Thursday, May 21, 2020

जुन्नर तालुक्यात चित्रनगरी प्रकल्प उभारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ग्राहक समाचार News Portal
                  【अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती चे खुले व्यासपीठ】
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
                   (अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका)

पुणे - माझ्या मतदारसंघातील माळशेज परिसरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण होते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी प्रकल्प राबवा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली.
                       लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाट्य, चित्रपट व मालिका निर्मात्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आपली भूमिका मांडताना डॉ. कोल्हे म्हणाले की, रोजगाराच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईसह इतर ठिकाणी देखील चित्रिकरण करण्यासाठी चित्रनगरी प्रकल्प राबवता येऊ शकेल. कोल्हापूर प्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण जुन्नर लगतच्या माळशेज परिसरात होत असते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी उभारण्यात यावी अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.
     

No comments:

Post a Comment