Monday, August 10, 2020

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सोबलेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

श्रीनिवास शिंदे ( उपसंपादक, ग्राहक समाचार )


पारनेर ( प्रतिनिधी ),

                          महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी मधील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेमधे दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगेसर हे होते.                         

                        कार्यक्रमा चे सुरवातीला पिंप्री जलसेनपुत्र नायक भरत कदम यांना सामुदायिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी १० वी  व १२ वी मधील विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवुन सन्मानित करण्यात आले. १२ वी मधे तालुक्यामधे प्रथम आलेल्या कु.समृध्दी समिर अंबे हिच्यासह इयत्ता १० वी मधील गायश्री साहेबराव सोबले, अभिषेक जनार्दन गोसावी, सिध्दी बाबाजी औटी, वैष्णवी संतोष म्हस्के, सुप्रिया बापु सोबले आदींचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पारनेर च्या नगरसेविका विजेता विलास सोबले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते समिर अंबे, मेजर साहेबराव सोबले, मुख्याध्यापक प्रकाश नांगरे सर, पारनेर तहसिलचे सिनियर क्लर्क महेंद्र रोकडे, योगेश शेरकर, विकास शेरकर, अमोल शेरकर, रामदेव गोसावी आदी उपस्थित होते. 

              यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांनी १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले. आजचा विद्यार्थी भविष्यकाळामधे या देशाचा सुजान नागरीक असणार असुन, देशाचे भविष्य असल्याचे सांगीतले. भविष्यामधे यामधील विद्यार्थ्यांमधुन आपीएस,आय् ए एस दर्जाचे अधिकारी बनुण यावेत आणि आम्हाला पुन्हा एकदा सत्काराची संधी मिळावी अशी आशा व्यक्त केली. विद्यार्थ्यां सोबतच शिक्षक आणि आई वडीलांचेही विद्यार्थ्यांच्या यशामधे  महत्वाचे योगदान असल्याचे सांगीतले.                                   

               प्रास्ताविकामधे बोलताना मुख्याध्यापक प्रकाश नांगरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाने आज आमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. अशीच कौतुकाची थाप भविष्यातही कायम ठेवावी. प्रास्ताविक जि.प.शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नांगरे यांनी तर आभार पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले यांनी व्यक्त केले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक अरुणराव आंधळे, उपाध्यक्ष विनोद गायकवाड, राम तांबे, दत्ता ठुबे, पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, संपर्क प्रमुख संजय मोरे, प्रसिध्दीप्रमुख श्रीनिवास शिंदे, उपसचिव बाबाजी वाघमारे, सदस्य गंगाधर धावडे, संपत वैरागर आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मास्क व सॅनिटायझर लावुन कार्यक्रम नियमामधे घेण्यात आला.

No comments:

Post a Comment