) प्रमाणे १ सराईत इसमांविरोधात हद्दपार प्रस्ताव पाठवला असून कलम ९३ प्रमाणे ८ इसमावर प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तसेच. नारायणगाव  पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यावर दारूबंदीसाठी छापे घालण्यात आले असून २३,४६४  हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
               पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नर विभाग उपविभागीय पोलीसअधिकारी दिपाली खन्ना  यांच्या मार्गदर्शनाने तसेच सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, ASI केंगले, ASI ढमाले, पो.ना लोंढे, पो.ना. शिंदे, पो.शि. लोहार, पो.शि. वाघमारे, पो.शि. कोबल, पो.शि. साबळे, पो.शि. दुपारगुडे. पोशि. गारगोटे, पो.शि. राक्षे यांनी कामगिरी बजावली आहे.




Wednesday, October 16, 2019

विघ्नहर कारखान्याचे ३४ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन उत्साहाच्या वातावरणात संपन्न

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत 




शिरोली : 
               श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भगवंत घोलप तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई अशोक घोलप या उभयातांच्या हस्ते आज बुधवारी (दि.१६) सकाळी-१० वाजता मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर हे होते.


                याप्रसंगी चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, जयहिंदचे तात्यासाहेब गुंजाळ, नंदूकाका शेरकर, गणपत शेटे, पांडुरंग गाडगे, रविंद्ग माळी, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, अजितकाका परदेशी, हाजरा इनामदार,  अर्चना भुजबळ, तान्हाजी बेनके, संभाजी पोखरकर, वल्लभ शेळके, जानकू डावखर, रामदास बोर्‍हाडे, गजानन हाडवळे, विजय भोर विवेक काकडे, रामदास महाबरे विघ्नहरचे सर्व आजीमाजी संचालक, पंचक्रोशितील विविध गांवाचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायट्याचे चेअरमन, ऊस उत्पादक शेतकरी, पत्रकार बंधू, सर्व अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
               व्हाईस चेअरमन अशोक भगवंत घोलप म्हणाले की, विघ्नहर कारखान्याने उत्कृष्ठ कारभार करत अनेक पुरस्कार प्राप्त केले असून विघ्नहरच्या या सर्व यशामध्ये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी/वाहतूक कामगार, कर्मचारी अधिकारी वर्ग यांचा मोठा वाटा असल्याचे सांगून आगामी गाळप हंगामातही विघ्नहर कारखान्याचा यशाची कमान चढतीच राहिल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
                अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, ३४ व्या गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली असून मंत्री समितीच्या बैठकीनंतर गाळप हंगाम सुरु करणेची तारीख निश्चित होणार  असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि कारखान्याची गाळप हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की गाळप हंगामच्या दृष्टीने तोडणी यंत्रणेची व्यवस्थीत बांधणी करण्यात आली असून कार्यक्षेत्रात यंदा सुमारे ८ लाख मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभासद व ऊस उत्पादकांनी सर्व नोंदींचा व नोंद नसलेला बिगर नोंदीचा ऊस नोंद करुन घेवून विघ्नहरला गाळपासाठी घालावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 


                    विघ्नहर कारखान्यास यावर्षीही नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचेकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दलचा देशातील पहिल्या क्रमांकाचा सलग तिसर्‍यांदा पुरस्कार मिळाला असून साखर धंद्यात अग्रगण्य असलेल्या भारतीय शुगर या संस्थेकडूनही सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.         जुन्नर तालुक्याच्यादृष्टीने ही अतिशय भूषणावह बाब असल्याचे सांगून या पुरस्कारांबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी व कामगार वर्ग यांचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी अभिनंदन केले.


