ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव| येडगाव हद्दीतील जांबुत फाटा येथे बेकायदा आणि विनापरवाना केमिकलयुक्त ताडी विक्री करणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून केमिकलयुक्त 14,000 रुपये किमतीची 140 लिटर ताडी नारायणगाव पोलिसांनी जप्त केली आहे.अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. ताडी विक्री प्रकरणी राजू शंकर भंडारी वय 41 राहणार भोरवाडी येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांनी दिली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावरील येडगाव हद्दीतील जांबुतफाटा येथे दि.25 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास एका घराच्या आडोशाला राजू भंडारी याने घरीच काही पावडर व केमिकल टाकून बनवलेली बेकायदा व विनापरवाना केमिकलयुक्त ताडी तयार करून विक्री करीत होता.
सहाय्यक फौजदार पोलीस हवालदार सचिन कोबल, नवीन अरगडे,स्वप्निल लोहार या पोलिस पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. या छाप्यात पोलिसांनी 14,000 रुपये किमतीचे एकूण 140 लिटर चार काळे व निळे रंगाचे कॅन हस्तगत केली आहे.
No comments:
Post a Comment