Wednesday, August 12, 2020

नारायणगावचे स.पो.नि.घोडे पाटील शिक्रापूर चे पो.ना.इनामे सेवेतून निलंबित तर नारायणगाव पो.ना.हांडे बडतर्फ

ग्राहक समाचार News Portal
Reg.R.N.I.No.MAHMAR66462/1997
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री.अमर भागवत
               नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सह पोलीस नाईक धर्मात्मा हांडे यांनी गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक बनं .२१८८/श्री .हेमंत गांडरंग इनामे यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत घोडे पाटील व  इनामे यांना यांना सेवेतून तात्काळ निलंबित केले असून पोलीस नाईक हांडे यांना शिस्तभंगविषयक कार्यवाही अंतर्गत शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ केले 
असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालया कडून देण्यात आली आहे.
           याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की
 सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अर्जुन केशव घोडेपाटील व पोलीस नाईक बनं.७८०/श्री.धर्मात्मा काराभारी हाडे , नेमणुक नारायणगांव पोलीस ठाणे , पुणे ग्रामीण यांनी फिर्यादीकडून गुन्हयात मदत करण्यासाठी व दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुध्द दिनांक . ११/०८/२०२० रोजी , नारायणगाव पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण येथे गुर न . २४८/२०२०,भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे .           
                    तसेच शिकापुर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दिनांक २२/०७/२०२० रोजी , चाकण चौक येथे पेट्रोलींग दरम्यान बेकायदेशीर वाळू वाहतुक करणारा टाटा भारत बेंझ हायवा ट्रक एम.एच .१४ / एच.जी .७२९१ मिळुन आल्याने सरदचे वाहन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी शिक्रापुर पोलीस ठाणे आवारात लावण्यात आले होते . पोलीस नाईक बनं .२१८८/ श्री.हेमंत गांडरंग इनामे,नेमणक शिकापुर पोलीस ठाणे,पुणे ग्रमीण यांनी बेकायदेशीरपणे सदर ट्रकमधील वाळुवरती इतर इसमाच्या सहभागाने दगडाचे बारीक क्रशरचा थर टाकुन खोडसाळपणा करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे .
             पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील यांनी सदरहु घटनेची गंभीर दखल घेतली असुन 
सहायक पोलीस निरीक्षक श्री.अर्जुन केशव घोडेपाटील व पोलीस नाईक ब.नं.२१८८/श्री.हेमंत गाइरंग इनामे,नेमणुक शिकापुर पोलीस ठाणे , यांना सेवेतून तात्काळ निलंबित केले असून त्यांचेविरूध्द खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत .      तसेच पोलीस नाईक ब.नं .७८० / श्रीधर्मात्मा कारभारी हांडे नेमणुक नारायणगांव पोलीस ठाणे,यांना शिस्तभंगविषयक कार्यवाही अंतर्गत शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ केले आहे .

No comments:

Post a Comment