Saturday, June 20, 2020

आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई १६०० किलो गोमांस जप्त !

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
(अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका)

पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्याच्या हद्दीच्या असलेल्या आळेखिंड (ता. जुन्नर) येथे नाकाबंदी दरम्यान आळेफाटा पोलिसांनी गोमांसची वाहतूक करणारा टेम्पो पकडला असून त्यामधून १६०० किलो गोमांस व टेम्पो असा एकूण ११ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या वीस दिवसात ही तिसरी कारवाई झाल्याने आळेफाटा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी टी वाय मुजावर आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
       याबाबत सविस्तर आळेफाटा पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की शनिवारी ( दि२० )  पहाटे पुणे जिल्हा हद्द आळेखिंड येथे आळेफाटा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर आणि त्यांचे सहकारी नाकाबंदी करताना  पुणे नाशिक महामार्गावरुन संगमनेर येथून मुंबईकडे जात असलेला भाजीपाल्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक  एम एच ०४  जे के ५०३५ ) मधून  पाठीमागच्या बाजूला खाली पाणी पडत असल्याचे दिसून आले त्यामुळे संशय आल्याने टेम्पो चालकाकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक मुजावर यांनी  आळेखिंड चेकपोस्ट येथील लाईटचे उजेडात आयशर टेम्पो मधील भाजीपाला पाठीमागून काढून तपासणी केली असता आतमध्ये गोवंशाचे  मांस असल्याचे निदर्शनास आले.सदर चालकास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव जहीर इस्माईल कुरेशी,वय 38,रा.साकी विहार रोड, मुंबई असे असल्याचे सांगितले. सदर टेम्पो मध्ये असलेले गोवंश कत्तलीचे मांस पाहणी करून वजन केले असता एकुण  सोळाशे किलो वजनाचे गोमांस 
मिळून आले या बाबत आळेफाटा पोलिसांनी सुमारे तिन लाख वीस हजार किमतीचे गोमांस व आठ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ११ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात चालक जहीर इस्माईल कुरेशी, रा.साकी विहार रोड,मुंबई याचे विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी सांगीतले 
आळेफाटा पोलिसांनी १ जून रोजी आळे येथे छापा टाकून सुमारे पाचशे किलो गोमांस जप्त केले होते व कत्तलीसाठी चालविलेल्या आठ जनावरांची सुटका केली होती व त्यानंतर १७ जून रोजी पुन्हा आळे येथे छापा टाकून सहाशे चाळीस किलो गोमांस जप्त करुन तीन जनावरांची सुटका केली होती तर आज पुन्हा ३ लाख २० हजार रूपये किमतीचे गोमांस पकडून सर्वात मोठी कारवाई केली आहे त्यामुळे आळेफाटा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment