ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत
निमगाव सावा :
श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने निमगाव सावा गावामध्ये ग्राम स्वछता अभियान राबविल्याची माहिती विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी प्रा. दर्शन शेलार यांनी दिली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी स्वछता अभियानात उस्फुर्तपणे सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत परिसर स्वच्छ केला. तसेच गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनी साफसफाई केली. बाजारतळ, संत मनाजी बाबा चौक,प्राथमिक आरोग्य केंद्र, गावचे प्रवेशद्वार या परिसरातील कागद, पालापाचोळा, दगड गोळा केले तसेच उंच वाढलेले गवत काढून साफसफाई केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य पांडुरंग पवार यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून असे स्वच्छता उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगितले आणि यामध्ये महाविद्यालयांनी पुढाकार घेउन त्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या स्वच्छता अभियानात निमगाव सावाचे सरपंच सौ. सुनीता घोडे, उपसरपंच नजीर चौगुले, सचिन बेहेडे यांच्यासह ग्रामस्थ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोशी व्ही. एस. आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या स्वछता अभियानाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रकाश कांबळे यांनी केले.

No comments:
Post a Comment