ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
दि. १८/०८/२०२० रोजी नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीतील वारूळवाडी, नारायणगाव गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य यांची मिटींग पोलिस स्टेशन सभागृहात घेण्यात आली. सदर मिटींगमध्ये कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व मोहरम सणाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्स पाळुण बैठक घेण्यात आली .नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांसाठी खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन देखील यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी केले .
त्यामध्ये सध्या कोरोना संसर्गाचे अनुषंगाने खालील सूचना दिल्या आहेत.
कोविड -19 चच्या अनुषंगाने यापुर्वी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी महानगरपालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे श्रीगणेशाची मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता 4फुट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादेत राहिल. सार्वजनिक गणेशमंडळांनी श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा आँनलाईन ,केबल नेटवर्क, फेसबुकव्दारे प्रक्षेपण करावेत. सार्वजनिक ठिकाणी संबंधित व्यवस्थापनाकडून सीसीटीव्ही कँमेरे बसवून घेण्यासाठी सुचना दिल्या. गणेशोत्सव मंडळांनी नवीन शेड न बांधता मंदिरातच गणेशमूर्तीची स्थापना करावी .
गणेशोत्सव साजरा करताना लोकांकडून वर्गणी सक्तीची करू नये , अन्यथा खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील .
पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत डी.जे.वाजविणाऱ्या डी.जे.मालकांवर व आयोजकांवर कारवाई केली जाईल .
श्री गणेशाच्या आरती साठी केवळ स्पिकर लावण्यास परवानगी दिली जाणार आहे.
तसेच (COVID - 19) संसर्गजन्य प्रादुर्भाव उपाय योजना म्हणून शासनाने दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करणेबाबत सुचना दिल्या.
सदर मिंटींग ला वारूळवाडी, नारायणगाव गावातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष , सदस्य, शांतता कमिटी चे नागरिक ,प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते
No comments:
Post a Comment