Sunday, August 9, 2020

आणे येथे हरियाणा राज्याकरिता विक्री साठी चा दारू साठा केला जप्त.राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

ग्राहक समाचार News Portal
Reg.R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री.अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
    नारायणगाव |  दि.7 ऑगस्ट रोजी जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण हायवे ला असलेल्या अणे गावच्या हद्दीत रात्री 9 .30 वाजताच्या सुमारास श्री.रंगदास स्वामी मंदीराच्या समोरील रस्त्यावर  हरीयाणा राज्याकरीता विक्रीसाठी असलेला बेकायदेशीर विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आलाअसून आरोपीस अटक करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे विभागाचे निरीक्षक श्री .जी.डी .कुचेकर यांनी दिली.
           या प्रकरणी  विकास रामदास वाजे यास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालया
समोर हजर करण्यात आले .
            आरोपीच्या ताब्यातून एक मारूती कार 
क्र.एमएच 09 ए बी 4416 ज्या मध्ये मॅकडोव्हेल नं.1 कंपनीच्या व्हिस्की 750 मिलीच्या 128 सीलबंद बाटल्या व प्लॅस्टीक कॅप 650 नग असा एकूण रुपये 1 लाख 33 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
             सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क , पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त श्री.प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार , राज्य उत्पादन शुल्क पुणे अधिक्षक श्री.संतोष झगडे व उपअधीक्षक श्री.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्य उत्पादन शुल्क 
नारायणगाव विभागाचे निरीक्षक श्री.जी.डी.कुचेकर ,सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री .एस.डी.झगडे , जवान श्री.डी.डी .केकरे , पी.पी.पाटील  यांच्या पथकाने केली .
         पुढील तपास निरीक्षक श्री.जी.डी.कुचेकर 
हे करीत आहेत .

No comments:

Post a Comment