ग्राहक समाचार ( अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ )
कार्यकारी संपादक : श्री.अमर भागवत
श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान निमगाव सावा ता. जुन्नर जि. पुणे ही सामाजिक संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. संस्थेकडून नेहमीच सेवाभावी वृत्तीने इफ्तार पार्टी, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिरे,वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी गौरव, सामुदायिक विवाह सोहळा असे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेकडून राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सौ. राजश्रीताई बेनके संचालिका श्रीराम पतसंस्था नारायणगाव, सौ. अनघाताई घोडके सदस्या पंचायत समिती जुन्नर, मा.शरदराव लेंडे गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस, पांडुरंग पवार मा उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य जि. प. पुणे, प्राचार्य डॉ. विलास जोशी,सचिव गणपत घोडे हे मान्यवर उपस्थित होते.
आशाताई जाधव सरपंच जाधववाडी, सौ. सुप्रिया वाघ सदस्य ग्रामपंचायत गुंजाळवाडी, सौ. चंदाताई गाडगे संस्थापिका सारिका पवार पतसंस्था, सौ. अनघाताई घोडके सदस्य पंचायत समिती जुन्नर,राजश्रीताई बेनके मा. पांडुरंग पवार, शरदराव लेंडे, यांनी मनोगते व्यक्त केली.
बेल्हे , गुंजाळवाडी, साकोरी, नळावणे, शिंदेवाडी, आणे, रानमळा, गुळुंचवाडी, मंगरूळ बांगरवाडी, तांबेवाडी, निमगाव सावा, राजुरी पारगाव, आळे, औरंगपूर, कोंबरवाडी,उंचखडक पेमदारा पिंपरी कावळ, जाधववाडी, सुलतानपूर, नारायणगाव या विविध गावातून 77 कर्तृत्ववान महिला उपस्थित होत्या. त्यांचे संस्थेच्या वतीने सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी निमगाव सावा आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, पदाधिकारी,ग्रामस्थ, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, दिलीप वळसे पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.यावेळी संस्थेकडून सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. छाया चक्कर, प्रास्तविक प्रा. ज्योती अहिनवे, प्रा. रविना तांबडे, आणि प्रा. सुप्रिया सासवडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment