ग्राहक समाचार News / Web Chanal
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
नारायणगाव | ( दि.२६ ) गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरामध्ये ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी समूहगीत,सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध प्रात्यक्षिके करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह अरविंद मेहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
एन.सी.सी.,स्काऊट व गाईड मधील छात्र सैनिकांनी ध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, विश्वस्त डॉ. श्रीकांत विदवंस,नंदाताई डांगे,कार्यवाह रवींद्र पारगावकर सर्व संचालक, विविध विभागाचे प्रमुख शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी याप्रसंगी भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर,
श्री.अनंतराव इंग्लिश मीडियम स्कूल,श्रीमती एस. आर.केदारी बालक मंदिर, श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन,कला, वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी विविध समूहगीत नृत्य व प्रात्यक्षिक सादर केली.यावेळी विदयार्थ्यांनी केलेल्या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
उपमुख्याध्यापक व एन.सी.सी. कमांडिंग ऑफिसर रमेश घोलप यांचे सेवानिवृत्त होत असल्याबद्दल याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडू व कलाकार विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख भीमराव पालवे आणि राहुल नवले यांनी केले.
No comments:
Post a Comment