                        चेअरमन सत्यशिल शेरकर पुढे म्हणाले सध्या साखरेचे बाजारभाव ३१००/- रु.चे आसपास आहेत. परंतु साखरेचा उत्पादन खर्च ३४०० ते ३५०० चे आसपास आहे. शासनाने साखरेची किमान विक्री किंमत ३६००/- प्रती क्विंटल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सध्या ऊस उत्पादकांच्यादृष्टीने अडचणीची बाब म्हणजे खोडवा व लागणीच्या ऊसाला हुमणी किडीचा प्रार्दुभाव होत होता. त्यासाठी विघ्नहर कारखाना ऊस विकास विभागा मार्फत योग्य मार्गदर्शन करत असून त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा.विघ्नहरने मोठ्या प्रमाणावर भुंगेरे गोळा करणेची मोहिम राबविली. त्याचा परिणाम म्हणुन हुमणीचा प्रार्दुभाव कमी झाल्याने ऊसासह इतर पिकांचीही होणारी नुकसान कमी होणेस मदत झाली आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी कारखान्याचे लागवड धोरणानुसार जर ऊसाची लागवड केली तर तोडणीचे नियोजन योग्यप्रकारे होऊन ऊसाची तोडणी वेळेवर करता येईल असे सांगून ते म्हणाले की, स्व.शेठबाबांचे विचाराचा वारसा व आण्णांचे मार्गदर्शनाचे शिदोरीवर विघ्नहरच्या यशाचा रथ सदैवपणे पुढे नेत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रारंभी उभयतांच्या हस्ते बॉयलरची विधिवत पुजा करण्यात आली. कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी स्वागत केले. यावेळी माजी संचालक रंगनाथ घोलप, शरद चौधरी आदिंनी आगामी गाळप हंगामाकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या.सुत्रसंचालन सुहास शेटे यांनी केले तर आभार संचालक देवेंद्ग खिलारी यांनी मानले.


Friday, September 20, 2019

तात्यासाहेब भुजबळ यांची ४५ वी पुण्यतिथी’’ कृषि शिक्षण संकुल नारायणगाव येथे उत्साहात साजरी... कृषि शिक्षणामध्ये नेदरलँड कृषि तज्ज्ञाची मदत घेणार - कृषिरत्न श्री.अनिल मेहेर

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत






नारायणगांव :
               स्वर्गीय तात्यासाहेब भुजबळ यांनी मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या जमिनीच्या 
देणगीमुळेच ग्रामोन्नती मंडळ आज ते कृषि शिक्षण संकुल उभारु शकले. व त्यामुळेच कृषि विध्यार्थ्यांना अभ्यासक्रमास पूरक असे वातावरण निर्माण होत आहे. परदेशातील कृषि विषयक तंत्रज्ञान विध्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे. नेदरलँडमधील कृषि तज्ज्ञ गटांशी यासाठी चर्चा सुरु आहे.  या स्पर्धेच्या युगामध्ये विद्याथ्यारना शेतकऱ्यांना आवश्यक असणारे तंत्रज्ञान ग्रामोन्नती मंडळ उपलब्ध करुन देत आहे. असे प्रतिपादन कृषिरत्न श्री.अनिलतात्या मेहेर यांनी केले. 
                कै.तात्यासाहेब भुजबळ यांचे समाधीचे पूजन ग्रामोन्नती मंडळाचे संचालक श्री. शशिकांत भिमाजी वाजगे यांचे हस्ते झाले. याप्रसंगी कुणाल रत्नदीप भरवीरकर यांनी दिलेल्या देणगीचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाशमामा पाटे यांनी स्विकारला. यावेळी मंडळाचे कार्यवाह श्री. रविंद्र पारगांवकर यांनीही आदरांजली वाहिली.
                  याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त डॉ.श्रीकांत विद्वांस, अध्यक्ष श्री.प्रकाशशेठ पाटे, कार्याध्यक्ष श्री.अनिलतात्या मेहेर, कार्यवाह श्री. कार्यवाह श्री.रविंद्र पारगांवकर, शेती समिती प्रमुख श्री.रत्नदिप भरविरकर, उप कार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह श्री.अरविंदभाऊ मेहेर, ग्रामोन्नती मंडळ संचालक श्री.शशिकांत वाजगे, श्री.आल्हाद खैरे, श्री.तानाजी वारुळे, डॉ.संदिप डोळे, श्री.एकनाथ शेटे, श्री.ऋषिकेश मेहेर, तसेच श्री.पी.जी.शेटे, डॉ.एम.बी.भुजबळ,
श्री.आर.एन.गायकवाड, श्री.नवले सर, श्री.गुळवे सर, श्री.रोकडे सर, श्री.अरविंद ब्रम्हे, सौ.स्मिता भरवीरकर, पत्रकार श्री.रविंद्र पाटे, श्री.भोर सर कृषि शिक्षण संकुलातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद इ.उपस्थित होते.



               या प्रसंगी कृषि विभागांच्या कार्याचा सविस्तर आढावा  कृषि शिक्षण संकुलाचे 
व्यवस्थापक मा.श्री.बी.आर. भुजबळ यांनी घेतला. तसेच पुण्यतिथीनिमित्त कृषि शिक्षण संकुलातील सर्व विभागातील विद्याथ्यारनी व सबनीस विद्यामंदिराच्या लेझीम पथकाने ढोल ताशांच्या गजरात  तात्यासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली.  
               आभार प्रदर्शन प्रा.नेहा गोडसे यांनी केले व सुत्रसंचालन डॉ.सत्यवान थोरात यांनी केले.

