Wednesday, May 27, 2020

ओतूर हद्दीत चोरीच्या वाळू सह हायवा ट्रक जप्त ! पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

ग्राहक समाचार News Portal
[ अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक श्री. अमर भागवत
(अध्यक्ष - अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका)
          दि २६ रोजी ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत असताना डुंबरवाडी टोल नाका येथे चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व मालकावर कारवाई करून चोरीच्या वाळू सह हायवा ट्रक सह जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे.
      अधिक माहिती अशी की,  दि. २६ रोजी कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक  जुन्नर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना ओतुर पो. स्टे. च्या हद्दीत डुंबरवाडी टोलनाका येथे टाटा कंपनीच्या हायवा ट्रकचा मागील नंबरवर चिखल-माती लावला असल्याचे दिसुन आल्याने त्या हायवा ट्रक ची तपासणी केली असता ट्रकमध्ये वाळु मिळुन आली. ट्रकचालक आरोपी सोमनाथ चरणदास निकम वय २१ वर्षे , रा. जांबुत, ता. संगमनेर, जि. अहमदनगर याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे मालक आरोपी धनंजय डुंबरे रा. ओतुर ता. जुन्नर जि. पुणे यांचे सांगण्यावर  ही वाळु आणल्याचे सांगितले. 
               सदरची वाळु चोरून आणली असल्याने वाळू वाहतुकीचा १२ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा हायवा ट्रक  व त्यातील १५ हजार रुपये किंमतीची तीन ब्रास वाळु असा १२ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून , त्याबाबत ओतुर पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी व जप्त मुद्देमाल ओतुर पोलिसांकडे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे.
               सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र मांजरे, पो. हवा.सुनील जावळे, पो. हवा.शरद बाबळे, पो.ना. दीपक साबळे, पो.ना.प्रमोद नवले यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment