ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
मौजे लांडेवाडी, ता.आंबेगाव,जि. पुणे येथील दि.२२/जून/२०२० रोजी 65 वर्षीय वृद्धाचा खून करून त्यांच्याकडील सोन्याची
चैन व पैसे घेऊन त्यांची बॉडी डिंभे कॅनॉलच्या पाण्यात टाकुन पुरावा नष्ट करून आरोपी फरार झाला होता त्यास दि.२३ ऑगस्ट रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले व जेरबंद केले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
अधिक माहिती अशी की
मौजे लांडेवाडी, ता.आंबेगाव,जि. पुणे येथील सुदाम विठ्ठल लांडे वय - 65 वर्षे यांचा दि. 22/06/2020 रोजी रात्री खुन करून, त्याचेकडील सोन्याची चैन व पैसे घेऊन त्यांची बॉडी डिंभे कॅनॉलच्या पाण्यात टाकुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात.भा.दं.वि.कलम302,201,397,364,
34 नुसार गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी विवेक उर्फ विकी सुरेश एरंडे वय - 30 वर्षे, रा. नोरोडी ता. आंबेगाव जि. पुणे मुळ रा. थुगाव ता. आंबेगाव, जि. पुणे याच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक होते परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. दि. 23/08/2020 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गणेशोत्सव व पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने खेड उपविभागात पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला आरोपीबाबत बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर आरोपी हा चास ता. खेड, जि. पुणे येथे येणार असुन त्याचे अंगावर लालसर रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व केस वाढलेले आहेत. मिळालेल्या माहितीवरून एल. सी. बी. पुणे ग्रामीण यांचे पथक तात्काळ चास ता. खेड, जि.पुणे येथे पोहचले व आरोपीस सापळा लावुन ताब्यात घेतले.
आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मित्राच्या साथीने मयताचा खुन करून बॉडी डिंभे कॅनॉलच्या पाण्यात टाकली असल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस नाईक दिपक साबळे, पोलीस हवालदार शरद बांबळे, शंकर जम, जावळे, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांच्या पथकाने केली आहे.
Reg.- R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
◆ मालक /प्रकाशक/संपादक :
श्री. ज्ञानेश्वर बबनराव भागवत
📱- ७० ८३ ९५ ६९ ५६
◆ कार्यकारी संपादक :
श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत
📱 ९१ ३० ३४ ९२ ९०
◆ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Email - grahaksamacharnews@gmail.com
SUBSCRIBE : https://urlzs.com/NrMtx या लिंकवर क्लिक करून ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी "Grahak Samachar" यू ट्यूब चॅनल सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.
facebook :
https://www.facebook.com/grahak.samachar.37
Join Our Whats app Group
https://chat.whatsapp.com/FqwkZM1wrYBE2jtsvflh1S
No comments:
Post a Comment