Wednesday, June 3, 2020

चक्रीवादळात ही ATS पुणे ग्रामीण सतर्क ! सराईत गुंड गावठी पिस्तूलसह ताब्यात !नारायणगाव पोलिस स्टेशनच्या मदतीने कारवाई.

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत [अध्यक्ष - अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
    (दि.४)  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे पथक नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त करीत असताना कावळ पिंपरी येथे एका इसमाकडे गावठी पिस्तूल असल्याची गोपनीय बातमी मिळाल्या नंतर त्या इसमाकडून गावठी पिस्तूल व एक कडतुस हस्तगत केले असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई दहशतवाद विरोधी कक्ष पुणे ग्रामीण यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन च्या मदतीने केली आहे.अशी माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.
         दि . ०३/०६/२०२० रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष चे सहाय्यक पोलीस निरीक्षक  अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह नारायणगाव परिसरात गस्त करीत असताना  दहशतवाद विरोधी कक्षाचे (ATS) सहा. पोलीस उपनिरीक्षक राजू पवार तसेच किरण कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे  रोहिदास बाबुराव पाबळे ( वय ३७ वर्षे ) राहणार  कावळ पिंपरी तालुका जुन्नर यास नारायणगाव पोस्टेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे पाटील व स्टाफ यांच्या मदतीने कावळ पिंपरी येथून ताब्यात घेऊन त्याचेकडून एक गावठी पिस्तूल एक जिवंत काडतुस हस्तगत करून कारवाई करण्यात आली. त्याच्यावर बेकायदेशीर बिगरपरवाना शस्त्र बाळगले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
      या आरोपीवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारखे गुन्हे दाखल आहेत.
             सदर कारवाई  पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री.संदीप पाटील ,अपर पोलीस अधीक्षक  श्री. विवेक पाटील ,जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती दीपाली खन्ना, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट
 यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील , दहशतवाद विरोधी कक्षाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू पवार, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, मोसिन शेख तसेच  नारायणगाव पोलिस स्टेशनचे योगेश गारगोटे, सचिन कोबल या पथकाने केली.

No comments:

Post a Comment