ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
[अध्यक्ष : अ.भा.ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका]
नारायणगाव ■ कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे नारायणगाव येथील बांधकाम व्यवसायिक व त्यांच्या व्यवस्थापकावर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
याप्रकरणी शुभम सुनील बडेरा (वय २९) या तरुण बांधकाम व्यावसायीकासह व्यवस्थापक सुनील बिंबाजी वाव्हळ (वय ४०) यांच्यावर कोविड उपाययोजना २०२० नियम ११ प्रमाणे २, ३, ४ तसेच भा.द.वि. कलम १८८,२६९, २७० या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कैलास कोबल यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल कोबल हे पेट्रोलिंग करत असताना नारायणगाव येथील बाजारपेठ मध्ये बांधकाम चालू ठेवून खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच व त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमविल्यामुळे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यामुळे बडेरा व वाव्हळ यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment