कार्यकारी संपादक :श्री. अमर भागवत
निमगावसावा : श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. ज्ञानदेव गाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आज 26 जानेवारी हा 71 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला संविधान सरनामा (उद्देशिका ) सामूहिक वाचन करण्यात आले नंतर ध्वजरोहण करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थी कु. स्वप्नील थिटे आणि रेश्मा येवले यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्राचार्य डॉ. विलास जोशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन या दिनाचे महत्व, इतिहास आणि आपले कर्तव्य याविषयीं मार्गदर्शन केले तसेच श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेचे 11जानेवारी रोजी 25 व्या वर्षात पदार्पण झाल्याने 2020 हे संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य मा. पांडुरंग पवार, संस्थेचे सचिव गणपत घोडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष भालेराव, माजी सरपंच भालचंद्र उनवणे, माजी उपसरपंच गोविंद गाडगे, प्राचार्य डॉ. विलास जोशी, डॉ. वसंत गाडगे,माजी विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ,तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment