Thursday, July 30, 2020

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हाप्रमुख पदी खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त अश्विनी ताई थोरात


श्रीनिवास शिंदे - उप संपादक, ग्राहक समाचार, पारनेर

पारनेर / प्रतिनिधी, 
                      अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हाप्रमुख पदी खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त अश्विनी ताई थोरात पाटील मॅडम यांची निवड झाल्याबद्दल कोरठण खंडोबा देवस्थानचे उपाध्यक्ष आदरणीय गंगाराम शेठ बेलकर खंडोबा देवस्थानचे विश्वस्त किसनराव धुमाळ बिरोबा देवस्थान चे विश्वस्त वसंतराव दातीर सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे यांनी अभिनंदन केले. 

तसेच यावेळी कोरठण खंडोबा देवस्थानचे उपाध्यक्ष आदरणीय गंगाराम शेठ बेलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

भिगवण येथील कारवाईत ९ गावठी पिस्तुल व ११ जिवंत काडतुसे जप्त ! पुणे ग्रा.ATS-LCB व भिगवण पोलिसांची संयुक्त कारवाई.

कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
 भिगवण येथे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक (ATS) व भिगवण पोलिस स्टेशन यांनी मागील आठवड्यामध्ये कारवाई करून तीन सराईतांकडून ४ गावठी पिस्तूल व ८ जिवंत काडतुसे ताब्यात घेतली होती. हि गावठी पिस्तूल  त्यांनी विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आल्या नंतर पुढील तपास करून या सराईत गुन्हेगारांकडून अजून ५ गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे असे एकूण ९ गावठी पिस्तुल व ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 
सदर कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक (ATS) स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व भिगवण पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे केली आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.
मागील आठवड्यात केलेल्या कारवाईत यातीन सराईतां कडून ४ गावठी पिस्तुल व ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती. 
     या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुढील तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना विशेष पथक तयार करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व भिगवण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख व इतर स्टाफ यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने अधिक चौकशी करून पुढील तपासामध्ये ताब्यात घेतलेल्या तीन सराईत गुन्हेगारांकडून अजून पाच गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 

      सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख भिगवण पोलिस स्टेशन, सहाय्यक फौजदार विश्वास खरात, किरण पांढरे, विजय कांचन, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, अमोल शेडगे, धीरज जाधव, मंगेश भगत, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक व भिगवन पोलीस स्टेशन स्टाफ च्या संयुक्त पथकाने केली.
           पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

साप्ता.ग्राहक समाचार News Portal
Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
◆ मालक /प्रकाशक/संपादक : 
         श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत
 📱- ७० ८३ ९५ ६९ ५६
◆ कार्यकारी संपादक : 
         श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत
 📱 ९१ ३० ३४ ९२ ९०
◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Email - grahaksamacharnews@gmail.com

                                                  SUBSCRIBE  : https://urlzs.com/NrMtx
 या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
Join Our Whats app Group       
https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S

Monday, July 27, 2020

४ गावठी पिस्तूल व ८ जिवंत काडतुसा सह सराईत गुन्हेगार ताब्यात. पुणे ग्रामीण ATS पथक व भिगवण पोलिस स्टेशन यांची मोठी कारवाई

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
पुणे ( दि.२६ )पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह भिगवण परिसरात गस्त करत असताना दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS)  महेंद्र कोरवी  यांना भिगवण स्टँड परिसरामध्ये तीन इसम गावठी पिस्तूल घेऊन येणार आहेत अशी बातमी मिळाली होती मिळालेल्या गोपनीय बातमीवरून पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने भिगवण पोलिसांच्या मदतीने तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल व आठ जिवंत काढतुस ताब्यात घेतले आहेत.अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.
 सदर इसमांवर बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी किरण कुसाळकर यांनी फिरियाद दिली वरून  भिगवण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
                सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार सुनील ढगारे, राजू पवार, रज्जाक शेख, जितेंद्र शेवाळे, विश्वास खरात, पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे, ईश्वर जाधव, विशाल  भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत, मोसिन शेख,अरुण पवार तसेच पोलीस नाईक गोरख पवार व इकबाल पठाण या भिगवन पोलीस स्टाफ पथकाने केली.

पत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी ! नारायणगाव पोलिस स्टेशनला "मी एक पत्रकार" ग्रुप च्या वतीने निवेदन.

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव (दि.२७) - जुन्नर तालुक्यात पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आरोपींसह तक्रारदार यांचीही योग्य ती चौकशी करुन पत्रकारांवर बदनामी करण्याच्या दृष्टीने दाखल करण्यात येणार्‍या गुन्ह्याबाबात चौकशी  करुन योग्य तो न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन  मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर तालुक्याच्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना देण्यात आले. 
हे निवेदन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदिप पाटील, पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना य‍ांनाही देण्यात आले आहे.
                 यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला पत्रकारांचे नेहनीच सहकार्य आहे. चुकीच्या पद्घतीने किंवा कायद्याचा दुरुपयोग करुन काही होणार नाही असे सांगत आरोपींसह तक्रारदार यांचीही चौकशी करुन योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.
                 यावेळी अतुल परदेशी म्हणाले की सर्व पत्रकार एकत्र आहेत पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे व पत्रकारांना योग्य न्याय द्यावा अशी भुमिका पत्रकारांच्यावतीने मांडली.
             यावेळी अतुल परदेशी, सुरेश वाणी, रविंद्र पाटे,  सचिन कांकरिया, अॅड.कुलदिप नलावडे, अतुल काकंरिया, किशोर चौरे, प्रा.अशफाक पटेल, पवन गाडेकर, आयुब शेख, दर्शन फुलपगार, मंगेश पाटे, स्वप्निल ढवळे, चेतन बोर्‍हाडे, रफिक शेख, अमर भागवत,तान्हाजी तांबे, सुभाष घुले यांसह प्रिंट व ईलेक्ट्राॅनिक मिडीयाचे मी एक पत्रकार ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
            सदर मिटिंग उपस्थित पत्रकारांची कोरोना सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन  संपन्न झाली. 
            यावेळी अतुल परदेशी, सचिन कांकरिया, रविंद्र पाटे, सुरेश वाणी, अॅड.कुलदिप नलावडे यांनी पत्रकार सुरक्षा व पुढील कार्यवाही विषयी मार्गदर्शन केले.
            या मिटिंगचे प्रास्ताविक प्रा.अशफाक  पटेल यांनी केले तर आभार किशोर चौरे यांनी मानले.

