Monday, November 2, 2020

वारूळवाडी येथून २२ वर्षीय विवाहिता दहा दिवसांपासून बेपत्ता


             नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील  वारूळवाडी (तालुका जुन्नर) येथून २२ वर्षीय विवाहिता गेली दहा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. 
            या बाबतची फिर्याद विवाहित महिलेचे पती अक्षय सुधीर बनकर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
             याबाबत सविस्तर माहिती अशी की २२ वर्षीय विवाहिता अन्नपूर्णा अक्षय बनकर लग्नापूर्वीचे नाव अन्नपूर्णा पांडुरंग कसाबे ही दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी नारायणगाव महाविद्यालयात आपला तृतीय वर्षाचा शेवटचा पेपर देण्यासाठी गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता झाली आहे. गेली दहा दिवस नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून आली नाही. दहा दिवसांपासून घरी परत न आल्यामुळे पालकांनी व तिच्या नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली आहे.
              अन्नपूर्णा हिने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून, तिचा सडपातळ बांधा, उंची पाच फुट दोन इंच, रंग गोरा आहे. असे तिचे वर्णन असून अशा वर्णनाची विवाहिता कोणाला आढळल्यास  ७९७२८८२७२४, ९६६५२२१५६९, ९३२५३७८४१६  व  ८६००९९०५३६ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन नारायणगाव पोलिसांनी केले आहे.
                 दरम्यान गेली काही महिन्यांपासून नारायणगावातील काही मुली घरातून निघून गेल्या असून त्यापैकी काहींनी प्रेम विवाह केला तर अद्यापही काही मुली बेपत्ता आहेत.
                  मुली बेपत्ता होण्याबाबत पालकांनी व नातेवाईकांनी आपल्या मुलींशी सुसंवाद राखणे गरजेचे असून या मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करणे आवश्यक आहे. असे आवाहन नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी केले आहे.

Saturday, October 31, 2020

खेड घाट बायपास रस्त्याचे व विद्युतीकरणाचे काम लवकर पूर्ण करा - खा.डॉ.अमोल कोल्हे

पुणे - खेड घाट बायपास रस्त्याचे व विद्युतीकरणाचे काम लवकर पूर्ण करा, तोपर्यंत नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी जुना रस्त्यावर एकेरी वाहतूक करा. तसेच बायपास रस्त्याची एक मार्गिका पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करुन वाहनचालकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्या. 
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर ते आळेफाटा दरम्यानच्या राजगुरुनगर, खेड घाट, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथील बायपास रस्त्यांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. हळनोर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत खेड घाट बायपास रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु आहे. तसेच महावितरणकडून इस्टिमेट मंजुरी झाली नसल्याने विद्युतीकरणाचे काम होऊ शकलेले नाही, अशी माहिती प्रकल्प संचालक चिटणीस यांनी दिली. महावितरणकडून इस्टिमेट करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल डॉ. कोल्हे यांनी नापसंती व्यक्त करीत येत्या ३-४ दिवसांत विद्युतीकरणाच्या इस्टिमेटला मंजुरी द्या अशी सूचना श्री. हळनोर यांना केली. 
 
बायपास रस्त्यालगतच्या डोंगराचे पावसाळ्यात भूस्खलन होऊन राडारोडा रस्त्यावर आल्यास अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यातून मनुष्यहानी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करावी, असे निर्देशही डॉ. कोल्हे यांनी दिले. 

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी हा अतिशय महत्त्वाचा विषय असून कामे होण्यातील दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक झाल्यावर डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार केला. तसेच बैठका घेऊन सहाही बायपासच्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यानुसार प्राधान्याने सर्वप्रथम नारायणगाव व खेड घाट बायपास बायपासची कामे सुरू झाली. या दोन्ही बायपास रस्त्यांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतुष्टतेची भावना असून खासदार डॉ. कोल्हे यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नाबद्दल नागरिक आणि वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान सद्यस्थितीत वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी खेड घाट बायपास रस्त्याची एक मार्गिका पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करावी, तर जुना घाटरस्ता नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एक दिशा मार्ग करावा, म्हणजे सणाच्या काळात वाहतूक कोंडी टाळता येईल असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Tuesday, October 27, 2020

नारायणगाव येथे दारू वाहतुक करणारे दोघेजण LCB च्या जाळ्यात!5, 20, 504 रु.चा मुद्देमाल जप्त