Friday, September 13, 2019

वारुळवाडी ग्रामपंचायत विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूज आशाताई बुचके यांच्या हस्ते संपन्न

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत

 नाराय़णगाव: 
वारूळवाडी ग्रामपंचायत विभागातील विविध मंजूर विकास कामांचे भूमिपूजन सौ. आशाताई बुचके सदस्या जिल्हा परिषद पुणे,  श्री.संतोषनाना खैरे संचालक विघ्नहर सह. साखर कारखाना यांच्या हस्ते  झाले. अशी माहिती ग्रा. पं. सदस्य राजेंद्र मेहेर यांनी दिली.

         जि. प. सदस्या आशाताई बुचके यांच्या माध्यमातून विकास कामांचा मंजूर निधी १) चिमणवाडी सभामंडप रक्कम रुपये १० लक्ष, २) जगदंबा हुंडेकरी ते चिमणवाडी रस्ता करणे रक्कम रुपये २० लक्ष, ३) साई नगर रस्ता कॉंक्रीट करणे रक्कम रुपये ७ लक्ष, ४) वेताळबाबा मंदिर रस्ता करणे रक्कम रुपये १० लक्ष, ५) प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत बांधकाम करणे. ६) ठाकरवाडी रोड ते लंबोदर सोसायटी रस्ता करणे रक्कम रुपये ५ लक्ष, ७) ठाकरवाडी रोड ते मेहेर वस्ती रस्ता कॉंक्रीटकरणे रक्कम रुपये ३ लक्ष, ८) डिंभा कॅनॉल ते मेहेर वस्ती रस्ता करणे रक्कम रुपये २.५ लक्ष, ९) कडाळेवस्ती रस्ता कॉंक्रीटकरणे रक्कम रुपये ५ लक्ष, १०) ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती रक्कम रुपये ६ लक्ष, ११) ठाकरवाडी जि.प.शाळा इमारत संरक्षक भिंत बांधणे रक्कम रुपये ७ लक्ष, १२) गणपती मंदिर ते ठाकरवाडी (ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत) शाळा रस्ता डांबरीकरण करणे १२.५० लक्ष, १३) राजमहल हॉटेल ते कुबेर पार्क रस्ता करणे रक्कम रुपये १० लक्ष, १४) अभंगवस्ती रस्ता कॉंक्रीट करणे (रा.प.सबनीस हायस्कूल मागील) रक्कम रु.१० लक्ष, १५) इंदिरानगर अंतर्गत गटर योजना रक्कम रू. ५ लक्ष, १६) नंबरवाडी पाणी पुरवठा नवीन विहीर बांधणे. रक्कम रु. १५ लक्ष, १७) कॉलेज रस्ता ते संस्कृती सोसायटी रस्ता कॉंक्रीट करणे रक्कम रुपये ६ लक्ष, 



            यावेळी संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, आशिष फुलसुंदर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवदत्त संते, उपाध्यक्ष शिवनाथ मेहेर, सरपंच, जयश्री बनकर, उपसरपंच सचिन वारुळे, ग्रामपंचायत सदस्य विपुल फुलसुंदर, राजेंद्र मेहेर, जंगलभाऊ कोल्हे, परशुराम वारुळे, भाग्यश्री पाटे, जोत्स्ना फुलसुंदर, खुशाल काळे, वर्षा वऱ्हाडी, माया डोंगरे, सविता पारधी, मनाबाई भालेराव, सुनिता बटाव, अंजली संते, ईश्वर अडसरे, दशरथ जाधव, तसेच कर्मचारी वृंद ग्रामपंचायत वारूळवाडी, जीवन बुचके, अनिल गावडे, संदीपशेठ वारुळे, भाऊसाहेब बनकर, दिलीप मा. बनकर, बबननाना कानडे, मारुती गे. बनकर, डॉ.राजेंद्र कानडे, नारायण फुलसुंदर, बाळशिराम डोके, नबाजी फुलसुंदर, बाबुराव बनकर, शाम कानडे, अतुल कानडे, संजय बनकर, रविंद्र कानडे, संदेश डोके, संजय तु. कानडे,  झुंजार मित्र मंडळ चिमणवाडी महिला व सर्व सभासद आणि देवेंद्रशेठ बनकर (मा.सरपंच), जुबेर शेख, संदेश फुलसुंदर, योगेश लोखंडे, नवशक्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते, गणेश नायकोडी, अजय शिंदे, दिनेश मेहेर, वसंत मेहेत्र, गडगे सर, सुरेश मेहेर, बबन शिंदे, दशरथ फुलसुंदर, गुळवे सर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Wednesday, September 11, 2019

सम्राट अशोक नगर येथे घरदुरुस्ती शुभारंभ..