चुलत भावाने केला पोटात व हातावर सुरीने वार !नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव (दि.२७) किरकोळ कारणावरून चुलत भावाने पोटात व दंडावर सुरीने वार केल्याबद्दल एक जणांवर नारायणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
           याबाबत विशाल ज्ञानेश्वर मेहेर  (राहणार वारूळवाडी, ता. जुन्नर)  याच्यावर  भा.द.वि. कलम ३०७, ५०६  नुसार  दिनांक २६ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            याबाबत महेश सुरेश मेहेर (वय ३०, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार वारूळवाडी ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 
             या घटनेची अधिक माहिती अशी की, आमच्या मालकीच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर का आणला ? असा जाब विचारत  अंगावर धावून येऊन  तसेच  एका एकाला  खलास करून टाकतो, अशी धमकी देऊन आरोपी विशाल ज्ञानेश्वर मेहेर याने  खिशातील सुरी महेश मेहेर यांच्या पोटात खुपसली व डाव्या हाताच्या दंडावर मारून गंभीर दुखापत केली. ही घटना वारूळवाडी तालुका जुन्नर येथील पाण्याच्या टाकीजवळ दिनांक २६ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 
          या घटनेवरून  आरोपी  विशाल ज्ञानेश्वर मेहेर याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. सी. झिंजुरके हे करीत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेरमध्ये साकारले ५० बेडचे अद्ययावत कोव्हिड सेंटर ; रक्तदानासह १ लाख मास्क व सॅनिटायझरचे वाटप

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
श्रीनिवास शिंदे - उप संपादक, ग्राहक समाचार, पारनेर 




पारनेर :-
            शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता रक्तदानासह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पारनेर येथील शिवसैनिकांनी महाराष्ट्र राज्यातील पहिले अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्यामुळे याचा फायदा पारनेर तालुक्यातील रूग्णांना होणार आहे असा आशावाद विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या यांनी व्यक्त केला आहे.



उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोमवार दि. २७ जुलै रोजी पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पारनेरमध्ये ५० बेडचे कोव्हिड रूग्णालयाचे लोकार्पण विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी व संंपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी आ.औटी म्हणाले की, जागतिक महामारीच्या संकटात देशासह महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदर्श कामगिरीची दखल घ्यावी लागणार आहे.

            सोशल मीडियावर महाराष्ट्र जनतेला रक्तदानाचा आवाहन केले होते त्यामळे या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबीराचे आयोजन करून समाजाला उपयोगी कार्यक्रम राबविले आहे. 20 लक्ष रुपयांचा निधी शिवसैनिकांनी या कोव्हिड सेंटरसाठी दोन दिवसात उपलब्ध करून दिला असुन याचा फायदा समाजाला होणार आहे.

       यावेळी विधानसभा माजी उपाध्यक्ष विजय औटी, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, युवानेते अनिकेत औटी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार देवरे, नगराध्यक्षा वर्षा नगरे, दुधसंघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, पं.स.सदस्य दिनेश बाबर, अशोक कटारिया, अ‍ॅड. युवराज पाटील, शंकर नगरे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, नगरसेवक मुदस्सर सय्यद, नगरसेवक किसन गंधाडे, आनंदा औटी, साहेबराव देशमाने व युवासेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शेळके, संतोष येवले, पैलवान युवराज पठारे, डॉ. राजेश भनगडे, शहरप्रमुख निलेश खोडदे आदी उपस्थित होते.

Friday, July 24, 2020

धनगर समाज संघर्ष समिती युवक अध्यक्ष पारनेर तालुका पदी कासारे गावचे युवा कार्यकर्ते शरद पांडुरंग शिंदे यांची निवड

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
श्रीनिवास शिंदे - उप संपादक, ग्राहक समाचार



पारनेर, 
          धनगर समाज संघर्ष समिती युवक अध्यक्ष पारनेर तालुका पदी कासारे गावचे युवा कार्यकर्ते शरद पांडुरंग शिंदे यांची निवड करण्यात आली. पारनेर तालुक्यात युवकांचे मजबूत संघटन करुन समाजाचे शैक्षणिक, सामाजिक कार्य करण्यासाठी शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. 
           धनगर समाज संघर्ष समिती,अहमदनगर द जिल्हा अध्यक्ष इंजि. डी. आर. शेंडगे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
----------------------------------

SUBSCRIBE  : https://urlzs.com/NrMtx
या लिंकवर क्लिक करून चॅनल सब्सक्राईब करा

ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यूट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.