ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
( नारायणगाव ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचार बंदीच्या अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत दि.१२ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पेट्रोलिंग करत असताना ओतूर हद्दीत काही इसम तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती स.पो. नि.रवींद्र मांजरे यांना बातमीदाराकडून मिळाल्याने ओतूर पोलिसांच्या मदतीने सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकून १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन ९ लाख ३९ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १२ /५/ २०२० रोजी सकाळी १०वा.चे सुमारास पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री.रवींद्र मांजरे ,पोलीस हवालदार सुनील जावळे, पोलीस नाईक दिपक साबळे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले जुन्नर उपविभागात आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण हायवे रोडवर आळेफाटा ते वडगाव आनंद गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मांजरे यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की ओतूर गावच्या हद्दीत ठाकरवाडी येथे बबन शितोळे यांच्या घराच्या शेजारी मोकळ्या जागेत काही लोक एकत्रित बसून तीन पत्ते नावाचा जुगार खेळत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने ओतूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. कांबळे यांना माहिती देऊन ओतुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विकास गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल बनकर यांना सोबत घेऊन दोन पंचांना बोलवून ठाकरवाडी येथे जाऊन बबन शितोळे यांच्या घरा घराच्या अलीकडे गाडी उभी केली असता घराच्या शेजारी आडोशाला जमिनीवर दोन ग्रुप करून बसलेल्या लोकांना
ताब्यात घेऊन ग्रुप नंबर १ मधील त्यांचे नाव पत्ता विचारला त्यांनी त्यांची नावे १) मारुती विठ्ठल तांबे वय (६२ वर्षे) राहणार मोनिका चौक ओतूर ता. जुन्नर जि. पुणे 2) नाशिर इब्राईन मन्यार (वय ५१) मार्केट यार्ड ओतूर,जुन्नर, पुणे 3) रमेश वचिष्ठ गोरे (वय 30 वर्षे )मुंजाबा चौक ओतूर ४) रोहन किरण शहा (वय ३४ वर्षे )चैतन्य चौक ओतूर ५) मच्छिंद्र धनलाल चव्हाण (वय ५१ वर्षे ) ६) सचिन चंद्रकांत भुजबळ (वय 38 वर्षे )काळे वस्ती ७) बाळासाहेब म्हातारबा कुरकुटे (वय 30 वर्षे) कुरकुटवाडी ता. जुन्नर ८) सचिन अर्जुन नलावडे (वय 48 वर्षे) धोलवड जुन्नर,पुणे अशी सांगितली त्यांची पंचाचे समक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे समोर ५२ पानाचे कॅटचे प्रत्येकी तीन पत्ते व बाकी कॅट मधील उरलेले पत्ते साईडला ठेवलेले व त्याचे समोरील व अंगझडती तील रोख रक्कम ७९ हजार ४१० रुपये मिळून आले.
ग्रुप नंबर २ मधील इसमांनी त्यांची नावे अनुक्रमे ९) अतुल रामदास तांबे ( वय 38 वर्षे) रा. होळी चौक ओतूर १०) जाकिर बशीर बेपारी ( वय ४२ वर्षे) ११) अशोक मनोहर गावडे (वय ५१ वर्षे) बनकर फाटा ता. जुन्नर १२) अजित अशोक फापाळे ( वय ३४ वर्षे ) मार्केट शेजारी आळेफाटा 1३) जीशान नाईक मन्यार (वय २८ वर्षे) र १४) शांताराम निवृत्ती नायकोडी (वय ५४) ब्राह्मण वाडा चौक ओतूर १५) बबन रामजी शितोळे ठाकरवाडी ओतुर ता. जुन्नर जि. पुणे अशी सांगितली. त्यांची पंचांचे समक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे समोर 52 पानांचे कॅट मधील प्रत्येकी तीनपत्ते व बाकी कॅट मधील उरलेले पत्ते साईड ला ठेवलेले व अंगझडती तील रोख रक्कम १६ हजार ७५० रुपये मिळून आले. त्यांना तेथे उपस्थित राहण्याबाबत विचारले असता बाळासाहेब कुरकुटे व सचिन नलावडे सदर ठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलो आहेत असे सांगितले. त्यांची अंगझडती घेता अनुक्रम कुरकुटे यांच्याकडे रोख रक्कम १४० रुपये व नलावडे याचेकडे रोख रक्कम १०० रुपये मिळून आले. बबन रामजी शितोळे हा स्वतः जागेचा मालक असल्याचे सांगत आहे. त्यांची अंगझडती घेता त्याच्याकडे रोख रक्कम २९०० रुपये मिळून आले. तसेच सदर ठिकाणी जुगार खेळण्याकरिता जाण्यासाठी वापरण्यात आलेली एकूण १२ वाहने त्यांची एकूण किंमत ८ लाख 40 हजार रुपये सर्व रोख रक्कम व जुगाराची साधने तसेच वाहने असा एकूण किंमत ९ लाख ३९ हजार ३०० रुपये चा मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला.
याबत सुरज प्रभाकर बांबळे पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी आरोपिंच्या विरुद्ध सरकार तर्फे मुंबई जुगार कलम 12 (अ)प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.
आरोपी व मुद्देमाल ओतुर पोलिसांच्या ताब्यात देऊन, गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई ओतुर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.रवींद्र मांजरे, पो. हवा. सुनील जावळे, पो. हवा.शरद बांबळे, पो. ना. दीपक साबळे चा.पो.शि. अक्षय नवले, पो. ना. गोसावी, पो.शि. कोकाटे, पो .शि. बनकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment