Wednesday, June 10, 2020

खून करून फरार झालेला आरोपी २४ तासाच्या आत मध्ये ताब्यात.पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व नारायणगाव पोलिस स्टेशन यांची संयुक्त कारवाई.

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ. भा. ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]

          नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदवाडी, वारूळवाडी येथील अमोल उर्फ पामर भुजबळ (वय २८) याने महेश धनराज भुजबळ (वय २२) या आपल्या सख्ख्या चुलत भावाचा कुर्‍हाडीने डोक्यात व मानेवर घाव घालून खून करून आरोपी फरार झाला होता. ही घटना दि. ०९  रोजी दुपारी घडली होती.
            खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने आज दि.१० रोजी नारायणगाव पोलीसपोलीस स्टेशन च्या मदतीने २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. अशी माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.
             पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष चे सहाय्यक पोलीस निरीक्षक  अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह नारायणगाव परिसरात गस्त करीत असताना  दहशतवाद विरोधी कक्षाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक राजू पवार यांना गोपनीय बातमी मिळाली की  दि ०९/०६/२०२० रोजी आपल्या चुलत भावाचा खून करून फरारी झालेला आरोपी अमोल बाळकृष्ण भुजबळ  राहणार आनंदवाडी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा  दुचाकीवरून खेड वरून मंचर च्या दिशेने येत आहे. बातमी मिळाल्यानंतर  नारायणगाव पोलिस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक  अर्जुन घोडे पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांचा स्टाफ मदतीला घेऊन सदर आरोपीस  दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले व पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे.
             सदर कारवाई  श्री संदीप पाटील पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री विवेक पाटील अपर पोलीस अधीक्षक पुणे, श्रीमती दीपाली खन्ना उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर उपविभाग.  श्री  पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील नारायणगाव पोलिस स्टेशन यांच्या
मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू पवार, किरण कुसाळकर नारायणगाव पोस्टेचे भीमा लोंढे व शैलेश वाघमारे या पथकाने केली.

No comments:

Post a Comment