Monday, August 24, 2020

झापवाडी गावच्या हद्दीत दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना आळेफाटा पोलिसांकडून अटक

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
  दि.२४ रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झापवाडी हद्दीतील वस्तीवर पहाटे च्या सुमारास दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५ जनांपैकी दोघांना आळेफाटा पोलिसांनी नाकाबंदी करून पाठलाग करून पकडले आहे.अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.
मुजावर यांनी दिली.

             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
आज दि.२४ रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पहाटे ०३.०० ते ०४.०० वा च्या सुमारास मौजे झापवाडी गावाच्या हद्दीतील वस्तीवर औटी यांच्या घरावर ५ दरोडेखोर दरोडा घालण्याचा प्रयत्न करत असताना घरातील इसमांना  जाग आल्याने त्यांनी उठून आरडा ओरडा केला असता सदर दरोडेखोर हे घरावर दगडफेक करून व दहशद निर्मिण करुन मंगरुळ गावच्या फॉरेस्ट बाजूला २ मोटारसायकलवर पळून गेले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गावातील चार ही रस्त्यांवर नाका-बंदी करून त्यापैकी एका मोटर सायकल चा पाठलाग करून २ दरोडे खोर पकडण्यात आले. 
              
               त्यापैकी एक जण  जंगलात पळून गेला असून मिळून आलेल्या दोन दरोडेखोरांकडे कटावणी ,कोयता , मोटारसायकल व इतर दरोड्याचे साहित्य असा ४०,००० /- रु किमतीचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्या सोबतचे पळून गेलेले इतर 3 दरोडेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत.    
              याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये भा द वि कलम ३९९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . 
       
                सदरची कामगिरी  पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टि.वाय.मुजावर, पोलीस हवालदार भोईर ,पोलीस नाईक फड ,पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, पोलीस कॉन्स्टेबल मोमीन, चालक पोलीस कॉन्स्टेबल समाधान अहिवळे ,होमगार्ड शिरतर या पथकाने केली आहे.

साप्ता.ग्राहक समाचार News Portal
Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
◆ मालक /प्रकाशक/संपादक : 
     श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत
     📱- ७० ८३ ९५ ६९ ५६
◆ कार्यकारी संपादक : 
     श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत
     📱 ९१ ३० ३४ ९२ ९०
◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Email - grahaksamacharnews@gmail.com
SUBSCRIBE  : https://urlzs.com/NrMtx या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
facebook :
https://www.facebook.com/grahak.samachar.37
Join Our Whats app Group       
https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S

Sunday, August 23, 2020

फरारी खुनी आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केले जेरबंद

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]

          मौजे लांडेवाडी, ता.आंबेगाव,जि. पुणे येथील दि.२२/जून/२०२० रोजी 65 वर्षीय वृद्धाचा खून करून त्यांच्याकडील सोन्याची 
चैन व पैसे घेऊन त्यांची बॉडी डिंभे कॅनॉलच्या पाण्यात टाकुन पुरावा नष्ट करून आरोपी फरार झाला होता त्यास दि.२३ ऑगस्ट रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले व जेरबंद केले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
           अधिक माहिती अशी की
मौजे लांडेवाडी, ता.आंबेगाव,जि. पुणे येथील सुदाम विठ्ठल लांडे वय - 65 वर्षे  यांचा दि. 22/06/2020 रोजी रात्री खुन करून, त्याचेकडील सोन्याची चैन व पैसे घेऊन त्यांची बॉडी डिंभे कॅनॉलच्या पाण्यात टाकुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात.भा.दं.वि.कलम302,201,397,364,
34 नुसार गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी  विवेक उर्फ विकी सुरेश एरंडे वय - 30 वर्षे, रा. नोरोडी ता. आंबेगाव जि. पुणे मुळ रा. थुगाव ता. आंबेगाव, जि. पुणे याच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक होते परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. दि. 23/08/2020 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गणेशोत्सव व पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने खेड उपविभागात पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला आरोपीबाबत बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर आरोपी हा चास ता. खेड, जि. पुणे येथे येणार असुन त्याचे अंगावर लालसर रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व  केस वाढलेले आहेत. मिळालेल्या माहितीवरून एल. सी. बी. पुणे ग्रामीण यांचे पथक तात्काळ चास ता. खेड, जि.पुणे येथे पोहचले व आरोपीस सापळा लावुन ताब्यात घेतले.
          आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मित्राच्या साथीने मयताचा खुन करून बॉडी डिंभे कॅनॉलच्या पाण्यात टाकली असल्याची कबुली दिली आहे. 
               सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 
               सदरची कामगिरी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस नाईक दिपक साबळे, पोलीस हवालदार शरद बांबळे, शंकर जम,  जावळे, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांच्या पथकाने केली आहे.
      साप्ता.ग्राहक समाचार News Portal
Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
◆ मालक /प्रकाशक/संपादक : 
    श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत
    📱- ७० ८३ ९५ ६९ ५६

◆ कार्यकारी संपादक :
    श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत
    📱 ९१ ३० ३४ ९२ ९०

◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Email - grahaksamacharnews@gmail.com

SUBSCRIBE  : https://urlzs.com/NrMtx या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.

facebook :
https://www.facebook.com/grahak.samachar.37

Join Our Whats app Group       
https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S

Saturday, August 22, 2020

जुन्नर शहरात घरफोड्या करणारा आरोपी मंदार उर्फ सोमनाथ रासने ला LCB पथकाने सापळा रचून पकडले

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
                 दि. 22/08/2020 रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे  एक पथक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तसेच पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपिंचा शोध घेण्यासाठी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना जुन्नर शहरात घरफोडी करणारा आरोपी कळंब,ता.आंबेगाव येथे येणार असल्याचे समजल्यानंतर त्यास संपला रचून पकडण्यात आले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
                 सदर आरोपीचे नाव मंदार उर्फ सोमनाथ मदन रासने, वय - 31 वर्षे, रा. कासारआळी, सदाबाजार पेठ, जुन्नर ता. जुन्नर, जि. पुणे असे आहे. 
           जुन्नर येथील  केदार जगदीश पुरवंत  यांच्या घरी चोरी केल्याचे त्याने कबुल केले आहे. 
                 या बाबत जुन्नर पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर भा.दं.वि. कायदा कलम 457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
              यापूर्वी रासने या आरोपीवर
 जुन्नर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. 497,380.457, नुसार गुन्हे दाखल आहेत
              सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकरिता जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
             सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस नाईक दिपक साबळे, पोलीस हवालदार शंकर जम, जावळे, शरद बांबळे, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, राजु गायकवाड यांच्या पथकाने केली.

साप्ता.ग्राहक समाचार News Portal
Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
◆ मालक /प्रकाशक/संपादक : 
     श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत
     📱- ७० ८३ ९५ ६९ ५६
◆ कार्यकारी संपादक : 
     श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत
     📱 ९१ ३० ३४ ९२ ९०
◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Email - grahaksamacharnews@gmail.com

SUBSCRIBE  : https://urlzs.com/NrMtx या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
facebook :
https://www.facebook.com/grahak.samachar.37
Join Our Whats app Group       
https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S

Tuesday, August 18, 2020

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव काळात सूचनांचे पालन करा : स.पो.नि.गुंड

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]


                दि. १८/०८/२०२० रोजी नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीतील वारूळवाडी, नारायणगाव गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य यांची मिटींग पोलिस स्टेशन सभागृहात घेण्यात आली. सदर मिटींगमध्ये कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व मोहरम सणाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्स पाळुण बैठक घेण्यात आली .नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांसाठी खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन देखील यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड  यांनी केले . 
        त्यामध्ये सध्या कोरोना संसर्गाचे अनुषंगाने खालील सूचना दिल्या आहेत.
कोविड -19 चच्या अनुषंगाने यापुर्वी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी महानगरपालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे श्रीगणेशाची मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता 4फुट व घरगुती  गणपती 2 फुटांच्या मर्यादेत राहिल. सार्वजनिक गणेशमंडळांनी श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा आँनलाईन ,केबल नेटवर्क, फेसबुकव्दारे प्रक्षेपण करावेत. सार्वजनिक ठिकाणी संबंधित व्यवस्थापनाकडून सीसीटीव्ही कँमेरे बसवून घेण्यासाठी  सुचना दिल्या.  गणेशोत्सव मंडळांनी नवीन शेड न बांधता मंदिरातच गणेशमूर्तीची स्थापना करावी .    
              गणेशोत्सव साजरा करताना लोकांकडून वर्गणी सक्तीची करू नये , अन्यथा खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील . 
पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत डी.जे.वाजविणाऱ्या डी.जे.मालकांवर व आयोजकांवर कारवाई केली जाईल .
            श्री गणेशाच्या आरती साठी केवळ स्पिकर लावण्यास परवानगी दिली जाणार आहे.
तसेच (COVID - 19) संसर्गजन्य प्रादुर्भाव उपाय योजना म्हणून शासनाने दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करणेबाबत सुचना दिल्या.
         सदर मिंटींग ला वारूळवाडी, नारायणगाव गावातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष , सदस्य, शांतता कमिटी चे नागरिक ,प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते

Monday, August 17, 2020

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक मधून लोखंडी गज चोरीचा प्रयत्न करणारेच केले गजाआड : स.पो.नि गुंड यांची माहिती

ग्राहक समाचार News Portal
Reg.R.N.I.No.MAHMAR66462/1997(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री.अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव | दि.१७ रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिंडोरी नाशिकहुन पुण्याकडे लोखंडी बार (स्टील) वाहतूक करत असलेले ट्रक थांबवून ड्रायव्हर व क्लिनर यांना धमकावून स्टील ची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ४ इसमांना ताब्यात घेतले आहे.
अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
         
       1) अक्षय बबन महांबरे रा साळवाडी श्रीकृष्णनगर ता जुन्नर जि पुणे 
2)राहुल धोंडीभाऊ बेल्हेकर रा पिरसाहेब नगर साळवाडी बोरी खु|| ता जुन्नर जि पुणे 
3)आदेश बाबाजी भोर रा भोरवाडी येडगाव ता जुन्नर जि पुणे 
4)पंकज गोपीनाथ भोर रा चौदा नंबर ता जुन्नर जि पुणे अशी आरोपींची नावे आहेत.
     याबाबत अनिल गोविंद कांबळे वय 40 वर्षे व्यवसाय ट्रान्सपोर्ट रा नम्रता होसिंग सोसायटी नकाते नगर थेरगाव 33 ता हवेली जि पुणे यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

पुणे नाशिक महामार्गावर चौदा नंबर येथील स्वामी समर्थ मंदीराजवळ ते रिलायन्स पेट्रोलपंप वारुळवाडी बायपास जवळ ही घटना घडली.

अधिक माहिती अशी की, माऊली ट्रान्सपोर्ट व्यवसाया करीता 40 ते 45 ट्रक/ट्रेलर असुन त्यावर ड्रायव्हर, क्लीनर ठेवलेले असून ट्रान्सपोर्ट कंम्पनीला ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे माल ने-आन करण्यासाठी कंम्पनीचे ड्रायव्हर क्लीनर सह ट्रक/ट्रेलर पाठवत असतात.दिंडोरी नाशिक येथील एम आय टी सी रोलिंग मील या कंम्पनीची टी एम टी (स्टील) मालाचे वाहतुकीची ऑडर असल्याने नेहमी ट्रान्सपोर्ट कंम्पनीचे ट्रक/ट्रेलर दिंडोरी नाशिक ते पुणे अशी टी एम टी (स्टील) मालाची वाहतुक करत असतात. मागील पाच/सहा महिन्या पासुन दिंडोरी नाशिक येथुन वाहतुक करणारे ड्रायव्हर मालक यांना सांगत असत की,आम्हाला दिंडोरी येथुन माल घेवुन येत असताना रस्त्यात अडवणुक मारहाण करून माल चोरी करतात.आम्ही माल आणण्यासाठी जानार नाही.तुम्ही एकदा आमचे सोबत येवुन खात्री करा तुम्ही येत असाल तर आम्ही जातो असे सांगु लागल्याने मालकाने त्यांना तुम्ही गाड्या भरून घेवुन या तुम्हाला अडचन आल्यास मी येतो असे सांगुन 11 गाड्या ड्रायव्हर क्लीनर सह माल आनण्यासाठी पाठवुन दिल्या. 
           दिनांक 16/08/2020 रोजी रात्री 11/30 वा चे सुमारास माल भरूण आलेल्या गाड्या पैकी चालक रमेश देवराम सानप यांने फोन करून आपल्या गाड्या सिन्नर जि अहमदनगर पर्यंत आल्या आहेत.तुम्ही आळेफाटा येथे या असे सांगीतले म्हणुन मालक व त्यांचे सहकारी शिवाजी दळवी,विकी दळवी,प्रमोद ननवरे असे स्वीफ्ट गाडी ने आळेफाटा येथे आले.
                दिनांक 17/08/2020 रोजी रात्री 01/20 वा चे सुमारास गाड्या आऴेफाटा येथे आल्यानंतर मालकाने आळेफाटा पोलीसांची मदत घेवुन पुणे कडे  सर्व गाड्या पुढे घेऊन निघाले असताना चौदा नंबर पास होवुन पुढे स्वामी समर्थ मंदीराचे जवळ त्यांची ट्रक नं एम एच 12 क्यु डब्लु 4765 ही उभी असलेली दिसली जवळ जावुन पाहिले असता त्या ट्रक वरील ड्रायव्हर बाळासाहेब नागरगोजे व त्याचे सोबतचा क्लीनर यांना खाली बसवुन एक इसम दमदाटी करतान व दुसरा इसम ट्रक चे मागील बाजुस ट्रक मध्ये चढुन ट्रक मधील टी एम टी बार ( स्टील ) काढत असलेला दिसला.त्यावेळी पाठीमागुन आलेल्या आळेफाटा पोलीसांनी त्या दोघा इसमाना ताब्यात घेवुन नारायणगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली.
          काही वेळातच नारायणगाव चे पोलीस सदर ठिकाणी आले त्यांनी त्या दोन इसमांना लागलीच ताब्यात घेतले व त्यांना घेवुन पोलीसांसह नारायणगाव पोलीस स्टेशनला आणले.  पोलीसांनी ताब्यात घेतलल्या इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)अक्षय बबन महांबरे रा साळवाडी श्रीकृष्णनगर ता जुन्नर जि पुणे 2) राहुल धोंडीभाऊ बेल्हेकर रा पिरसाहेब नगर साळवाडी बोरी खु।। ता जुन्नर जि पुणे  असे असल्याचे सांगीतले. पोलीस त्या इसमांना विचारपुस करत असतानाच साधारण 02/00 वा चे सुमारास मालकाच्या मोबाईल वर पुढे गेलेल्या ट्रक वरील ड्रायव्हर रमेश सानप याचा फोन आला व त्यांने सांगीतले की, आपले पुढे आलेले तिन्ही ट्रक रिलायन्स पेट्रोलपंप वारूळवाडी चे पुढील बायपास जवळ दोन इसमांनी थांबवले असुन ते आम्हाला दमदाटी करून ट्रक मधील माल काढत आहेत असे सांगीतले. सदर बाबत त्यांनी पोलीसांना सांगताच लागलीच नारायणगाव पोलीस स्टेशन येथील पो शि गारगोटे, कोबल,लोहटे व पोलीस पथक यांचे सह रिलायन्स पेट्रोलपंपाचे पुढे येत असताना बायपास जवळ ट्रान्सपोर्टचे ट्रक नंबर एम एच 12 क्यु डब्लु 4764,एम एच 14 जी डी 3157, एम एच 12 क्यु जी 4315 हे उभे असलेले दिसले.
पोलीस व ट्रान्सपोर्ट मालक पुढे ट्रक कडे जावु लागले असता त्याठिकाणी एक इसम ट्रक नंबर एम एच 12 क्यु डब्लु 4764 वर चढुन माल काढत असताना व एक इसम सदर ट्रक चे चालक रमेश सानप,युवराज चव्हाण,परमेश्वर केंद्रे यांना खाली बसवुन दमदाटी करत असलेला दिसला मालक व पोलीस त्यांचेकडे येत असलेले पाहुन ते दोघे पळुन जाण्याचा प्रयत्न करू लागले असता पोलीसांनी त्यांना जागेवर पकडुन ताब्यात  घेवुन पोलीस स्टेशन ला आले असता  पोलीसांनी त्या इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) आदेश बाबजी भोर रा भोरवाडी येडगाव ता जुन्नर जि पुणे 2) पंकज गोपीनाथ भोर रा चौदा नंबर ता जुन्नर जि पुणे असे असल्याचे सांगीतले तसेच ते चौघे ही भंगारमध्ये विकण्या करीता गाड्यामधील टी एम टी बार (स्टील) काढण्यासाठी आले असल्याचा अंदाज मालकाला आल्याने
दिनांक 17/08/2020 रोजी 01/20 वा ते 02/00 वा चे सुमारास ट्रान्सपोर्ट कंम्पनीचे ट्रक दिंडोरी नाशिक ते पुणे अशी टी एम टी (स्टील) मालाची वाहतुक करीत असताना चौदा नंबर येथील स्वामी समर्थ मंदीराजवळ इसम नामे 1)अक्षय बबन महांबरे रा साळवाडी श्रीकृष्णनगर ता जुन्नर जि पुणे 2) राहुल धोंडीभाऊ बेल्हेकर रा पिरसाहेब नगर साळवाडी बोरी खु।। ता जुन्नर जि पुणे तसेच रिलायन्स पेट्रोल पंप वारूळवाडी चे पुढे असनारे बायपास जवळ त्यांचे साथीदार 3) आदेश बाबजी भोर रा भोरवाडी येडगाव ता जुन्नर जि पुणे 4) पंकज गोपीनाथ भोर रा चौदा नंबर ता जुन्नर जि पुणे  यांनी संगणमत करून आमचे ट्रान्सपोर्ट कंम्पनीचे टी एम टी बार (स्टील)भरून घेवुन चाललेले ट्रक थांबवुन त्यावरील ट्रक ड्रायव्हर व क्लीनर यांना दमदाटी करून ट्रक मधील टी एम टी बार (स्टील) चोरून नेण्याचा प्रयत्न केला.म्हणुन 
त्यांच्यावर भा द वि कलम 379,511,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पो.ना लोंढे करीत आहेत.

साप्ता.ग्राहक समाचार News Portal

Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997

(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)

◆ मालक /प्रकाशक/संपादक : 

         श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत

 📱- ७० ८३ ९५ ६९ ५६

◆ कार्यकारी संपादक : 

         श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत

 📱 ९१ ३० ३४ ९२ ९०

◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क

Email - grahaksamacharnews@gmail.com


                                                  SUBSCRIBE  : https://urlzs.com/NrMtx

 या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
facebook :
https://www.facebook.com/grahak.samachar.37

Join Our Whats app Group       

https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S

मा.शरदचंद्रजी पवार साहेब "आरोग्य मंदिर" या कोव्हिड सेंटरसाठी पारनेरच्या शिक्षकांची ७१ हजार रूपयांची मदत

 


आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आज कर्जुले हर्या येथे आज लोकार्पण झालेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या कोव्हिड सेंटरसाठी शिक्षक नेते विजयराव काकडे व मित्रमंडळाने १० ऑगस्ट रोजी आपल्या शिक्षक मित्रमंडळींचा एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. ग्रुपवर मदतीचे आवाहन केले आपल्या मित्रांच्या हाकेला साद देऊन आपण सर्व मित्र परिवाराने खारीचा वाटा उचलून या कोव्हिड सेंटरसाठी आर्थिक मदतीचा हातभार लागावा म्हणून सहकार्य केले. 
अवघ्या तीन दिवसात ७१ हजार रूपयांची मदत कोव्हिड सेंटर साठी उभी राहिली. यासाठी कोणासही खास आग्रह अथवा फोन करावा लागला नाही हे विशेष ! आर्थिक मदत किती आहे हे महत्वाचे नाही तर पारनेर तालुक्यातून या कामासाठी शिक्षक मित्रांनी पुढाकार घेतला याबाबत आ.निलेश लंके यांनाही या शिक्षकांचा सार्थ अभिमान वाटला. तन-मन-धनाने अहोरात्र जनतेच्या समस्यांसाठी लढणाऱ्या आ.लंके यांच्या या कार्यात सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना विजय काकडे यांनी धन्यवाद दिले आहेत. आज झालेल्या लोकार्पण सोहळयात हा निधी सुपुर्द करण्यात आला.

या मदतनिधीसाठी अंबादास काकडे, बिंदकुमार नरड, संतोष खामकर, सचिन गाडीलकर, दादाभाऊ कोल्हे, पोपट नवले, आदी प्राथमिक शिक्षक मित्र परिवाराने मदत केली. शिक्षकांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Saturday, August 15, 2020

नारायणगाव ग्रामपंचायत येथे कोरोना योद्धांच्या हस्ते ध्वजारोहन..

ग्राहक समाचार News Portal
Reg.R.N.I.No.MAHMAR66462/1997(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री.अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]

    सरपंच योगेश पाटे यांच्याकडुन रुग्णवाहिका चालक संजय भोर, विनायक जाधव, ओंकार जंगम यांना ध्वजारोहणाची संधी.
  नारायणगाव : नारायणगाव व परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णवाहिका चालक संजय भोर, विनायक जाधव, ओंकार जंगम यांनी कोरोना काळात कोरोना संशयीत व्यक्तींची पीपीई किट घालून आपल्या जीवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार केले, आजारी पेशंट कोणतीही पर्वा न करता दवाखान्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले तसेच आशावर्कर,
आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका,
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे कामही उल्लेखनीय आहे.

               या कार्याचे कौतुक करत लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत नारायणगावच्यावतीने कोरोना योद्धा रुग्णवाहिका चालक संजय भोर, विनायक जाधव, ओंकार जंगम, माऊली माने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहन करण्यात आले यानिमित्त गावात शासकीय कार्यालयांना विद्युत रोषणाई, मेन बाजारपेठेत फुग्यांची सजावट केली होती.

           यानिमित्तानं लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिकाताई डेरे, मंडलाधिकारी डी.बी.काळे, तलाठी नामदेव सोनवणे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, गणेश पाटे, राजेश बाप्ते, ज्योतीताई दिवटे, रुपालीताई जाधव, भागेश्वर डेरे, ईश्वर पाटे,प्रा.अशपाक पटेल, योगेश गांधी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.