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ] कार्यकारी संपादक : अमर भागवत


नारायणगाव : 
                 येथील सम्राट अशोक नगर मधील १५ घरकुलांची घरदुरुस्ती शुभारंभ जि.प.सदस्या आशाताई बुचके व लोकनियुक्त सरपंच योगेश बाबुभाऊ पाटे यांच्या शुभहस्ते करणेत आले.



याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि,सम्राट अशोक नगरमध्ये इंदिरा आवास योजनेतून सन १९९२ मध्ये १५ घरकुले मागासवर्गीयांसाठी बांधणेत आली होती, तेव्हापासून आजतागायत त्यामध्ये सदर घरकुलधारक राहत होते परंतु सद्यस्थितीत सदर घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाले असलेबाबत स्थानिकांनी ग्रामपंचायत सदस्य राजेशभैय्या बाप्ते, सुप्रिया खैरे, विजय वाव्हळ यांचे निदर्शनास आणून दिले. सदस्यांनी स्थळ करून वस्तुस्तिथी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांना सांगितले त्यावर सरपंच यांनी तात्काळ घरकुल दुरुस्तीचा प्रस्ताव जि.प.सदस्या आशाताई बुचके यांचेकडे पाठविला. 
आशाताई बुचके यांच्या विशेष प्रयत्नातून जि.प.मार्फत सदर घरकुल दुरुस्तीसाठी ७.५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला.या घरकुल दुरुस्तीचा शुभारंभ व भूमिपूजन जि.प.सदस्या आशाताई बुचके व सरपंच योगेश पाटे यांच्या शुभास्ते नुकताच संपन्न करणेत आला.


यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे,विरोबा परिवाराचे अध्यक्ष बाळासाहेब पाटे,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,उपसरपंच मानिशा मेहेत्रे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे,तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी,ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार,संतोष दांगट,गणेश पाटे,सुप्रिया खैरे,पुष्पा आहेर,संगीता खैरे,आशिष माळवदकर अनिल खैरे,हेमंत कोल्हे,रोहिदास भुजबळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्ञानेश्वर औटी,संकेत क्षीरसागर यांनी तर आभार राजेश भैय्या बाप्ते यांनी मानले..

Tuesday, August 27, 2019

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीचे आयोजन

कार्यकारी संपादक : अमर भागवत 
ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल 
नारायणगाव -
पोलीस स्टेशन हद्दीतील गणपती मंडळांचे अध्यक्ष सभासद पोलीस पाटील तसेच शांतता कमिटी सदस्य व पत्रकार यांची आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक आज दि.२७ रोजी ५ वाजता नारायणगाव पोलीस स्टेशन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

                  या बैठकीमध्ये गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या. डॉल्बी न वाजविणे, ऑनलाइन परवानगी फॉर्म भरणे, गणपती उत्सव मंडळांनी त्यांच्या निधीमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसविने, गणेश विसर्जन         
मिरवणुकीमध्ये गुलाल, डाॅल्बी यांचा वापर करु नये, सूर्यास्तापूर्वी गणपती विसर्जन करणे, मिरवणुकीत प्रत्येक मंडळ दोन पेक्षा जास्त वाहने ठेवता येणार नाहीत मंडप, वाद्य वाजविणे, स्पिकर इत्यादी परवाणे घेणे अशा सूचना देण्यात आल्या. 

                 तसेच पूरग्रस्तांना शालेय साहित्य गणपती मंडळाकडून जमा करुन  मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. 
दरम्यान नारायणगाव मधील पोलीस अधिकारी , कर्मचारी, पोलीस पाटील , ग्रामसुरक्षा दल यांच्या वतीने एक हात मदतीचा या हेतूने कोल्हापुर येथे जिवनावश्यक वस्तु चे दोन ट्रॅक साहित्य रवाना केले. 

                 सदर बैठकीमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी १०० ते १२५ गणपती मंडळाचे अध्यक्ष ,सदस्य, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, राहुल गावडे, मुकेश वाजगे, संभाजी चव्हाण,माजी उपसरपंच संतोष दांगट आदी मान्यवर तसेच सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.