ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
वारूळवाडी येथे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्रामसंसद भवन या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
नारायणगाव वारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद ही वास्तू गावच्या वैभवात भर टाकणारी व नावलौकीक वाढविणारी आहे असे गौरवोदगार कोल्हे यांनी व्यक्त केले .
यावेळी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे , सभापती ऍड संजय काळे , जि . प.सदस्या आशा बुचके , पांडुरंग पवार , सरपंच जयश्री बनकर , उपसरपंच सचिन वारुळे , रमेश भुजबळ , वैद्यकीय अधिकारी डॉ . वर्षा गुंजाळ , उद्योजक संजय वारुळे , बाजार समिती संचालक विपुल फुलसुंदर , ग्रामसेवक विद्याधर मुळूक , जालिंदर मोहे , जंगल कोल्हे , राजेंद्र मेहेर , रवी साळुके , अविनाश घोलप , सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .
या कार्यक्रमास माजी आमदार शरद सोनवणे आणि विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनीही भेट दिली .
उत्तर पुणे जिल्हात सर्वात मोठी आणि अद्यावत सुविधा असलेली १५ हजार ८०० स्क्वे . फुटाची ही ग्रामपंचायत इमारत असून या ग्रामपंचायतीमध्ये स्वागतकक्ष , सरपंच , ग्रामसेवक 1. अतिथी कक्ष , भूमी अभिलेख कक्ष ,वाचनालय अशा सुविधा आहेत , तालुक्यातील सर्वात मोठी असलेली वारूळवाडी ग्रामपंचायत ओळखली जाणार आहे अशी माहिती संजय वारुळे आणि उपसरपंच सचिन वारुळे यांनी दिली .
कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दलडॉ.वर्षा गुंजाळ व आरोग्य सेवक यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मेहेर यांनी केले तर जंगल कोल्हे यांनी आभार मानले .
दरम्यान जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचे पुणे याठिकाणी कोरोना उपचारा दरम्यान निधन झाल्याने हा उद्घाटन सोहळा अवघ्या २० मिनिटांत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून सर्व उपस्थितांच्या वतीने कै. दशरथ पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
No comments:
Post a Comment