किरकोळ वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा कडून अटक
नारायणगाव पो.स्टे गु.र.नं ३८/२०२०१ भा.द. वि कमल ३०७ दि.२५/२/२०२१ रोजी पारगाव येथे खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याला एक इसम गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला होता त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती सदर चा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीचा लवकर शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांकडुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पारगाव तर्फे आळी ता जुन्नर परिसरात आरोपीचा शोध घेत असताना एक इसम संशयित रित्या फिरताना मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवा उडवि ची उत्तरे दिली.त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने त्याचे *नाव नामदेव तिरसिंग भिल्ल उर्फ मोरे मूळ राहणार जळगाव सद्या राहणार पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर, जि.पुणे* असे सांगितले.
त्याच्याकडे घडलेल्या गुन्ह्या बद्दल विचारपूस केली असता त्याचा मित्र इसम नामे सचिन प्रकाश जाधव मूळ रा जळगाव सद्या राहणार पारगाव तर्फे आळी ता जुन्नर यास दगडाने मारहाण करून जखमी केले बाबत कबुली दिली आहे. त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासा कामी नारायणगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक सो श्री अभिनव देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंदार जवळे सो यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सपोनि श्री नेताजी गंधारे स पोनी दत्तात्रय गुंड प्रभारी अधिकारी नारायणगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली
स. पो.नि श्री पृथ्वीराज ताटे
पोहवा श्री विक्रम तापकीर
पोना श्री दिपक साबळे
पोशी श्री संदीप वारे
पोशी श्री निलेश सुपेकर
पोशी श्री अक्षय नवले
पोना. दिनेश साबळे आणि संतोष दुपारघुडे नेमणूक नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच पोलीस मित्र प्रसाद (अप्पा) पिंगळे. यांनी केली आहे
No comments:
Post a Comment