ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
दि. 22/08/2020 रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तसेच पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपिंचा शोध घेण्यासाठी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना जुन्नर शहरात घरफोडी करणारा आरोपी कळंब,ता.आंबेगाव येथे येणार असल्याचे समजल्यानंतर त्यास संपला रचून पकडण्यात आले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
सदर आरोपीचे नाव मंदार उर्फ सोमनाथ मदन रासने, वय - 31 वर्षे, रा. कासारआळी, सदाबाजार पेठ, जुन्नर ता. जुन्नर, जि. पुणे असे आहे.
जुन्नर येथील केदार जगदीश पुरवंत यांच्या घरी चोरी केल्याचे त्याने कबुल केले आहे.
या बाबत जुन्नर पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर भा.दं.वि. कायदा कलम 457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी रासने या आरोपीवर
जुन्नर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. 497,380.457, नुसार गुन्हे दाखल आहेत
सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकरिता जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस नाईक दिपक साबळे, पोलीस हवालदार शंकर जम, जावळे, शरद बांबळे, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, राजु गायकवाड यांच्या पथकाने केली.
साप्ता.ग्राहक समाचार News Portal
Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
◆ मालक /प्रकाशक/संपादक :
श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत
📱- ७० ८३ ९५ ६९ ५६
◆ कार्यकारी संपादक :
श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत
📱 ९१ ३० ३४ ९२ ९०
◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Email - grahaksamacharnews@gmail.com
SUBSCRIBE : https://urlzs.com/NrMtx या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
facebook :
https://www.facebook.com/grahak.samachar.37
Join Our Whats app Group
https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S
No comments:
Post a Comment