                 
पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ.श्री.अभिनव देशमुख यांनी दिलेल्या अवैद्य धंद्यांवर कडक कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आज दि. 27/10/2020 रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नारायणगाव-खोडद रस्त्याने एक स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम. एच. 12 एल. पी. 9996 ही भरधाव वेगाने व संशयास्पदरित्या खोडद गावच्या दिशेने जाताना दिसली 
त्यामुळे सदर गाडीचा पाठलाग करून हिवरे तर्फे नारायणगाव येथे गाडीला अडवून पथकाने त्यांच्याकडे विचारपूस करत गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये विनापरवाना व बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची वाहतुक करताना मिळुन आल्याने तात्काळ दोन पंचांना बोलावून  45, 504 रु. किंमतीची दारु व  4,75,000 रु. किंमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकुण  5, 20, 504 रु. किंमतीचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करून आरोपी व मुद्देमाल नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
            याबाबत पो.ना. दिपक साबळे यांनी फिर्याद दिली आहे. 
           निलेश बबन पळसकर वय - 36 वर्षे, रा. जांबुत ता. शिरूर, जि. पुणे व अरुण कुमार रामप्रसाद राय यादव वय- 30 वर्षे, रा. सध्या रा.जांबुत, ता.शिरूर, जि. पुणे मुळ रा. टूला मगलाहिया, मसरक पूर्व, ता. मसरक जि. छापरा, राज्य - बिहार अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.
            दोन्ही आरोपींविरुद्ध नारायणगाव पो. स्टे. गु. र. नं. 357/2020 मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई), 67 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे,  पो.ना. दीपक साबळे,पो.हवा. शरद बांबळे, पो.हवा. शंकर जम, यांचे पथकाने केली आहे.

कुकडी कालव्यालगच्या तळ्यात मोटार कार कोसळली : जाधववाडीच्या तरूणांनी वाचविले मोटारकार मधील तिनजणांचे प्राण


बोरी - ( दि २७) 
बोरी आळे रस्त्यावर असलेल्या कुकडी डाव्या कालव्यालगत असलेल्या तळ्यात मोटारकार कोसळून झालेल्या अपघातामधून मोटारकारमधील तिघेजण सुखरुप बचावले असून या तिघांना जाधववाडी येथील तिन तरूणांनी त्यांचे प्राण वाचविले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे 
याबाबत सविस्तर माहिती अशी की रविवारी ( दि २५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बोरी येथील एक कुटुंब आळेफाट्याकडून बोरी गावाकडे मोटार कार ( क्र एम एच ०५ ई जे ३७१७ )  जात असताना  बोरी आळे रस्त्यावरील कुकडी कालव्याच्या पुलावर ही कार आली असताना वाहनचालकाचा मोटारकारवरील ताबा सुटल्यामुळे ही कार कालव्याच्या भराव्यालगत असलेल्या तळ्यात जाऊन कोसळली त्याचवेळी बोरी जाधववाडी येथील शुभम जाधव गौरव जाधव शशी पटाडे हे तिघेजण त्यांच्या मोटारसायकलवरुन घराकडे जात असताना त्यांना वाचवा वाचवा म्हणून आवाज आला त्यांनी मोटासायकल थांबवून पाहिले असता त्यांना पाण्यात कोसळलेली कार दिसली व त्यामधील एक महिला एक पुरुष व एक मुलगा असे तिघेजण पाण्यात  बुडत असल्याचे दिसले रात्रीची वेळ असल्याने मदतीला कुणीही नव्हते त्याच वेळी त्यांनी एका ट्रकला थांबवून त्यामधील दोरी घेतली व शुभम याने धाडस दाखवून  पाण्यात उडी  मारली व  दोरीच्या सहाय्याने त्या तिघांना या तिन्हीही तरूणांनी सुखरुप पाण्याबाहेर काढले या घटनेतील महिलेला उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या तब्नेतीत सुधारणा झाली असून त्यांना दोन दिवसात घरी सोडण्यात येणार आहे 
शुभम आणि त्याचे दोन मित्र गौरव व शशी यांनी या तिनजणांना सुखरुप बाहेर काढल्याबद्दल त्यांचे बोरी जाधववाडी ग्रामस्थांनी कौतुक केले आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांनी शुभम यास फोन करुन त्याचे व त्याच्या मित्रांचे कौतुक केले आहे

Monday, October 26, 2020

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या दोन 19 वर्षीय तरुणांना नारायणगाव पोलिसांकडून अटक व येरवडा कारागृहात रवानगी

नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये दि. 22/10/2020 रोजी दाखल केलेल्या गुन्हयामध्ये एक अल्पवयीन मुलीस तुषार प्रभाकर जाधव वय 19 वर्ष या युवकाने त्याचा मित्र साईप्रसाद हनुमंत देवाडे वय 19 वर्ष याच्या सहायाने फूस लावून पळवून नेले होते. सदरील अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात नारायणगाव पोलीस ठाणेच्या पोलीसांना यश आले असून नमूद मुलीचा पाठलाग करणे व तिचा विनयभंग करून तिस फूस लावून पळवून नेणे असे भा. द. वि. कलम 354(A)(D) सह कलम 8,12 पोक्सो कायदया अंतर्गत यातील आरोपींना  पोलीसांनी अटक केली आहे. 
नमूद आरोपींना पोलीसांनी खेड सत्र न्यायालयासमक्ष हजर केले. खेड सत्र न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय गुंड यांनी दिली. 
            सदर गुहयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.

वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सह्याद्री लॉजवर नारायणगांव पोलिसांचा छापा

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ओझर रस्त्यावर असलेल्या धनगरवाडी येथील सहयाद्री लॉज वर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच जुन्नरचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.मंदार जवळे व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डी.के गुंड यांनी नारायणगाव पोलीस स्टाफ सोबत घेऊन सदर लॉजवर छापा मारला असून लॉजच्या मॅनेजर ला ताब्यात घेतले आहे.

दिनांक 24/10/2020 रोजी माननीय स.पो.नि. डि.के गुंड यांना गुप्त माहिती दारा मार्फत बातमी मिळाली की सह्याद्री लॉज, कारखाना फाटा, धनगरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, येथे इसम नामे प्रवीण राम जाधव वय 32 वर्षे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवून स्वतःची उपजिविका करत आहे सदर बातमीची दखल घेत सपोनि डि.के गुंड यांनी सदर बातमीचा आशय माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जवळे सो यांना कळविला सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जवळे  यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून सदर छापा कारवाईसाठी पोलीस स्टाफ, पंच व बनावट गिऱ्हाईक यांना योग्य ते मार्गदर्शन करून छापा कारवाई साठी रवाना केले.

 सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक यांनी यांनी जाऊन वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली त्याप्रमाणे सह्याद्री लॉज चे मॅनेजर मॅनेजर प्रवीण राम जाधव यांनी वेश्या गमनासाठी महिला पुरवून त्यांचेकडून एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली लागलीच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी सो मंदार जवळ यांनी व पोलीस स्टाफ व पंच यांनी सदर ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारी पीडित महिला हिला ताब्यात घेऊन लॉजचे मॅनेजर प्रवीण राम जाधव यांना ताब्यात घेतले आहे आहे तसेच सह्याद्री लॉजचे  मॅनेजर प्रवीण जाधव यास मा. न्यायालय जुन्नर हजर केले असता असता त्यांची एक दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे

         सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक श्री.विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जावळे ,  सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड हे करीत आहेत.

Monday, August 24, 2020

झापवाडी गावच्या हद्दीत दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना आळेफाटा पोलिसांकडून अटक

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
  दि.२४ रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झापवाडी हद्दीतील वस्तीवर पहाटे च्या सुमारास दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५ जनांपैकी दोघांना आळेफाटा पोलिसांनी नाकाबंदी करून पाठलाग करून पकडले आहे.अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.
मुजावर यांनी दिली.

             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
आज दि.२४ रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पहाटे ०३.०० ते ०४.०० वा च्या सुमारास मौजे झापवाडी गावाच्या हद्दीतील वस्तीवर औटी यांच्या घरावर ५ दरोडेखोर दरोडा घालण्याचा प्रयत्न करत असताना घरातील इसमांना  जाग आल्याने त्यांनी उठून आरडा ओरडा केला असता सदर दरोडेखोर हे घरावर दगडफेक करून व दहशद निर्मिण करुन मंगरुळ गावच्या फॉरेस्ट बाजूला २ मोटारसायकलवर पळून गेले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गावातील चार ही रस्त्यांवर नाका-बंदी करून त्यापैकी एका मोटर सायकल चा पाठलाग करून २ दरोडे खोर पकडण्यात आले. 
              
               त्यापैकी एक जण  जंगलात पळून गेला असून मिळून आलेल्या दोन दरोडेखोरांकडे कटावणी ,कोयता , मोटारसायकल व इतर दरोड्याचे साहित्य असा ४०,००० /- रु किमतीचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्या सोबतचे पळून गेलेले इतर 3 दरोडेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत.    
              याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये भा द वि कलम ३९९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . 
       
                सदरची कामगिरी  पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टि.वाय.मुजावर, पोलीस हवालदार भोईर ,पोलीस नाईक फड ,पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, पोलीस कॉन्स्टेबल मोमीन, चालक पोलीस कॉन्स्टेबल समाधान अहिवळे ,होमगार्ड शिरतर या पथकाने केली आहे.

साप्ता.ग्राहक समाचार News Portal
Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
◆ मालक /प्रकाशक/संपादक : 
     श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत
     📱- ७० ८३ ९५ ६९ ५६
◆ कार्यकारी संपादक : 
     श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत
     📱 ९१ ३० ३४ ९२ ९०
◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Email - grahaksamacharnews@gmail.com
SUBSCRIBE  : https://urlzs.com/NrMtx या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
facebook :
https://www.facebook.com/grahak.samachar.37
Join Our Whats app Group       
https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S